या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७८ एकनाथी भागवत. सात्विक सुसमात्मोत्थ विपयोय तु राजसम् । तामस मोहदेन्योरय निर्गुण मदपाश्रयम् ॥ २९॥ सांडूनि विषयसुखाची स्फूर्ती । आत्मसुखं सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । ते सुख निश्चिती सात्त्विक ।। ८१ ॥ गंगापूर भरे उन्नती । तेणे अमर्याद बोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ति स्वानंदें ॥८२॥ नाना विपयांचे कोड। इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुस सुदृढ राजस ॥ ८३॥ अतिनिद्य आणि उन्मादी । तेचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ।। ८४ ॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी जे होय सुखप्राप्ती । ते सुख निश्चिती निर्गुण ॥ ८५ ॥ सर्व भूती बसे भगत । तोचि मी हा तात्त्विकार्य । ऐसेनि मदैक्ये सुख प्राप्त । ते निजसुखार्थ निर्गुण ॥ ८६ ॥ देखिल्या निजात्मसुखरूप । स्वर्ये होइजे सुखरूप । हे निर्गुणसुखाचे निजदीप । झडल्या पुण्यपाप पाविजे ॥ ८७ ॥ आपण सुखस्वरूप सर्वांगीं । सुखस्वरूप स्वयें भोगी। है निर्गणसेखाची मागी। भक्ती अंतरंगी भोगिजे ॥८॥कल्पांताचें पर्ण भरितें। नेदी नदीनदांतें । तेवीं निर्गुण सुख येथे । देहेंद्रियातें उरों नेदी ॥ ८९॥ जेवीं मृगजळी जळ नाहीं । तेवीं परब्रह्माच्या ठायीं । प्रपंच स्पर्शिलाचि नाहीं । तें सुख निर्वाही निर्गुण ॥ ३९० ॥ ज्या सुखाची मर्यादा । करितां न करवे कदा । सुखें सुखस्वरूप होइजे सदा । हे सुखसंपदा निर्गुण ॥ ९१ ॥ त्रिगुण आणि निर्गुण । यांचे दाविले भेदलक्षण । आतां त्याचे उपसहरण ! ग्रंथाती जाण हरि करी ॥ ९२ ।। द्रव्य देश फल कालो ज्ञान कर्म च कारक । श्रद्धाऽवस्थाऽऽकृतिनिष्टा त्रैगुण्य सर्य एव हि ॥ ३० ॥ द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्द वनग्रामभेद । फळशब्दें सुखउद्दोध । सत्वसंवंधविभागे ॥ १३ ॥ काळशन्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नाव ज्ञान । कर्म हणिजे मदपंण । कतो तो जाण असगी॥ ९४ ॥ श्रद्धाशब्दें आध्यात्मिकी । अवस्थाशब्दजागरणादिकी । आकृतिशब्द उपरिलोकीं । देवतादिकी क्रीडन ॥ ९५ ॥ जो गुण वाढे देहांती । जेणे गुणें होय अंतःस्थिती । त्या नाव निष्ठा ह्मणती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ९६ ॥ भिन्न भिन्न भाग अनेक । किती सागं एकेक अवघे जगचित्रिंगणात्मक जाण निष्टक निजभक्ता ॥ ९७ ॥ संसार समस्त त्रिगुण । यामाजीं मी अवघा निगुण । हे तुज कळा. वया निजखूण । गुणनिरूपण म्यां केले ॥ ९८॥ सर्वे गुणमया भावा पुरुषाध्यक्ताधिष्ठिता । इष्ट श्रुतमनुध्यान बुद्ध्या वा पुरषभ ॥ ३ ॥ देसिजे अथवा ऐकिजे । का मनें जें जें चितिजे । ते ते अवघेचि जाणिजे । मायागुणकाजे त्रिगुणात्मक ॥ ९९ ॥ करावया त्रिगुणाचे मर्दन । प्रकृतिनियंता पुरुप भिन्न । तो सर्वदा सर्वांगें निर्गुण । वर्तवी गुण निजसत्ता ॥ ४०० ॥ पुरुपावेगळे समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत । त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥ १॥ नरदेह पावो १उचपणाने - नदीला मिळणारे जोदेवाले, लहान प्रवाह नदीला पाणी चढू लागले झणजे या लहान प्रवाहात नदीचे पाणी पसरते ३ धुमारळ, गोंधळ, पढाळी, दाडगाई ४ सुसस्वार्थ ५ निजात्मसुखाचा स्वरूपाची. ६ माग, याग, पत्ता ७ शेवट, उपसहार ८ आत्मसवी ९ सत्वरजतमानी युक्त १० मायागुणानी घडवून आणिल ११मायेला वागविणारा १२ गुणातीत