या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७४ एकनाथी भागवत. तरमाप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥ ९३ ॥ स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि प्रावती जनलोक । उलंघोनियां तपोलोक । पावती सात्त्विक सत्यलोक पैं ॥ ९४ ॥ वाढलियां रजोगुण । शूद्रादि चांडाळपण । पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥ ९५ ॥ वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पाचोन । दश मशक वृक्ष पापाण । योनि सपूर्ण भोगवी ॥ ९६ ॥ प्राण्यासी अंतकाळी जाण । देहांती जो वाढे गुण । त्या मरणाचे फळ कोण । तेही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥ ९७ ॥ अनन्य करितां माझी भक्ती । भक्ताती अती कोण गती । तेहीविखींची उपपत्ती । श्लोकांती हरि सागे ॥ ९८॥ सत्ये प्रलीना पर्यान्ति नरलोक रजोलया । तमोलयास्तु निरय यान्ति मामेव निर्गणा ॥ २२ ॥ ससारी मुख्यत्वे त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्वगुण । ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगी जाण दिव्य देह पावे ॥ ९९ ॥ सत्वे निमाल्या सात्विक । ते पावती स्वर्गलोक। रजोगुणे निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥ ३० ॥ अंती वाढोनिया तमाधिक्य । तमोगुणे निमात्या देख । ते भोगिती महानरक । दुःखदायक दारुण॥१॥ सप्रेम करिता माझी भक्ती । माझिया भक्कासी देहाती । हृदयीं प्रकटे माझी मूर्ती । घवविती निजतेजे ॥ २॥ शंखचक्रगदादि सपूर्ण । पीतांवरधारी श्रीकृष्ण । ध्यानीं धरूनि पावे मरण । तो वैकुंठी जाण मी होये ॥३॥ सर्वभूती मी आत्मा पूर्ण । ऐसे ज्याचे अखंड भजन । ते जितांचि तिन्ही गुण । जिणोनि निर्गुण पावती ॥४॥ त्याचे देहासी देवे आल्या मरण । मजवेगळे नाही स्थान । ते निजानंदें परिपूर्ण । निजनिर्गुण स्वयें होती ॥५॥ माझें स्वरूप निजनिर्गुण । अथवा वैकुंठीचे सगुण । दोन्ही एकचि निश्चयें जाण । सगुण निर्गुण समसाम्य ॥ ६ ॥ स्वर्ग नरक मनुष्यलोक । प्राप्ति पावले निर्गुण चोख । त्याच्या साधनाचे कौतुक स्वयें यदुनायक सांगत ॥ ७ ॥ मदर्पण निष्फल वा साविक निजकर्म तत् । राजस फलसरप हिंसामायादि तामसम् ॥ २३ ॥ सकळ कर्मक्रियाचरण । संकल्पेंवीण आपण । सहजे होय ब्रह्मार्पण । हे निर्गुण साधन शोधितसत्वे ॥ ८ ॥ वर्णाश्रमधर्म सकळ । आचरे परी न वांछी फळ । माझे भक्तीचे प्रेम प्रबळ । हे कर्म केवळ सात्विक ॥९॥ माझें भजन हाचि स्वधर्म । याचि नांव गा निजकर्म । ऐसे ज्यासी कळे वर्म । सालिक कर्म या नाव ।। ३१० ॥ स्वधर्म आचरोनि सकळ । इंद्रादि देवा यजनशीळ । जो वांछी इहामुत्र फळ । हे कर्म केवळ राजस ॥११॥ जे कर्मी प्रकट हिंसा घडे । कां आभिचारिक करणे पडे । स्वरूपं जे कर्म कुडें । ते जाण धडे फुडें तामस ॥ १२ ॥ जेथ दाभिक कर्माचारू । जेथ साधूंसी अतिमत्सरू । जेथ निंदेचा प्रवळ भरू । तो कर्मादरू तामस ॥ १३ ॥ आतां त्रिगुण आणि निर्गुण । याचे चतुर्विध लक्षण । या श्लोकी श्रीकृष्ण । स्वमुखे आपण सांगत ॥ १४ ॥ फेयल्य साथि ज्ञान रजो वैकल्पिक च यत् । प्राकृत सामस ज्ञान मलिष्ट निर्गुण स्मृतम् ॥ २४ ॥ देही असोनि देहातीत । भूती भूतात्मा भगनंत । भूता सबाह्य सभराभरित । हूँ ज्ञान १ रजोगुनोस्पान मध्यचारी मनुप्य होतात २ तमोगुणाच्या आधिक्यान स्थावरापर्यंत अधोगतीस जातात ३ चतुपार जनावरांचा जन्म ४ विवेचन ५ मेल्यास ६ देदीप्यमान ७ गुणोकामळे कर्माचे तीन प्रकार होतात ते सागों ८ या रोग व परलोकीचे १ प्रत्यक्ष १० परस्सिाशादिजनक ११ बोगन, आईट १२ स्पष्ट १३ हिसात्मक, समयर पदागिा कम तागण होय १४ समाखान्यतरित, च्यापर .