या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताविसावा. तर्पण ॥ ३९ ॥ हृदयीं जें माझें पूजास्थान । तेथें मने मनाचे अर्चन । मनोमय मूर्ति सपूर्ण । पूजाविधान मानसिक ॥ १४०॥ माझें मुख्यत्वे अधिष्ठान । ब्रह्ममूर्ति जे ब्राह्मण । तेथील जे पूजाविधान । आज्ञापालन दासत्वे ॥४१॥ ब्रह्मासी ज्याचेनि ब्राह्मण । तो सद्गुरु माझें पूजास्थान । सर्वार्थी श्रेष्ठ पावन । तेथील पूजन ते ऐसे ॥ ४२ ॥ जीवे सर्वस्वेंसी आपण । त्यासी रिघावे अनन्य शरण । त्याच्या वचनासी प्राण । निश्चयें जाण विकावा ॥ ४३ ॥ गुरूची नीचसेवा सेवन । आवडी करणे आपण । हेचि तेथील पूजाविधान । येणे सुस सपूर्ण साधका ॥४४॥ सद्गुरसेवा करितां पाही । ब्रह्मसायुज्य लागे पायीं । गुरुसेवेपरते काही । श्रेष्ठ नाहीं साधन ॥ ४५ ॥ सद्गुरुस्वरूप ते जाण । अखडत्वें ब्रह्म पूर्ण । तेथे आवाहन विसर्जन । सर्वधा आपण न करावे ॥४६॥ निष्कपटभावे संपूर्ण । सद्गुरूसी जो अनन्य शरण । त्याचे मीही वदी चरण । येथवरी जाण तो धन्य ॥५७ ॥ निर्लोभभावे सहज । पूजिता तोपे अधोक्षज | त्या भावाचें निजगुज । स्वयं यदुराज सांगत ।। ४८ ।।। श्रद्धयोपाहत प्रेष्ठ भक्तेन मम वार्यपि ॥ १७ ॥ भूयंप्यभत्तोपहत ने मे तोपाय करपते । गन्धो धूप सुमनमो दीपोऽनायचे किचन ॥ १८ ॥ माझ्या ठायीं अतिप्रीतीं । श्रद्धायुक्त अनन्य भक्ती । भक्त भावे जळ अर्पिती । तेणें मी श्रीपति सुसाचे ॥ ४९ ॥ तो जळविंदु यथासुखें । म्या मुखीं झेलिजे आदिपुरुखें । तंग भक्तिभावाचेनि हरिखें । मी सुखरूप सुखें सुखावे देख ॥ १५० ।। माझं त्रैलोक्यासी सुख । ऐसा मीही सुखरूप देख । त्या मज होय परम सतोख । भाविकांचे उदक सेविता ॥५१॥ त्या जळपिदचिया साठी । रमा नायडे गोमटी । ब्रह्मा जन्मला माझे पोटी । तोही शेवटी नावडे ॥५२॥ भाविकाचेनि उदकलेखें । मज वैकुठही झाले फिर्के । शेपशयनींची निन्द्रासुखें । त्याचीही तुकें उतरली ।। ५३ ।। भाविकाच्या उदकापुढे । मज आणिक कांही नावडे । तेयही गधादि पूजा जोडे । नैवेद्य चोखंडे रसयुक्त ॥ ५४॥ ते पूजेचिये सुखमाती । उपमा नाही त्रिजगती । ऐसा भाविकांचिये भक्ती । मी श्रीपति सुखावें ॥ ५५ ॥ भावे करिता भगवद्भक्ती । मी कृतकृत्य झालों निश्चिती । ऐशिया निश्चयें जो भावार्थी । त्याचेनि जळें सतृप्ति मज होय ॥५६॥ येर जो अभक्त दंभस्थिती । जीनी द्रव्याशा वाह्य विरक्की। लौकिकप्रतिछेपुरती । माझी भक्ति जो मिरवी ॥५७॥ ऐशिया अभताचिया स्थिती।छत्रचामर गजसपत्ती । मज आर्पिताही अभक्ती । सुखलेश चित्ती उपजेना ॥ ५८ ॥ क्षीरनीर निवडी राजहस । तेथ नितूं" दीधला कापुस । तेनी अभकजनी सतोप । मी हपीकेश पावेना ॥ ५९ ॥ कागाची गायनकळा । जेवीं तोपेना किन्नरशाळा । तेनी अभक्ताची भजनलीला । माझी चिकळा तोपेना ॥१६०॥ जेवीं रजस्वलेचे पकान । उत्तम परी ते अतिहीन । तेवीं अभक्ताचे भजन । कदा जनार्दन स्पर्शेना ॥ ६१ ॥ ज्या भजना नातळे नारायण । ऐसे में अभक्तांचे भजन । तेणे भजने जनार्दन । अणुमात्र १ नित्य सेवा, किंवा झाडसारवण वगैरे प्रकारची १ ग्रहाशी ऐक्य ३ मायाभावाचे ४ फाल्ल्यते ५कि पुन ६ मोदया माा ७ मुदर ८ जलविदों, उदकतोसे तुच्छ १ महले ११ चांगटे १२ मनात, पोटात १३दूष म पाणी १४ निवडप्यावारिता, सरकी काढण्यासाठी १५ कायन्याची. १६गबईमसळी,