या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१८ एकनाथी भागवत. सदन्न रसयुक्त ॥ २९० ।। मांडा साकरमांडा गुळवरी । शकुल्या अमृतफळे क्षीरधारी। दुधामाजी आळिली क्षीरी । वाढिली परी वळिवट ॥ ९१ ॥ मधुवडा कोरवडा । लाडू तिळवयांचा जोडा । रुची आला अववडा । ठायापुढां बादिनला ॥ ९२ ॥ पत्रशांकांची प्रभावळी । भात अरुवार जिरेसाळी । शुभ्र सोलीव मुगदाळी । गोघृत परिमळी सधस्तप्त ॥५३॥ साजा सडीव गुळयुक्त । एळी मिरे घालूनि आंत । पाक केला धृतमिश्रित । सेवितां मुसांत अरुवार ॥ ९४ ॥ कर्थिका तकाची गोमटी । आबरसे भरली वाटी । शिखरणी केळ्याची वाढिली ताटी । देखोनि लाळ घोंटी अमरेंद्र ॥ ९५ ॥ दधि दुग्ध साय साकर। नैवेद्या वाढिले परिकर । देव न पाहे उपचार । श्रद्धा श्रीधर तृप्त होय ॥९६ ॥ सामर्थ असले करावयासी । तरी हे परवडी प्रतिदिवसीं । नैवेद्य अर्पावे देवासी । नातरी पर्व. विछोपी अर्पावे ॥ ९७ ॥ उपास्यमूर्ति जे साचार । ते जयंतीस सविस्तर । पर्वविशेपी उपचार । पूजा अपार हरि सागे ॥ ९८ ॥ अभ्यगोन्मर्दनादर्शद तधावामियेचनम् । अन्नाद्य गीतनृत्यानि पर्वणि स्युरतान्यहम् ॥ ३५॥ पर्व वोलिली आगंमोक्ती । अथवा वार्पिक पर्वं येती । कां निजमूर्तीची जयंती । ते पूजा श्रीपति स्वयें सागे ।। ९९ ॥ दतधावन उद्वर्तन । मूर्तीसी द्यावे अभ्यंजन ! पंचामृतें करूनि स्नान । विचित्राभरण पूजावी ॥ ३०० ॥ पूजोनि साळंकृत देवासी । नैवेद्य अर्पावे पडूसी । देऊनि करोद्वर्तनासी । मुखैवासासी अर्पावे ॥१॥ देव विसरला देवपणासी । तें देवपण भेटे देवासी । ऐशिया दाखवावे आदर्शासी । तेणे देवदेवासी उल्हासू ॥२॥ पर्वविशेपी जयंतीसी । मेळवूनि सतवैष्णवांसी । करावे गीतनृत्यकीर्तनासी । अतिमेसी अहोरात्र ॥३॥ आगमोक्त दीक्षा हवन । करिता तत्काळ देव प्रसन्न । त्या होमाचे विधिविधान । ऐक सावधान उद्धवा ॥४॥ विधिना निहिते कुण्हे मेसरागर्तवैदिभि । अनिमाधाय परित समूहेपाणिनोदितम् ॥ ३६॥ परिम्तीथि पर्युक्षेदन्वाधाय यथाविधि । नोक्षण्यासाद्य द्रव्याणि प्रोक्ष्यासौ भावयेत माम् ॥ ३७॥ आगमोक्त कुंडविधान । लाबी रुदी खोली कोण । गणूनि उंचीचे प्रमाण । कुड सपूर्ण साधावे ॥ ५॥ स्वशाखा जे वेदप्रोक्त । मेखळायुक्त साधावी गर्त । योनीसकट वेदी तेथ । लक्षणोक्त साधावी ॥ ६॥ तेथ करूनि आवाहन । प्रतिष्ठिला जो हुताशन । त्यासी करूनि करस्पर्शन । परिसमूहन करावे ॥ ७ ॥ दी करावे परिस्तरण । मग करावे पर्युक्षण । इध्मावर्हि विसर्जन । त्रिसधान ठेवावें ॥८॥करूनि वहींचें आस्तरण । करावें आज्यस्थालीस्थापन । व्याहृती समिधाहोम जाण । अन्वाधान त्या नाय ॥ ९॥ प्रोक्षणी पात्रींचे विधान । करूनि भरा जळ पूर्ण । तेणे कुशाग्रजळे आपण । होमद्रव्यं जाण प्रोक्षावीं ॥ ३१० ॥ कुंडी प्रदीप्त हुताशैन । तेथ करावें माझं ध्यान । ते ध्यानमूर्तीचे लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सागत ॥ ११ ॥ १ करज्या २ पालेभाज्याची पक्कि ३ बारीक (तादुळाचाच हलका ४ गायीचे साजूक भुगध तृप ५ वेलची, बेलदोडे ६ ताकाची कडी आल्याच्या रसाने ८ प्रकार ९ अन्नाद्यगीत १० तत्रात सागितलेली ११ दात घासणे, १० हात धुण्यासाठी न्यदनादि देणे १३ मुखशुद्धीसी १४ वेदात हाणले गृह्यसलात जो विधि सागितला आहे त्यात माणे, मेखला, गर्त, योनि व बेदी, यानी युक असे यथाप्रमाण कुड घालाव' १५ अभीची प्रतिष्ठापना, अग्न्याधान १६ गोवतारी तीन वेळ मोल्ड हात फिरविणे १७ समोवती चारी दिशाला चारचार दर्भ टाकर्ण १८ समावती पाणी निपट १९ अमि