या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत निःशेख । तरी सत्संग न धरितां देस । केवी साधक सुटतील ।। ३१० ॥ सत्संगेंवीण में साधन । तेंचि साधकां दृढ बंधन । सत्सगेंविण त्याग जाण । ते सपूर्ण पासंड ॥ ११ ॥ चित्तविपयांचा सबंध । गांठी वैसल्या सुवद्ध । त्यांचा करावया छेद । विवेकें विशद निजसाधू ॥१२॥ सतांच्या सहज गोठी । त्याचि उपदेशांच्या कोटी । देहात्मता जीवगाठी । बोलासाठी छेदिती ॥१३॥ भाव धरिल्या सत्सगती । साधकां भवपाशनिर्मुक्ती। यालागीं अवश्य बुद्धिमंती । करावी संगती संतांची ॥ १४ ॥ त्या संतलक्षणाची स्थिती। अतिसाक्षेपें श्रीपती । आदरे सागे उद्धवामती । यथानिगुती निजवोचें ॥१५॥ सन्तोऽनपेक्षा मचित्ता प्रशान्ता समदर्शना । निर्ममा निरहद्वारा निन्दा रिपरिपार ॥ २७ ।। साधूंचे अमित गुण । त्यात मुख्यत्वें अष्टलक्षण । निवडूनि सांगे श्रीकृष्ण । ते कोण अवधारी ॥ १६ ॥ प्राप्ताप्राप्तलाभावस्था । वायूं न शके साधूंच्या चित्ता । चित्त रातले भगवंता । निरपेक्षता या नाव ॥ १७ ॥ पैले विपयो मज व्हावा । ऐसा आठव नाट्ने जीवा । हा साधूचा निरपेक्ष ठेवा । जाण उद्धवा गुण पहिला ॥ १८ ॥ चित्तं चिंतावे चैतन्य । याचि नांवे मच्चित्तपण । याचि नांवे निरपेक्ष पूर्ण । इतर चितन भवबंधू ।।१९।। निरपेक्ष व्हावया एथ । जागृतिस्वमसुषुप्तीआंत । चिन्मात्री जडले चित्त । या नांय मच्चित्त गुण दुजा ।। ३२० ।। देह झालिया लक्ष्मीयुक्त । अथवा हो का आपमुक्त । चित्त परमानदी निश्चित । या नाव मञ्चित्त उद्धवा ।। २१ ॥ कामलोभादिदोपरहित । परमानंदी जडले चित्त । शांतिसुखबासे बसे तेथ । यालागी प्रशांत बोलिजे त्यासी ॥ २२ ॥ जरी प्राणांत केला अपकार । तरी न ह्मणे हा दुष्ट नर । अपकान्या करी अतिउपकार । प्रशांतिप्रकार या नाव॥ २३ ॥ जरी ठकूनि सर्वस्व नेले।तरी क्षोभेना दोपवळें । तें जाणे ब्रह्मार्पण झाले । येणे अंगा आले प्रशांतत्व ॥ २४ ॥ ब्रह्मभावचि तत्त्वता । विश्वासणे सर्व भूतां । कदा विकल्प नुपजे चित्ता । हे प्रशांतता गुण तिजा ॥ २५ ॥ ऐसा हा प्रशाततागुण । अंगी बाणावया हेचि कारण । जगी देखे समदर्शन । ब्रह्म परिपूर्ण समसाम्ये ॥ २६ ॥ जग पाहता दिसे विषम । विपी देखें सम ब्रह्म । तोचि समदर्शी परम । हा गुण निरुपम पै चौथा ॥ २७ ॥ हे समदृष्टी यावया हाता । भावें भजोनि भगवंता । निशेप त्यजिली अहंममता । हेही कथा अवधारी ॥ २८ ॥ धरितां देहाचा अभिमान । ते अहंता वाढवी मीपण । मीपणे ममता जाण । बाढे सपूर्ण देहसंबंध्या ॥ २९ ॥ जे वाढली अहंममता । ते वर्तवी महादुःखवार्ता । तिची निवारावया निजव्यथा । सद्भावे माथा गुरुचरणीं ॥३३०॥ गुरुकृपा झालिया पूर्ण माझे देहींचे मीपण । ते उकलोनि दाविता जाण । जग संपूर्ण मी एक ॥३१॥ जे जे सौन थोर दिसे दृष्टी । ते ते अवघे मीचि सृष्टी । माझ्या मीपणाची निजपुष्टी । घोटीत उठी त्रैलोक्य ॥ ३२॥ ऐसा मीपणे मी परिपूर्ण । तेथ मी ह्मणावया हाणते कोण । नि.शेप निमाले मीतूपण । निरभिमान या नाव ।। ३३ ।। ऐसे माझे मीपण पाहता । समूळ हारपली ममता । है माझं ह्मणानया पुरता। ठाव रिती नुरेचि ॥ ३४ ॥ माझ्या मीपणावाहिर । ज ममता १ ससाराच्या बधनापासून मुचाता २ प्रणता. समदशिन ३ लाभ होवो किवा न होवो ४ रातल. ५ पलोकउया मनास्वरूप आपत्तीने जडलेला ८ मृत्य येणारा ९ द्वत व द्वद यानी भरलेले १० मोठ्या दुसाच्या भोवन्यात ११ उपट करून १२ खल्प, चोट १३ व्यापीत १४ विरून गेलें १५ मोकळा