या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६५० एकनाथी भागवत. जिव्हाळा पूर्ण । भावार्थाची उणखूण । जाणता भी एक श्रीकृष्ण । इतरांसी जाण कळेना ॥ ७ ॥ मज गोपिकांची कोण गोडी । त्यांच्या प्रेमाची जाति चोखडी। यालागी मज त्यांची आवडी । अतिगादी उद्धवा ॥ ७९ ॥ कुना काय सुंदर होती । तिच्या प्रेमाची मज प्रीती । राधा प्रार्थी मी वनाप्रती । काय विपयासक्तीलागूनी ॥ ३८० ॥ कोण भक्ती केली गोपाळी । काय ती सांवळी की ओवळी । त्यांचे उच्छिष्ट कवळ मी गिळी । प्रेमसमेळी डल्लत ॥ ८१ ॥ पांडवांच्या वाचे मी काय लागें । त्यांची वेवेटें सोशी अनेगें। मी सुदाम्याच्या पायां लागें । काय त्याचेनि पांगे पागलों ॥ ८२ ॥ मी काय अन्नासी दुकाळलों । तो यपत्यांसी मागों गेलों । मी भावार्थाचा भुकेलों । प्रेमाच्या पायलों पाहुणेरा ॥ ८३॥ माझी काय क्षीण झाली शक्ती । मज गोपिका दावी यांधिती । त्यांच्या निजप्रेमाची जाती । मी स्वयें श्रीपति पोखितू ॥ ८४ ॥ मी न लागता कोणाची कवडी। अर्जुनाची धूतसे घोडी । धर्माधरी उच्छिष्टें काढी । मज अतिआवडी प्रेमाची ।। ८५ ॥ मज प्रेमळाची अतिआवडी । ते लोकेपणालाज दवडी । महत्त्वाच्या विसरवीं कोडी। त्याच्या सेवेची जोडी मजलागीं ॥८६ ।। सकळ अळंकार लेअनि माता । निजपुत्र मस्तकी लाडवितां । त्याच्या कंटाळेना थुकमुता । तेवीं प्रेमळे सर्वथा मजलागी ॥ ८७ ॥ ऐसाप्रेमाचेनि अतिपागें । म्यां पंगिस्तै होइजे श्रीरंगें। यालागी तयापुढेमागें। सदा सर्वागं तिष्टत ॥८८॥ उद्धवा यादव समस्त । असतां माझं वहत गोत । तंचि प्रियक मज जो येथ । माझे प्रेम अद्भुत तुजेलागी ॥ ८९ ॥ हे ऐकोनि-देवाची गोठी । उद्धवें पायीं घातली मिठी । देवो सुखावोनि पोटीं । उठाउठी आलिगी ॥ ३९० ।। हृदयीं हृदय जाले सलग्न । देही देहा पडिले आलिगन । मनेसी एक झाले मन । स्वानंदें पूर्ण वोसडे ॥९१॥ देवो विसरला देवपण । भक्ता नाठवे भक्तपण । दोघाचे उडाले दोनीपण । स्वानदी पूर्ण बुडाले ॥ ९२॥ सेव्यसेवकता ठेली गोठी । द्वैतभावाची खुटली दृष्टी । भक्तिसाम्राज्याच्या पाटीं । दोघां झाली भेटी निजात्मता ॥ ९३,॥ स्थूळ लिग आणि कारण । इंही उपलक्षिजे महाकारण । ते देहचतुष्टयाची आठवण । आठविते कोण ते ठायीं ॥ ९४ ॥ तेथ निबिड आणि निघोट । सुखस्वरूप घनदाट । नाहीं आदि मध्य शेवट । तें झाले प्रकट स्वयंभ ॥ ९५ ॥ नवल देवाचे पूर्णपण । तेथही लाघव केले जाण। मोडों नेदीचि उद्धवपण । ऐसा भक्त आन मज मिळेना ।। ९६ ॥ उद्धवाऐसा मजपाशीं । कोण मिळेल अळोंचासी । माझं निजगोड कोणापाशीं । म्यां सावकाशी सागावे ॥ ९७ ॥ मज निजधामा गेलिया जाण । माझे जे निःसीम निजज्ञान । त्यासी उद्धव शुद्ध साठवण । यालागी उद्धवपण राखिले ॥ ९८ ॥ उद्धव स्वानदी निमन । त्यासी थापटूनि आपण । सावध करी श्रीकृष्ण । येरा भक्तपण आठवले ॥९९॥ ह्मणे जय जय श्रीकृष्णनाथा । जे मज सुख दाविले आता । ते नित्य निर्वाहे सर्वथा । ऐशी कृपा तत्त्वतां करावी ॥४००। । तंव श्रीकृष्ण हाणे उद्धवा । हा माझा निजगुह्य गोप्य ठेवा । तुज म्या सागीतला १ घास २ प्रेमभराने ३ कर्ज देणे आहे ४ किचाटे, झ ५ त्याच्या ताब्यातला दास माह काय ? ६ दाव्याने ७ बाढवितों ८ लौक्किाची पर्वा ९ गोडी १० नेमाच्या जबरदस्त वधनाने ११ पराधीन १२ तुजमाजी १३ तुद्धन भरलें ध वाह लागले १४ राहिली १५ परिपूर्ण १६ सुखरूप १७ ब्रह्म. १८ कौतुक, लीला १९ निज गुज सागण्यास २० टिकावं, राहावे.