या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सविसावा, ७०१ सगें ॥ २५ ॥ परी ये नावेची नवलगती । वरी चढले ते वुडती। तळीं राहिले ते तरती। जाण निश्चिती उद्धवा ॥ २६ ॥ दीनाचा कळवळा पहा हो । हाचि मुख्यत्वे तरणोपाको। त्या कळवळ्याचा अभिप्रायो । स्वयं देयो सागत ॥ २७ ॥ भर हि प्राणिना प्राण आर्ताना शरण स्वाहम् । धर्मों वित्त नृणा प्रेत्य स तोवर्धायिभ्यतोऽरणम् ॥ ३३ ॥ जेनी अन्नेबीण प्राण । सर्वथा न वांचती जाण । प्राण्यांचे प्राणपोपण । करावया सामर्थ्य पूर्ण अन्नी नादे ॥ २८ ॥ जोडली धर्माची सपत्ती । ते इहलोकी होय रक्षिती। तेवीं धर्मधन देहाती । उत्तम गतिदायक ॥ २९ ॥ ससारी पीडिले दारुण । त्रिविध तापें तापले यूर्ण ऐसिया शरणागता शरण्यामी नारायण रक्षिता ॥ ४३०॥ माझंकरिता नामस्मरण। सहजे निवारे जन्ममरण । त्या मज रिघालिया शरण । वाधी दुस्स कोण वापुडे ॥३१॥ दुसभय न पायता आधी । जिहीं साधु सेविले सदुद्धी । त्यासी भवभयाची आधिव्याधी । जाण त्रिशुद्धी वाधीना ॥ ३२ ॥ प्राणियासी होता पतन । भाग्य भेटल्या सज्जन । निजकृपेने अधोगमन । जन्ममरण छेदिती ॥ ३३॥ ससार तरावया जाण । सत्सगतीचि प्रमाण । त्यांचे भावे धरिता वरण । दीनोद्धरण त्याचेनी ॥ ३४॥ सम्तो दिशन्ति चक्षुपि यहिर समुस्धित । देवता बान्धवा सन्त सन्त आत्माऽहमेव च ॥ ३४ ॥ जेवीं आधारेंसी सगळी राती । निजतेजे निरसी गभरती । सत्सगसूर्यप्राप्ती । अविधेची निश्चिती निरसी निशा ।। ३५ ।। वाह्य उगपल्या गभस्ती । चोरभयाची होय निवृत्ती । तेषी जोडल्या सत्सगती । भवभय कल्पाती असेना ॥ ३६ ॥ वाह्य सूर्योदयकाळी । पक्षी साडिती आसोळी । सत्सगसूर्याचे मेळीं । देहाची आसोळी । साडिती जीर ।। ३७ ॥ बाह्य सूर्याच्या किरणी । हर्षे विकासे कमळिणी । सत्सगसूर्याचे मिळणी । निर्विकल्प कमळिणी विकासे ॥ ३८ ॥ सूर्य उगवलिया गगनीं । चक्रवाके मिळती मिळणीं। तेवीं सत्सग पायोनी । जीव शिव दोनी एकवटती ॥ ३९ ॥ वाह्य सूर्याचे पहाटेसी । पाधिक चालती स्वग्रामासी । सत्सगसूर्याचे प्रकाशी । मुमुक्षु निजधामासी पावती ॥ ४४० ॥ चाय सूर्याचे उदयस्थिती । कर्माची चाले कर्मगती । सत्सगसूर्याचे सगती। निष्कर्मप्रवृत्ति प्रवर्ते ॥४१॥ सूर्यविवाचे उद्यसधी । अर्घ्यदानादि जे वेदविधी । सल्मगसूर्याचे संबंधी । दीजे देहबुद्धी तिलाजळी ॥ ४२ ॥ सूर्यउदयाचिया प्राप्ती । याज्ञिक होमातें हविती । तेवी सत्सगसूर्यस्थिती । अहंता हविती ज्ञानानीं ।। ४३ ।। सूर्य उगवूनि आकाशी । जगाची जड निद्रा निरसी । सत उगवूनि चिदाकाशीं । जीवा चित्मकाशी प्रयोधी ॥ ४४ ॥ हो का साधु सूर्यासमान । हे बोलणे निलांग हीन । सूर्यो पावे अस्तमान । साधु प्रकाशमान सर्वदा ॥ ४५ ॥ सूर्योसी आच्छादी आभाळ । साधु सदा जनी निर्मळ । सुयोसी सदा भ्रमणकाळ । साधु अचचळ भ्रमणरहित ॥ ४६॥ ग्रहणकाळाचा १ रक्षण करणारा २ निवारूनि ३ असारसगतीपासून भ्यालेल्यास आश्रय सतच होत ४ अधकारासह सब रान आपल्या वेजार्ने सूर्य निरसितो ५ घरटी, कोठे, अनिसाळ किवा आसोळी हे दो हीही पाट आहेत व ते बरोनर आहेत -"का महारक्षी अक्सिाळें । पक्षिजातींची-ज्ञानेश्वरी अध्याय ११---१२८ "साडिती देहाइची अविसालें। जीवपक्षी"--झानेश्वरी अध्याय १६-३, आविसाळी ६ समागमात ७ भविद्येसहित आत्मा तो जीव, व अविद्यारहित तो शिव हे दोनी ८ उगवण्याव्या वेळेस ९ देहात्मयुद्धीचा लोप होतो १० निराश्रय, निराधार ।