या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चोविमावा ६५७ होय आकाशी|आकाश प्रवेशे शब्दासी । उरे अवशेषों शब्दतन्मात्र ॥ ३८॥ दशेंद्रियांची मंडळी । राजसापासोनि जन्मली। ते निजगुणी सामावली। जेवीं पंचांगुळी मुष्टीमाजी ॥३९॥ योनियंकारिके सौम्ये लीयते मनसीश्वरे । शब्दो भूतादिमप्येनि भूतादिमहति प्रभु ॥ २५ ॥ वैकारिक जो सत्वगुण । व्याला देवता अतःकरण । प्रळयस्वभावे आपण ! मनामाजी जाण प्रवेशे ॥ ५४० ॥ सकळ इंद्रियांचा राजा मन । मन कल्पना जीवशिवपण । श्लोक पदें 'मनसीश्वर' पूर्ण । मनाशीच जाण हरि बोले ॥४१॥ मनोदेवता अंतःकरण । घेऊनि प्रवेशे सत्वगुण । ज्या कार्याचें जें कारण । तेथ ती जाण प्रवेशती ॥ ४२ ॥ शब्दतत्मान उरलें आधीं । तें मीनले तामसामधी । कारणी कार्यासी अवधी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ।। ४३ ॥ त्रिविधगुणी अहंकारू । एकवटला महाथोरू । ऐक त्याचा बडिवोरू । तोचि दुर्धरू ससारी ॥४४॥ जो शिवातें महत्त्वा चढवी । जीवाते देहात्मता गोंवी । अहममता जग भुलवी । प्रभुत्वपदवी महत्तत्त्वे येणे ॥ ४५ ॥ अहंकारू ऐसा आहे । तो जै परमार्थी साह्य होये । तै सोहंभावाचेनि लवलाहें । विभाडी पाहे ससारू ॥४६॥ चोर ज विश्वासू मित्र होये । तै चोर चोरा निवारी पाहें । तेवीं अभिमानू जै साह्य होये । ते भवभय वाधीना ॥ ४७ ॥ याहीपरी अभिमान । सामध्ये अतिगहन । यालागी प्रभुत्वे जाण । केले व्याख्यान उद्धवा ॥४८॥ त्रिगुणगुणी गुणाभिमान । एकत्र होऊनिया पूर्ण । महत्तत्त्वी होय लीन । अतिसुलीन तद्रूपें ॥ ४९ ॥ स लीयते महान्स्येच गुणेषु गुणवत्तम । तेऽव्यक्त समलीयन्ते तरकाले लीयतेऽव्यये ॥२६॥ तेही महत्तत्त्व येथें । कारणगुणी लीन होते । तेंही गुणसाम्य निश्चित । पावे लयाते अव्यक्ती ॥ ५५० ॥ आकारविकार समस्त । हारपोनि जाती जेथ । उरे वीजमात्र अवशेपित ! त्या नाव अव्यक्त बोलिजे ॥५१॥ वटाचा आकारविकार ना शेंडा मूळ पुष्प पत्र । उरे अवशेष वीजमान । तेवी ससार अव्यक्ती ।। ५२ ॥ वटवीज उरलें येव । ते दृष्टीसी तर्केना निश्चित । तेवीं भववीज जे अव्यक्त । ते नव्हे व्यक्त जीवासी ॥ ५३ ॥ नाना हूँणजातिवीज गहन । उष्णकाळी काळ करी लीन । तेवी भववीज अव्यक्त जाण । होय सुलीन काळेंसी ॥ ५४॥ पूर्वी काळें क्षोभोनि अव्यक्त । जगदाकारें केले व्यक्त । तेचि काळयोग अव्यक्त । सुलीन होत काळेंसी ॥ ५५ ॥ या नाच अव्यक्ताचा पहा हो। काळामाजीं बोलती लयो । काळ बोलिजे महावाहो । त्याचा होय व्ययो पुरुसीं ।।५६ ।। कायो मायामये जीवे जीव आत्मनि मय्यजे । थारमा केवल भामरयो विकरपापायर क्षण ॥ २७ ॥ क्षोभकता । तोचि काळ बोलिजे तस्वता । उत्पत्तिस्थितिमळयाता। तिनी अवस्था काळाच्या ॥ ५७ ॥ तिनी अवस्था लोटल्या ठायीं । काळासी कर्तव्यता नाहीं। तो उपजत व्यापार पाहीं । जीवाचे ठायी सामावे ॥५८ ॥ अचेतनी चेतविता । जडातें जो जीविता । यालागी जीवू ऐशी वार्ता । जाण तत्त्वता पुरुपासी ।। ५९ ॥ १ लीन होते ३ समाप्ति, लय ३ थोरवी ४ देहाच्या तादाम्यात गुतवितो ५ नाश्रितो दुसऱ्या चोराग ७ समारभय ८ मूळमाया सूक्ष्म प्रकृतीमध्ये १० भागरविकारादि पीजरूपाने राहतातः 11 गवतादिकानें १२ उरवा १३ लयो ए. भा ८३