या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७२ 'एकनाथी भागवत. विपयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥ ४८ ॥ असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं ॥ राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्धं ॥ ४९ ॥ नसतां विकाराचे कारण । चित्ती विकार चिंती आपण । हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वे जाण उद्धवा । ॥ २५० ॥ रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ । जैसी झावळी सांजवेळ । तैसा केवळ रजोगुण ॥ ५१ ॥ सत्वरजाची उणखूण । तुज दाविली ओळखण । आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥ ५२॥ सीदचित्त प्रलीयेत चेतसो ग्रहणे क्षमम् । मनो नष्ट तमो ग्लानिन्तमस्तदुपधारय ॥ १८ ॥ , चिनी चिता अतिगहन । ते महामोही होय निमग्न । कोणेही अर्थीचे ज्ञान । हृदयजाण स्फुरेना ॥ ५३ ।। सुर्घप्तीवेगळे अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान । तेथ नवल कैसे झाले जाण । त्या ज्ञानाते अज्ञान गिळूनि ठोके ॥ ५४ ॥ जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे । जेवीं का औंभाळांतिले अंबसे । रात्री चाले जैसें आंधळें ॥ ५५ ।। सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा । हा तमोग्लानीचा सोहळा । पंडळ ये डोळा चित्तवृत्ती ॥५६॥ सकल्पविकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती । त्या मनाची जड होय स्थिती । सर्कल्पस्फूर्ति स्फुरेना ।। ५७ ॥ आणिकही नवलस्थिती। चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती । एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥ ५८ ॥ वापरी तमाचे वळ होय । तें मनातें अज्ञान खाय । ते काळी मन नप्टमाय । मूछित राहे मूढत्वे ॥ ५९ ॥ मने निःशेप में नासतें । तै महादुःख कोण भोगिते । यालागी तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथे जड़मूढ ॥ २६० ॥ यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती । या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ६१ ॥ वाढविता गुणवृत्ती । कोणे गुणे कोण वाढती । येचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपति सागत ॥ ६२ ॥ । एधमाने गुणे सत्ये देवाना बलमेधते । असुराणा च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥ १९॥ दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची सपत्ती । जे जे ब्रह्मांडी इंद्रियवृत्ती। तेचि स्थिति पिडीही"॥६३ ॥ ब्रह्माडी सकळ देव । महापुरुपाचे अवयव । पिंडीही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निजऐक्य ।। ६४ ॥ उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मी जे प्रवृत्ती। ऐशी जेथ इद्रियवृत्ती । ते दैवी सपत्ती सत्वस्थ ॥ ६५ ॥ कामाभिलाप दृढ चित्ती । आणि स्वधर्मी तरी वर्तती । ऐशी जे इंद्रियस्थिती । ते आसुरी सपत्ति राजसी ॥६६॥ सलोभमोहें क्रोध चित्ती । सदा अधर्मी प्रवृत्ती । ऐशी जे इंद्रियस्थिती । ते राक्षसी सपत्ती तामसी ॥ ६७ ॥क्षणे सकाम क्षणे निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म । तेथ देवा असुरां परम । होय सग्राम वृत्तीसी ।। ६८ ॥ चित्ती वाढवूनि मोहनम । अधमंचि मानी स्वधर्म । ते राक्षसाचा पराक्रम । देवासुरा परम निर्दाळी ।। ६९ ॥ सकामनिष्काममोहनसीं । वृत्ती वर्ते गा जयापाशीं । तेथ देवांअसुरांराक्षसासी । कलहो भ्रमोत्पादक, प्रमयुक्त २ गाढ झोपांचून ३ टाकी ४ मेघानी व्यापिलेल्या अमावास्येच्या रात्रौ ५ गठही, घड, शिरदित देह, कवध "जामई यानि रस । तेणे काढावा यहवसू । काल्यूशी अळस । मोळा पाजावा" अमृतानुभव भ६४९ ६ महानसंबंधी ग्लानीषा ७ चित्तवृत्तीच्या डोळ्याला पडदा येतो ८- सकल्पात्मक मनहीं नष्ट होत मनानि दोप नाशते १० देहातही. ११"निष्काम पर्माच्या ठिकाणी