या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

وا एकनाथी भागवत. मुख्यत्वे पूज्य ब्राह्मण । तें सातवें पूजास्थान । उद्धवा जाण अतिश्रेष्ठ ।। ७४ ॥ सकळ पूज्या पूज्यत्वे पूजा । जो वरिष्ठा वरिष्ठत्वे वोजा । जो विनटता आत्मा माझा । वंद्य गुरुराजा सर्वासी ॥ ७५ ॥ सद्भावे ज्याचे धैरितां चरण । मी सुखाचे ब्रह्म पूर्ण । ज्याचें करितां स्तवन । मी परमात्मा जाण उल्हासे ॥ ७६ ॥ सद्गुरूचे नामस्मरण । निर्दळी भव. भय दारुण । निधारोनि जन्ममरण । निववी संपूर्ण निजबोधे । ७७ ॥ तो मी परमात्मा नारायण । गुरुरूपें प्रकटोनि जाण । परब्रह्माचे पूर्णपण । शिप्यद्वारा सपूर्ण प्रकाशक ॥ ७८ ॥ ब्रह्माचें परब्रह्मपण । सद्गुरूचेनि सत्य जाण । एव्हडे अगाध महिमान । अतिगहन गुरूचे ॥ ७९ ॥ एवं सद्गुरु ज्ञानघन । जो हरिहरां वंद्य पूर्ण । तो माझें सद्रूप अधिष्ठान । हे पूजास्थान आठवे ॥८०॥ हे आठवे पूजास्थान । तें अखंड आठवे आठवण। तेणे आठवे साझ सपूर्ण । उद्धवा जाण मी पूजिलों ॥ ८१॥ एवं ही आठही पूजास्थाने । तुज सागीतली सुलक्षणे । तेथली पूजेची लक्षणे । तेही भिन्नपणे सागेन ॥ ८२ ॥ सकळ अधिष्ठाना गोडपण । जें पूजनी होय सपूर्ण । तें पूजेचे मुख्य लक्षण । निजवर्म खूण ते ऐक ॥ ८३ ॥ सांडूनि लोकरजनेव्यापार । त्यजूनि दांभिक उपचार । दवडूनि शठत्वाचा व्यवहार । भजनतत्पर सद्भावे ॥ ८४ ॥ हे अष्टौ महापूजास्थान । येथ अमायिक जें जे भजन । तें तें अतिगोड पूजन । उद्धवा जाण निश्चित ।। ८५ ॥ एथ निष्कपट जे जे सेवा । ते ते अतिवल्लभ देवाधिदेवा । आतां पूजाविधि आधवा। ऐक वरवा सागेन ॥८६॥ पूर्व मान प्रकुर्वात धौतदन्तोऽशुद्धये । उभयैरपि च मान मन्नर्मद्रहणादिमि ॥१०॥ मळत्याग दंतधावन यथाकाळी करूनि जाण । देहशयर्थ करूनि स्नान । मत्तिक ग्रहणपूर्वक ॥ ८७ ॥ ऐसे झालिया मळत्यागस्नान । मग करावे मंत्रस्नान । वैदिक तात्रिक विधान । दीक्षाग्रहण यथाविधि ॥ ८८ ॥ जैसा सद्गुरुसप्रदावो । तैसा चालवावा आम्नावो। त्या विधी स्नान करूनि पहाहो । निर्मळ भावो धरावा ॥ ८९॥ सन्ध्योपास्त्यादिकर्माणि वेदेनाचोदितानि मे । पूजा से क्रपयेत्सम्यक् सङ्करप कर्मपावनीम् ॥११॥ वर्णाश्रमनिजविधींसी । वेर्दै सध्या बोलिली जैसी । ते ते वर्णाश्रमी तैसी । नित्यनैमित्येसी करावी ॥ ९० ॥ वेदोक्त आचरावे स्वकर्म । निःशेप त्यागावे निषिद्ध काम्य । या नाव शुद्ध स्वधर्म । उत्तमोत्तम अधिकारू ॥९१॥ वेदोक्त साडणे स्वधर्म । हाचि मुख्यत्वे अतिअधर्म । हाता आलिया परब्रह्म । न त्यागिता कर्म स्वयें राहे ॥ ९२ ।। स्वयें स्वधर्म जो साडणे । तेंचि अधर्माचें मुख्य ठाणे । स्वधर्मे चित्तशुद्धि साधणें । यालागी त्यागणे अहंता ॥ ९३ ॥ तेथे स्वधर्मकर्म आचरता । ऐसा भाव उपजे चित्ता । मी नव्हें एथ कर्मकर्ता । फळभोक्ता मी नव्हें ॥ ९४ ॥ देह जड़ मूढ अचेतन । त्यासी चेतवी जनीं जनार्दन । तेय माझें मीपण कर्तेपण । सर्वथा जाण रिघेना ॥९५ ॥ या बुद्धी जे कोचरण । ते भावार्थ भावी ब्रह्मार्पण । यापरी निरभिमान । माझें उपासन साधका ॥ ९६॥ माजी प्रतिमा पूजाविधान । ते प्रथम माझें पूजास्थान । ते प्रतिमाक्रियालक्षण । ऐक सपूणे उद्धवा ।। ९७॥ १ उत्तम २ अवताररूपाने नट ३ शरण जाता ४ समाधान पावतों ५ लोकाना सतोपविण्याचे सर्व उद्योग ६ कपटाचा, पसरेगिरीचा ७ ही अष्टौ पजास्थाने ८ निष्कपट, निष्काम ९ अत्यत भावडणारी १० ग्रहणादिना १५शीय १२ आनाय, वेद १३ चालवी, वागवी N