या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. विषयांशी देहबुद्धी ॥ ८९ ॥ ऐशी असंत देहबुद्धी कुडी । वाढवी विषयांची गोडी । ते महाभयाची जोडी । जन्ममरणकोडी अनिवार ॥२९०॥ एवढा अनिवार सताप । देहबुद्धीपाशी महापाप । जाणोनि धरी जो अनुताप । विपयाँ अल्प गुंतेना ॥९१॥ धरिता विषयाची गोडी । भोगाव्या जन्ममरणकोडी । येणे भयें विषय पोसडी । इंद्रियातें कॉडी अतिनेमें ॥ ९२ ॥ इंद्रिय कोंडितां न कोडती । विपय साडितां न सांडती । पुढतपुढती बाधू येती । यालागी हरिभक्ती द्योतिली वेदें ।। ९३ ॥ इंद्रिये कॉडाची न लगती । सहन राहे विपयासक्ती । एवढे सामर्थ्य हरिभक्तों । जाण निश्चिती नृपवर्या ॥ ९४ ॥ योगी इंद्रिये कोडिती । ती भक लाविती भगवभक्तीं। योगी विषय जे त्यागिती । ते भक्त अर्पिती भगवंती ।। ९५॥ योगी विषय त्यागिती । त्यागितां देह दुःखी होती। भक्त भगवंता अर्पिती। तेणे होती नित्यमुक्त ॥ ९६ ॥ हे नव्हे ह्मणती विकल्पक । याचिलागी येथे देख । 'कायेन वाचा' हा श्लोकः । अर्पणद्योतक बोलिजेला ।। ९७ ॥ दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण । हे भागवतधर्म पूर्ण । मुख्यत्वे भजन या नाव ॥ ९८ ॥ अकराही इंद्रियवृत्ती । कशा लावाच्या भगवद्भक्ती । ऐक राया तुजप्रती । सक्षेपस्थिती सांगेन ॥९९॥ मने करावे हरीचे ध्यान । श्रवणे करावे कीर्तिश्रवण । जिव्हेने करावे नामस्मरण । हरिकीर्तन अहर्निशी ।। ३०० ॥ करी करावे हरिपूजन । चरणी देवालयगमन । प्राणी तुलसीआमोदग्रहण । जिंही हरिचरण पूजिले ॥१॥ नित्य निर्माल्य मिरवे शिरीं । चरणतीर्थे अभ्यंतरी । हरिप्रसाद ज्याचे उदरीं । त्या देखोनि दुरी भवभय पळे ॥२॥ वाढतेनि सद्भावे जाण । चढतेनि में पूर्ण । अखंड ज्यासी श्रीकृष्णभजन । त्यासी भवबंधन असेना ॥३॥ सकल भयामाजी थोर । भवभय अतिदुर्धर । तेही हरिभक्तीसमोर । बापुडे किर्कर केवीं राहे ॥४॥ करितां रामकृष्णस्मरण । उठोनि पळे जन्ममरण । तेथे भवभयाचे तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥५॥ जेथे हरिचरणभजनप्रीती । तेथें भवभयाची निवृत्ती । परम निर्भय भगवद्भक्ती आमची मती निजनिश्चयो ॥ ६॥ कृतनिश्चयो आमुचा जाण । येथे साक्षी वेद शास्त्र पुराण । सर्वात्मना भगवद्भजन । निर्भयस्थान सर्वांसी ॥ ७॥ असो वेद शास्त्र पराण । स्वमुखें चोलिला श्रीकृष्ण । मी सर्वथा भक्तिआधीन । भक्तिमधान भगवद्वाक्य ॥८॥ उभवूनियां चारी बौह्या । निजात्मप्राप्तीच्या उपाया। 'भत्याहमेकया ग्राह्यः । बोलिला लवलाह्या श्रीकृष्ण ॥ ९॥ ये वे भगवता प्रोक्ता उपाया ह्यात्मलब्धये । अञ्ज पुसामविदुपा दिदि भागवतान् हि तान् ॥ ३४ ॥ न करितां वेदशास्त्रव्युत्पत्ती । ऐशिया अज्ञाना निजात्मप्राप्ती । सुगम जोडे ब्रह्मस्थिती। यालागी हरिभक्ती प्रकाशिली देवे ।। ३१०॥ न करितां वेदशास्त्रपठण । जडमूह हणाल सरले कोण । उन्मत्तगजेन्द्रउद्धरण । गर्भसरक्षण परीक्षितीचे ॥११॥ अवरीपगर्भनिवारण । करावया भक्तीच कारण । 'अहं भक्तपराधीनः' । स्वमुखें नारायण बोलिला ॥१२॥ वनचर वानर नेणा किती। उद्धरले भगवद्भक्ती । अस्वले तारावया निश्चिती । विवरी जांववती खराव २ पश्चात्ताप ३ टाकतो ४ प्रकट केली, दासचिलो ५ विकल्पीलोक ६ आत्मसमर्पण कसे करावं ह सुचविणारा स्त्री ८ तुलसीचा सुवास घेणे ९ शरीरात १० चाकर, दुव ११ सर्वभावेकरून १२ बाह, हात १३ 'मी केवळ एका भक्तीनेच प्राप्त होतों' १४ सत्वर, मोम्या प्रेमाने