या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८६ एकनाथी भागवत. आह्मी स्वैरिणी । स्वेच्छा परपुरुपगामिनी । आमुचा विश्वास मनी । झणी न मानी नृपनाथा ॥ ९५ ॥ आह्मां प्रमदाच्या संगतीं । राया ठेकले नेणों किती । आता सांडनि आमची आसकी । होई परमाधी विरक्त ॥९६॥ वहु काळ भोगितां माझ्याशी भोग । अद्यापि नुपजे तुज विराग । कामासक्ति सांडूनि सांग । साधी चांग निजस्वार्थ ॥ ९७ ॥ राजा ग्लानि करी अनेग । एक वेळ निजागें अंग । मज देई अंगसग । सुखसभोग भामिनी ॥ ९८ ॥ निकट देखोनि ग्लानीसी । कृपेने द्रवली उर्वशी । मग ते आपुल्या पूर्व वृत्तांतासी । रायापाशी निवेदी ॥ ९९ ॥ मी स्वांगना अतिसुरूप । मज घडला ब्रह्मशाप । तूं महाराजा पुण्य पुरुप । सगें निःशाप मी झाले ॥ १०० ॥ तुझेनि सगें मी निधूत । शाप निस्तरले समस्त । मज तुज सग न घडे एथ। मी असे जात स्वर्गासी ॥१॥ऐकोनि उर्वशीचे वचन । राजा विरहें करी रुदन । तेव्हां कळवळले तिचें मन । त्या उपाय पूर्ण दाविला ॥२॥माथूनियां गंधर्वांसी । अग्निस्थाली दीधली रायासी । यावरी करूनि यागासी । मज पावसी महाराजा ॥ ३ ॥ उर्वशीवियोगें व्यथाभूत । अग्निस्थाली उपेक्षुनि तेथ । राजा निजमदिरा येत । गोकाकुलित अतिदुःखी ॥ ४ ॥ सर्वशीची व्यथा रायासी । स्वमी देखिले तियेसी । त्वरेने पाहूं आला स्थालीसी । तंव देखे अश्वत्थासी शमीगर्भा ॥ ५॥ त्याच्या अरणी करूनि देख । यज्ञाग्नि पाडिला चोख । यजूनि पावला उर्वशीलोक । कामसुखभोगेच्छा ॥ ६ ॥ भोग भोगिता उर्वशीसी । विरक्ति उपजली रायासी । तो जे बोलिला अनुतासीं । ते ऐक तुजसी सागेन ॥७॥ अठरा श्लोकांचे निरूपण राजा वोलिला आपण। आठश्लोकी अनुताप पूर्ण । तेचि श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥८॥ ऐल उवाच-अहो मे मोहविस्तार कामकश्मरचेतस । देव्या गृहीतकण्ठस्य नायु सण्डा इमे स्मृता ॥ ७ ॥ ऐलगीताचा अनुताप । नाशी अगम्यागमनपाप । करी श्रोत्यासी निष्पाप । साधका कंदर्प बाधीना ॥९॥ जेवी मैदगज गजीसंगी । नाना आपत्ति स्वयें भोगी । तेवीं उर्वशीच्या सभोगी । झाला विरागी पुरूरवा ॥ ११० ॥ जो उर्वशीलागी अनुरक्त । तोचि तिसी झाला विरक्त । तेणे वैराग्ये अनुतापयुक्त । स्वयें वोलत ऐलरावो ॥ ११॥ माझ्या मोहाचा विषयविस्तार । कामासक्त कामातुर । कुश्चित कंदांचे घर । म्याचि साचार सेविले ॥ १२ ॥ उर्वशीकामें अतिआसक्त । कामातुर झाले चित्त । तेणे म्या जोडिला अनर्थ । थितें केले व्यर्थ आयुष्य ॥ १३ ॥ उर्वशी कंठसल्लग्नं शस्त्र । आयुष्यच्छेदी सतेजधार । छेदिले आयुष्य अपार । ते मी पामर स्मरेना ॥ १४॥ कांताआलिगन विषवल्ली । म्या कंठी घातली सकाम भुलीं। तिणे आयुष्याची होळी केली । विवेक समूळा गिळिला ॥ १५॥ कामिनीकामआलिगनी । कंठी पेटविला दावानी । तो धडाडिला आयुप्यवनी । विवेकअवनी जाळित ॥ १६ ॥ नरदेही उत्तमोत्तम । अमूल्य आयुप्य केले भस्म । जळो जळो माझें कर्म । निंध अधर्म तो एक ॥ १७ ॥ नरदेहीच्या आयुष्यपुष्टी । साधक रिघाले वैकुंठी । ज्ञाते ब्रह्म होती उठाउठी । तें म्या कामासाठी नाशिले ॥ १८ ॥ १ खच्चदाने वागणाऱ्या स्त्रिया २ फसले ३ जवळ, निलाग ४ पावन ५ अग्निपार ६ टाकून ५ शमी आहे गाँत ध्याच्या अशा अश्वत्थाला ८ वेश्या च परागना चाच्या सभोगाची पातक ९ उन्मत्त हत्ती १० आसक्त ११ पश्चात्तापान १२ अमगळ १३ प्राप्त झालेल १४ गळ्याला लागलेले १५ तिखट धारेच १६ विपयाला भुल्न १७ विवेकाची जमीन