या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७६ एकनाथी भागवत. राजस ॥३७॥ जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषी दृष्टि वाढे । ऐशिया ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचे गाढ़ें निवासस्थान ॥ ३८ ॥ जेथ कलहाचे कारण । जेथ अविवेकी होय मन । वेश्या द्यूत मद्यसदन । हे निवासस्थान तामस ॥ ३९ ॥ देवालयीं घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती । सांचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥ ३४० ॥ अभेदभक्तांचे निजमंदिर । ते मज निर्गुणाचे निजघर । तेथ सुखत्वें ज्याची वृत्ती स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥ ४१ ॥ निर्गुणासी घरठावो । हे बोलणे झणसी वायो । जेथ उपजे ब्रह्मसद्भावो। ते वस्ती पहा वो निर्गुण ॥ ४२ ॥ विषयातीत निजस्थिती । सुखें सुखरूप राहे वृत्ती । ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ४३ ।। साडूनि आकाराचें ज्ञान । निराकारी सुखसंपन्न । वृत्ति स्थिरावे परिपूर्ण । ते वस्ती निर्गुण जनी विजनीं ॥४४॥ निगुणसमें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणी लक्षिजे चौथा । चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आता सांगेन ॥ ४५ ॥ सात्विक कारकोऽसद्धी रागान्धो राजस स्मृत । तामस स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रय ॥ २६ ॥ काटेनि कांटा फेडिता । जेवी निवारे निजन्यथा । तेवीं सगें सगाते छेदितां । सात्विकता असगी ॥४६ ॥ सद्गुरुचरणसत्सगे । सकळ सग छेदी विरागें। सात्विक कर्ता निजांगें । विपयसगें असगी ॥ ४७ ॥ फळामिलापेच्या चित्तीं गांठी । तेणे अध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळाशेसाठी । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥ ४८ ॥ निःशेप हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरी वळंघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥ अनन्य भावे हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥ ३५० ॥ त्रिगुणाची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध । येच अर्थीचे विशद । स्वयें गोविंद सागत ॥५१॥ साविषयाध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी । तामस्वधर्मे या श्रद्धा मरसेवाया तु निर्गुणा ॥२७॥ देह इद्रिय चेतना प्राण । येणेसी स्फुरे में मीपण । तेथ विवेक करूनिया पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥ ५२ ॥ देह नव्हें मी जडमूढत्वे । इंद्रिये नन्हें मी एकदेशित्वे । प्राण नव्हें मी चपळत्वे । मन चंचळत्वे कदा मी नव्हें ॥५३॥ चित्त नव्हें मी चितकत्वे । बुद्धि नव्हें मी बोधकत्वे । 'अहं' नव्हें मी बाधकत्वे । 'मी तो येथे अनादिसिद्ध ॥ ५४॥ एवं मीपणाचे निजसार । विवचूं जाणे वुद्धिचतुर । ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्विक नर सदा वाहती ॥५५॥ जे जे मी नव्हें ह्मणत जाये।ते मी देखल्या मीचि आहे । माझ्या मीपणाचे बंदिल्या पाये । मीचि मी ठायें कादोनी ।। ५६ ॥ हे आध्या १ सुसरूप राहे - एक्त्वा माझी सेवा करणान्या भक्ताच ३ वस्ती ४ घृथा ५ परब्रह्मरुपता ६ पिण्यापलीकडली ७ सद्गुरुसत्सगाने वैराग्ययुक्त होऊन पियसगाचा नाश करणारा को सात्विक, फलाभिलाषा विष. यासक्त की राजस, विवेकज्ञान नष्ट होऊन मनसोक्त कर्माचरण करणारा कर्ता तामस कर्मचाळक परमात्मा असल्यामुळे कोणत्याही क्माचा अभिमान न घेणारा कता निगुण ८ साविकका ९ खतन रीतीन, खच्छदतेन १० हिडत पिरते ११ आत्मज्ञानाविषयी जी श्रद्धा ती सात्विक, कमाविपया जी श्रद्धा ती राजस, अधर्माच्या ठिकाणी धर्म अशी जा श्रद्धा ती तामरा, ये भगवत्सेवेविपया जी ना ती निर्गुण १२ तो मी यथार्थत्वे १३ विवरण करण्याला