या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४६ एकनाथी भागवत अगी निधन आदळलें ॥ २८० ॥ तेणें खोळंबली ब्रह्मप्राप्ती । परी ऊर्ध्वलोकी होय गती। जैसी उपासना विरक्ती । तेणें तारतम्य जाती महर्जनादि लोकीं ॥ ८१ ॥ जे वनवासी वानप्रस्थ । जे वैराग्य अतिविरक्त । जे कंदमूळफळी तृप्त । जे सदा नेमस्त आनमधर्मी ॥ ८२॥ वर्षाकाळी आसारी राहे । हेमंतऋती जळाशयें। उष्णकाळी पंचाग्नि साहे । तपश्चर्या वाहे अतिनिष्ठा ॥ ८३ ॥ शरीरशोपणाचें पाहें । सर्वथा न धरी भये । स्वार्थाचेनि लवलाहें । तपोनिष्ठा साहे दारुण ॥.८४ ॥ वैराग्य साधूनि पूर्ण । करावे सन्यासग्रहण । साधावया ब्रह्मज्ञान । तेचि काळी मरण वोढवले ॥ ८५ ॥ ऐसेनि देहांतस्थिती । त्यासी अर्ध्वलोकी होय गती । महर्जनतपोलोकप्राप्ती । तारतम्यस्थिती उपासना ॥ ८६ ॥ जो समूळसकल्पसन्यासी । लोकलोकांतर न घडे त्यासी । हे न टकेचि गा जयासी । आणि झाले सन्यासी विधियुक्त ॥ ८७ ॥ जे, कां पोटीहून अतिविरक्त । स्वमीं धातूंसी न लाविती हात । जे यतिधर्मी सदा निरत । जे सदा जपत प्रणवाते ॥ ८८॥ अंगीकारिले आश्रमविधी । उबगू न मानी जो त्रिशुद्धी । मरणी डंडळीना वुद्धी । त्या गमनसिद्धी सत्यलोकीं ॥ ८९ ॥ ऐसे सत्यलोकातें पावती । तेथिल्या भोगाची ज्या विरक्ती । ते ब्रयासवे मुक्त होती । येर ते येती माघारे ॥ २९० ॥ ज्यासी सत्यलोकी भोगासक्ती । तेहि खचोनि माघारे येती । इतर लोकाची कोण गती । पुनरावृत्ती सोडीना ॥ ९१॥ जेथवरी भोगासक्ती । तेथवरी पुनरावृत्ती । जेथ भोगाची निवृत्ती । तेथ चारी मुक्ती आंदण्या ॥१२॥ ज्या लोकी ज्या भोगविरक्ती । तेथूनि ते पुढारे जाती। जे लोकी ज्या भोगासक्ती। ते खचोनि पडती भूलोकीं ॥ ९३ ॥ तैशी नव्हे माझी भक्ती । भक्तां नाही इतरप्राप्ती। भद्रका माझी गती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ९४ ॥ जे सकाम माझी सेवा करिती । त्यासी कामनाफळी पडे बस्ती । ज्यासी निष्काम माझी भक्ती । त्यासी माझी प्राप्ती अनन्य ।। ९५ ॥ सकाम भक्तांचे पुरवूनि काम । त्यांसी मी करीन नित्य निष्काम । निजभक्तासी निजधाम । मी पुरुषोत्तम पाववी ॥ ९६ ॥ यालागी गोपीची कामासक्ती। म्यांचि आणूनि निष्कामस्थिती । त्यासी दिधली सायुज्यमुक्ती । जाणं निश्चिती उद्धवा ॥ ९७ ॥ म्या गोपिकासी कामू केला की निःशेष कामू त्याचा हरिला । न विचारिता या बोला । कृष्ण व्यभिचारला मूर्ख ह्मणती ॥ ९८ ॥ संलोकता आवडे भक्तांसी । तैं मी करी वैकुंठवासी । भक्त मागे समीपतेसी । करी मी तयासी जिवलग ॥ ९९ ॥ हितगुज अळोंच्यांसी । हृदयींचें गोड सागावयासी । उद्धवा तूं जैसा आवडशी । ऐशीच त्याशी करी प्रीति ॥ ३०० ॥ भक्त मागे सरूपता । त्यासी मी दें चतुर्भुजता । शंखचक्रादि सायुधता । धनश्यामता सुरेख ॥१॥ मुकुट कुंडलें मेखळा । कासे मिरवे सोनसळा ! वाकी तोडरू चरणकमळा,। कौस्तुभ गळां मत्सम ॥२॥ ठाणमाण गुणलक्षण । वीये शौर्य गाभीर्य पूर्ण ! रूप रेखा समसमान । दोघेही अनन्य सरूपता ॥३॥ रमा दोघांसी एकत्र देखे । देवो कोण हैं तो नोळखे । पार्षदक्रिया ठकली के । कोणासी सेवकें मरण २ पजन्यधारांमध्ये, आकाशी ३ प्राप्त झालं ४ सोयारुण्याला ५ चचल होत नाहा ६ गळून पडतात - "सोग पुग्ये मत्सरोक विशति' गी० अ० ९ श्लोक १७ दासी ८ दोषी झाला ९ अळोंच्य-विचार करण्यास योग्य. मान, भोंच, आरोच १० एफदर शरीराची ठवण ११ गोंधळून जातात