या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७१६ एकनाथी भागवत. धरी नामें । भक्त मनोधर्मे तरावया ॥ २५० ॥ निर्गुणी लागल्या मन । मनचि होय चैतन्यधन । सगुणी उसावल्या मन । साधक श्रीकृष्ण स्वयें होती ॥ ५१ ॥ निर्गुणाचा बोध अटकायालागी उपासनाविवेक । सगुणमूर्ति भावूनि देख । तरले साधक अनायासे ॥५२॥ हे आगमोक्त उपासनाविधी । येणे भोगमोक्ष उभयसिद्धी । साधक पावती त्रिशुद्धी। मी कृपानिधि सतुष्टें ॥ ५३॥ तेंचि उपासनविधिविधान । मागा सांगता पूजन । देव सिहासनी बैसल्या पूर्ण । पुढे आवरणपूजा ऐक ॥ ५४॥ सुदर्शन पाञ्चजन्य गदासीपुधनुहलान् । मुसल यौस्तुभ माला श्रीवत्स चानु पूजयेत् ॥ २७ ॥ अण्वी जीवकळेसी देहावरण । सिंहासनी शक्त्यावरण । सुदर्शनादि आयुधावरण । आपुली आपण हरि सांगे ॥ ५५ ॥ सतेज धार सुदर्शन । शंख शोभे पांचजन्य । नंदक तो खड्ग जाण । गदा गहन कौमोदकी ॥५६॥ शार्टी धनुष्य अतिसवळ । सुवर्णपुंस वाण सरळ । हल आणि मुसळ । आयुर्धे प्रवळ पूजावी ॥ ५७॥ या आठही भुजा सायुधा सरळा । कंठी कौस्तुभ वनमाळा । कासे कशिला पीतांबर पिवळा । धनश्याम सावळा शोभत ॥ ५८ ॥ ब्रह्मण्यदेव रमानाथ । ब्राह्मणाचा चरणघात । हृदयीं अळंकार मिरवत । शोभा अद्भुत तेणे शोभे ॥ ५९ ।। चिद्रनाच्या अळंकारी । गुण काढोनिया बाहेरी । वोविली वैजयंती कुसरी । ते हृदयावरी रुळत ॥ २६०॥ यापरी साळंकार सायुध । शंखचक्रपद्मेसी अगाध । ऐसा गोमला स्वयंबोध । नारदादि सनिध तिष्ठती सदा ॥ ६१ ॥ यापरी सालं. कार सायुध । पूज्य पूजोनिया गोविंद । मग पूजावे पार्पद । ऐक विशद सांगेन ।। ६२॥ नन्द सुनन्द गरड प्रचण्ड चण्डमेव च । महाबल यल चैव कुमुद कुमुदेक्षणम् ॥ २८ ॥ नंद सुनंद देवापाशीं । गरुड सदा तिष्ठे दृष्टीसी । चंड प्रचंड दोहीं चाहींसी । अह निशी तिष्ठती ॥ ६३ ।। वळ आणि महावळ । सुमुखसज्ञे अवर्धानशीळ । कुमुद कुमुदाक्ष केवळ । पाठीसी प्रबळ _ळे उभे ॥ ६४ ॥ गरुड दृष्टी तिष्ठे आपण । येर नंदोदि जे अष्टी जन । ते अष्टौ दिशाप्रति जाण । पार्पदावरण हरिनिकटीं ॥ ६५॥ दुर्गा विनायक व्यास विष्वक्सेन गुरून सुरान् । स्वे से स्थाने त्वभिमुखान् पूजयेत्प्रोक्षणादिमि ॥२९॥ दुर्गा विनायक जाण । व्यास आणि विष्वक्सेन । चहूं कोनी चारी स्थापन । करावे पूजन देवाभिमुस ॥ ६६ ॥ मूळमूर्तीसी अभिन्नाकारू | गुरु आणि परमगुरू । परमेष्ठिगुरूसी एकाकारू पजाप्रकारू करावा ॥१७॥ इंद्रादि अष्टौ लोकपाल आदाननिया सकळ । स्थापूनि अष्टौ दिशा केवळ । तेही तत्काळ पूजावे ।। ६८ ॥ गुरुदुर्गादिक लोकपाळ । पूजावे सागोपाग सकळ । प्रोक्षणपाद्यादि अविकळ । पूजा निश्चळ करावी ॥ ६९॥ तेचि पूजेचे पूजोपचार । कोण कोण पै प्रकार । तो ये श्लोकी शार्ङ्गधर । सक्षेपाकार सागत ॥ २७० ॥ १निगुणाच ज्ञान धारणे ह कठिण असत्यामळे उपासनामार्गाचा विचार सागितरा आहे २ मुवाच पिसार ज्यास बाहन असे ३ नागर ४ आठही आयुधे आठ दिशाकडे, व कौस्तुभ, वनमाला, व श्रीवत्स, हीं वक्ष स्थलावर पूजावात ५ कमरेला ६ चातुचाने ७ वाजूस ८ उमे राहतात . समोर उभे राहन आज्ञा शेलण्यास तत्पर आहेत १० उमे असता ११ समोर १२ पापदगण १३ आठ दिशाकडे १५ आवाहन करून १५ सर्व उपचारयुक्त