या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

RO ७२८ एकनाथी भागवत. कल्पणे मनें ॥ ७९ ॥ अहंकाराचा डिवार । चित्ताचा चिंतनप्रकार । बुद्धीचा विवेकविचार । हा समूल व्यवहार मिथ्या तेथ ।। ८०॥ चित्री जळ आणि हुताशन । अंत्यज आणि ब्राह्मण । व्याघ्र आणि हरिण । भासतांही जाण भिंतीचि भासे ॥ ८१॥ तेवीं हा प्रपंच द्वैतयुक्त । भासतां भासे वस्तु अद्वैत । शुभाशुभ कैचें तेथ । ब्रह्म सदोदित परिपूर्ण ॥ ८२ ॥ केळीचा दिंड उकलितां । जो जो पदर तो तो रिता । तेवी देहादि प्रपंच विवंचितां । मिथ्या तच्चता मायिक ।। ८३ ।। मिथ्या प्रपंचाच्या ठायी। शुभाशुभ ते लटिक पाहीं । सत्य वस्तु ठायींच्या ठायीं । शुभाशुभ नाही अणुमात्र ॥ ८४॥ जो शुभाशुभ ह्मणे आहे । त्याची कल्पना त्यासंमुख होये । निजकल्पनामहाभयें । जन्ममरण वाहे लटिकेची ॥ ८५॥ छाया प्रत्याहयाभासा सन्तोऽप्यर्थकारिण । एष देहादयो भावा यच्छन्त्यामृत्युतो भयम् ॥५॥ जळी प्रतिविध साँच नसे । जो पाहे तो विंबला दिसे । मिथ्या प्रपंचाचें रूप तैसें । निजकल्पनावशे भासत ।। ८६ ॥ ते प्रतिबिंब पाहोनि डोळा । मी ह्मणोनि लाविजे टिळा । तेवी देहाभिमानाचा सोहळा । जीवाच्या कपाळा आदळे ॥ ८७॥ कां आपुलीचि उत्तरें । पडिसादें होती प्रत्युत्तरे । ते मिथ्याचि परी साचोकारें । श्रवणी अक्षरें उमटती ॥ ८८ ॥ निश्चळ दोराचे निजरूप । भ्रमें भासला प्रचंड सर्प । तो मिथ्या परी भयकंप । महाखटाटोप उपजवी ॥ ८९ ॥ यापरी असत देहादिक । देहाभिमाने जीवासी देख । जन्ममरणावर्त अनेक । आकल्प दुःख भोगवी ॥ ९० ॥ आत्म्यापासोनि देहादि भेद । उपजला हे बोले वेद । वेदरूपें तूं प्रसिद्ध । मिथ्या विवाद घडे केवी ।। ९१ ।। ऐसा उद्धवाचा आवांका । वेदवादाची आशंका । समूळ कळली यदुनायका । तेंचि उत्तर देखा देतसे ॥ ९२॥ आत्मैव तद्विद विश्व सूज्यते सृजति प्रभु । त्रायते नाति विश्वात्मा ह्रियते हरतीश्वर ॥६॥ तस्मासदारमतोऽन्यस्मादन्यो भावो निरूपित । निरूपितेय त्रिविधा निर्मूला भातिरात्मनि । प्रपंच प्रत्यक्ष विद्यमान । तेणे भेदयुक्त झाले मन । तेथ बोधी माझें वेदवचन । प्रपंच अभिन्न निजात्मता ।। ९३ ॥ मूळी ऊसचि वीजी विरुढे । तो उस ऊंसपणे काडा चढे । तेवीं प्रपंच वस्तुयोगें वाढे । वाकोडें तद्प ॥ ९४ ॥ जैसे सोनियाचे झाले लेणेते वर्तता वर्ते सोनेपणे । लेणे मोडलिया सोने । सोनेपणे स्वतःसिद्ध ॥ ९५ ॥ तिळाची पुतळी केली । ते तिळावयवे शोभे आली । ते मोडिता न मोडिता भली । असे सचली तिळरूप ॥ ९६ ॥ तेवी उत्पत्ति स्थिति निधन । प्रपंचासी होता जाण । तेथ आदि मध्य अवसान । यस्तु परिपूर्ण सचली ।। ९७ ॥ जे एथ भासले चराचर । तें मी आत्माचि साचार । मजवेगळा जगासी थार । अणुमात्र असेना ॥९८॥ एवं सृज्य आणि नजिता । पाल्य आणि पाळिता । सहार आणि सहर्ता । मी एकात्मता भगवत ॥ ९९ ॥ एथ उत्पत्ति स्थिति निधन । त्रिविधरूपें प्रपंच भिन्न । या सर्वासी मी अधिष्ठान । मजवेगळे १पोरवी २ निचारशीलता ३ अमि ४ साव, करांडा, सुट ५ विवस्न पाहता ६ मन कत्पित करपनच्या मातीन ७सरे ८ निघ्या ९जन्ममरणरूप भ्रमण १० देहादि पदार्थही त्याचा ल्य होइपयेत भयदायक होतात असा मूमेनठा अर्थ आहे ११ प्रपच खरूपापासन अभिा आहे, हा येथे प्रतिपादिलेला मुख्य सिद्धात लक्षात ठेवला पाहिजे १२ उगवतो १३ दागिना १४ निदान १५ अती.१६ उत्पन्न करण्याचे १७ निमोता.१८ आश्रय