या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३२ । एकनाथी भागवत. हा नसतचि परी आभासे । निद्रिता स्वप्नीअनर्थ पिसें । तेवीं संसार मायावशें । विषय आभासे भोगवी ॥ ६६ ॥ जंघ जंव विषयसेवन । तंव तंव वाढे विषयध्यान । विपयध्याने भवबंधन । सदृढ जाण उद्धवा ॥ ६७ ॥ विषयसेवनें भवबंधन । जीवासी झालें दृढ पूर्ण । तें जीवन्मुक्तासी विषयभान । दैवयोगें जाण दिसताहे ॥ ६८ ॥ जीवन्मुक्तासी विषयप्राप्ती । तेणे वुडाली त्याची मुक्ती । ऐशी आशंका न धरी चित्तीं । तेंचि श्रीपति विशद सांगे ॥ ६९॥ यथा समतिउद्धस्य प्रस्वापो यह्वनर्थभृत् । स एव प्रतिबुद्धस्स न वै मोहाय कल्पते ॥ १४ ॥ सज्ञान आणि अज्ञान । यांसी जे विषयसेवन । त्यांचा अनुभव भिन्नभिन्न । तेही लक्षण अवधारीं ॥ १७०॥ जेवीं स्वमीची विषयप्राप्ती । स्वमस्थ साचचि मानती । तेचि विषय जागृती स्फूर्ती । परी सत्यप्रतीति त्यांनाही ॥ ७१॥ तेवीं अज्ञाना विषयसेवन । तेणे विषयासक्त होय मन । तेंचि मुक्ताप्रति जाँण । मिथ्यादर्शन विषयांचे ॥७२॥ नटनाट्यलोकाचारी । सपादी स्त्रीपुरुपव्यवहारी । मुक्तासी तैशी परी । गृहदारी नांदतां ॥ ७३ ॥ कां लेकरांच्या खेळाप्रती । तुळसीदळ घेऊनि हाती । वडे मांडे क्षीर तूप ह्मणती । एकी कल्पिती अनेकत्व ॥७४ ॥ तेवीं जीवन्मुक्कासी देख । जगी विपयो अवघा एक । त्यासी नानात्वे भाविती लोक । परी तो अनेक देखेना ॥ ७५ ॥ दृढ धरोनि देहाभिमान । मी माझं में विषयस्फुरण । तेच भवबंधाचे. कारण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥ ७६ ॥ शोकहर्पभयक्रोधलोभमोहस्टहादय । अहकारस्य दृश्यन्ते जन्म मृत्युश्च नारमन ॥ १५॥ देहाभिमानाचे पोटीं । अनेक दुःखाचिया कोटी । त्यांची सकळिते गुणगोठी । कृष्ण जगजेठी सागत ।। ७७ ।। देहाभिमानाचें कार्य एथ । अद्वैती वाढवी द्वैत । इष्टानिष्टीं समस्त । जग व्याप्त तेणे कीजे ॥ ७८ ॥ नवरा इष्टाचा नाश देख । तेणे देहअहंता मानी दुख । या नाव गा महाशोक । सकळही लोक मानिती ॥ ७९ ॥ नश्वर विपयप्राप्ती । आल्हाद उपजे चित्ती । त्या नांव हर्ष ह्मणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥१८॥ बळी मिळोनि समस्त । आप्त विपयो विभाडू पाहत । तेणे कासावीस होय चित्त । भय निश्चित या नाव ॥ ८१ ॥ आधकामाचे अवरोधन । ज्याचेनि अणुमात्र होय जाण । त्याचे करूं धावे हनन । क्रोध सपूर्ण त्या नांव ॥ ८२ ॥ गाठी झाल्याही धनकोडी । कवडी वेचिता प्राण सोडी । या नाच लोभाची वेडी । कृपण परवंडी पुरुपाची ॥ ८३॥ कर्माकर्म हिताहित । इष्टानिष्ट नाठवी चित्त । विवेकशून्य स्तब्धता प्राप्त । मोह निश्चित या नाच ॥ ८४ ॥ नित्य करिता विपयसेवन । मनी विषयइच्छा गहन । अखंड विषयाच ध्यान । स्पृहा जाण ती नांव ॥ ८५॥ इत्यादि हे नाना गुण । अथवा का जन्ममरण । आत्म्यासी संबंध नाही जाण । हे देहाभिमान स्वयं भोगी ॥ ८६ ॥ जागृति आणि देसिजे स्वप्न । तेथ वसे देहाभिमान । ते ठायीं हे दिसती गुण । सुषुधीस जाण गुण नाहीं ॥ ८७ ॥ जेथ वृत्ति निरभिमान । तेथ जन्ममरणादि हे गुण । सर्वधा नुठता जाणा नसूनही २ निरनिराळ्या ३ विषय जाण ४ सोट दर्शन ५ अनेक तहानी ६ साराशरूपान, थोडक्यात ७ गुण नाचत असा इट यस्तूचा नाश झाला की देहाहता हु स मानते १ तटा माजवून हरविण्याला १० प्रतिवध. १ मारा. १२ कोट्यवयि द्रव्य १३ गोष्ट, रीत १४ उगाच माध्यतेने फगनजाणे १५ गाढ झापला