या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सत्ताधिमावा. पिण्डे वाम्बनिसशुढे हत्पमस्या परा मम । अण्वी जीवकला ध्यायेनाटान्ते मिद्धभाविताम् ॥ २३ ॥ वायुवीजें आवाहूनी । पिंगला प्राण पूरूनी । तोचि कुंभके संभूनी । मात्राधारणी धरावा ॥ ८२॥ वायु जो धारणा धरावा । तो जव फुटेना अव्हासव्हा । तंवचिवरी निरोधावा । मग रेचावा गनाशनः ॥ ८३॥ ऐसे करितां प्राणधारण । स्वयें कल्पाचे शरीरशोपण । शरीर शोपले मानूनि जाण । देहदहन माडावें ।। ८४ ॥ आधारस्थित जो अग्नी। तो अग्निवीजे चेतवूनी । तो देह लावूनि दहनी । भस्म मानूनी निजदेह ।। ८५ ॥ देह दहनें अतिसतप्त । तेथ चंद्रबीजे चंद्रामृत । आणोनि निववावें समस्त । नवा देह तेथ कल्पावा ।। ८६ ॥ देह कल्पावा जो एथ । पूर्ण पाटवे इद्रिययुक्त । त्याच्या हृदयपद्माआत । अण्वी जीवकळा तेथ पहावी माझी ॥ ८७ ॥ माझी जीवकळा परम । सूक्ष्माहूनि अतिसूक्ष्म । यालागी अण्वी तिचे नाम । विश्रामधाम जगाचे ॥ ८८ ॥ अकार उकार मकारस्थिती । यातें प्रकाशे अण्वी जीवज्योती । ते तंव शब्दाहनि परती । योगी नादाती लक्षिजे ।। ८९ ॥ ते देहीं सवाह्य परिपूर्ण । असोनि सूक्ष्मत्वे अलक्ष्य जाण । तीते हृत्पनी योगिजन । लक्षिती आसनप्राणायामें ।।१९० ॥ ते अण्वी जीवकळा अव्यक। तीते करोनियां व्यक्त । योगी निजभावयुक्त । हृदयीं चिंतित महामूर्ती ।। ९१ ।। नारा जीवसमूह जाण । त्याचे जे आर्यतन स्थान । ते महामूर्ति श्रीनारायण । हृदयीं सज्जन चितिती ॥१२॥ __ सवाऽऽस्मभूतया पिण्डे च्यासे सपूज्य तन्मय । आवाह्याचादिपु स्थाप्य न्यस्ताङ्ग मा अपूजयेत् ॥ २५ ॥ जेवी गृह प्रकाशी दीपस्थिती । तेवी देह प्रकाशी जीवज्योती । ते सागोपांग माझी मूर्ती । हृदयीं चिंतिती साकार ॥ ९३ ॥ जेवीं तूप तूपपणे विजले । तेंचि अवर्ण वर्ण. व्यक्ती आले । तेवीं चैतन्य माझं मुसावले । लीलाविग्रह झाले साकार ॥ ९५ ॥ ऐशी ते माझी सगुण मूती । चिन्मात्रतेजे हृदयदीप्ती । तिणे व्यापूनि देहाची स्थिती । चित्ती निजभक्ती उपजवी ॥ ९५ ॥ देह जड मूढ अचेतन । तेय मूर्ति प्रकटोनि चिद्धन । अचेतना करोनि सचेतना करवी निजमजन उल्हास ||९६॥ जेवी हरणलीचे सांग जाण । हरिणीरूपे नाचे आपण । तेवी भक्तभावे नारायण । भजनपूजन स्वयें कर्ता ॥ ९७ ॥ यापरी अभेदभजन । भूर्ति पूजिता चिद्धन । पूज्य पूजक हे आठवण । सहजे जाण मागळे ।। ९८ ॥ मावळल्या हा भजनभेद । उल्हासे भक्तीचा अभेदवोध । हा गुरमार्ग अतिशुद्ध । प्रिय प्रसिद्ध मजलागीं ॥ ९९ ।। जेथ माझी अभेदभक्ती । तेथ मी सर्वस्वं श्रीपती । आतडलों भक्ताच्या हाती । स्वानंदप्रीती उल्हाम ॥२०॥जेवी का अफाट मेघजळा । धरण बांधोनि घालिजे तळा । तेवीं मज अनता एकवळा । अभेदभजनाला आतुडे ॥१॥ आडवीं वर्षले मैरी जळ । तेणे नुपजेचि उत्तम फळ । तंचि तळा भरलिया प्रबळ । तेणें पिकती केवळ राजांगरें ।। २ ।। तैसे माझें स्वरूप वाकोडे । अभेदभक्ती १ भरत्याच मागौन, माडवातिदना २ गोहा यावा ३ हळू हळू ४ अमान ५निपुगवार, कोशल्याने , सनिसूक्ष्म ७ प्रणवाचे जे पाय भाग अकार, उकार, मकार, विंदु, व नाद, त्यातल्या पारच्या नादाच्या गती हसरामात नारायणाचं ध्यान करितात ८ इद्रियास गोचर न होणारी नाना १० राहण्याच स्वत ११ मुशीत रम होका गोटा होणे. १२ लीलेने धारण केलेल्या शरीराने १३ साघीन सालों १४ रानात अपरपार पाऊस पडला १५रायमोग, साइक,