या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठ्ठाविसावा. ७३३ गुणासी कारण अभिमान ॥ ८८ ॥ जळी स्थळी वायु झगटी । जळी तरंग स्थकी नुठी। ते तरगता जळाचे पोटीं । तेवीं शोकादि गुणकोटी अहंतेमाजी ॥ ८९ ॥ वद्धता झाली अहंकारासी । झणसी मुक्ति व्हावी त्यासी । ते अहंता लागली जीवासी । तेचि हपीकेशी सागत ।। १९० ॥ अत्यजाचा विटाळ ज्यासी । गंगास्नाने शुद्धत्व त्यासी । ते गगास्नान अंत्यजासी । शुद्धत्वासी अनुपयोगी ।। ९१ ।। तेवीं अहंता जडली जीवासी । ते त्यागिता मुक्तत्व त्यासी । परी मुकत्व अहंकारासी । कल्पातेसी घडेना ॥ ९२ ॥ देहेन्द्रियमाणमनोमिमानो जीवान्तराामा गुणकर्ममूर्ति । सूत्र महानित्युरधेय गीत ससार माधावति कालतन्न ॥ १६ ॥ अनंत अपार ज्ञानधन । मायातीत आत्मा पूर्ण । तोचि झाला मायेचे अधिष्ठान । अतरात्मा जाण यालागीं मणिपे ॥ ९३ ॥ माया व्यापूनि अपार । यालागी बोलिजे परमेश्वर । मायानियंता साचार । यालागी ईश्वर मणिपे तो ।।९४ ॥ तोचि अविधेमाजी प्रतिबिवला । यालागी जीव हे नाम पावला। तोचि देहाध्यासें प्रवळला । अहंकार झाला या हेतू ।। ९५ ।। तो सकल्पविकल्पउपाधीन । स्वयें होऊनि ठेला मन । त्या मनासी करावया गमन । दशेद्रिये जाण तोचि झाला ॥९६ ॥ त्यासी इंद्रियाचा आधार । सुखदुखभोगांचा निकर । पापपुण्याचा चमत्कार । देहाचा आकार तोचि झाला ॥ ९७ ॥ त्या देहाचे जे कारण । सत्व रज तमोगुण । ते तीन्ही गुण जाण । तोचि आपण स्वयें झाला ॥ ९८॥ गुणक्षोभाचें निजवर्म । झाला पचविषय परम । विषयभोगादि क्रिया कर्म । स्वयें स्वधर्म होऊनि ठेली ।। ९९ ॥ तिनी गुणाचे जन्मकारण । झाला महत्तत्त्व सूत्र प्रधान । एवं ससार अवधा जाण । ईश्वर आपण स्वयें झाला ।। २०० ॥ त्या ससाराची आधावती । गुणसाम्य तोचि प्रकृती । तेथ उत्पत्ति स्थिति प्रळयाती। क्षोभिर्का शक्ति काळ तो झाला ॥१॥ तो काळ आपल्या सत्ताशक्ती । उपजवी पाळी सहारी अर्ती । ऐशा पुन:पुनः आवृत्ती । नेणों किती करवीत ॥२॥ एवं ससार तो ब्रह्मस्फती। लीलाविग्रहें साकारस्थिती। मी विश्वेश्वर विश्वमूर्ती । बहुधा व्यक्ती मी एक ॥ ३॥ यालार्गी जो जो पदार्थ दिसे । तेणे तेणे रूपें आत्मा भासे । मजवेगळा पदार्थ नसे । हे मानी विश्वासे तो धन्य ॥ ४ ।। मीचि एक बहुधा व्यक्ती । वेदही साक्षी यांचे अर्थी । 'विश्वतश्चक्षु' या वेदोकी । श्रुति मज गाती सर्वदा ॥ ५॥ ऐसे असता नवल कैसें । जीव भुलला कल्पनावशे । अहता. चाढवी देहाध्यासें । तो ह्मणे देव न दिसे तिही लोकी ॥६॥ सत्य मानूनि भेदभान । जीव झाला अतिअज्ञान । भुलला आपण्या आपण । देहामिमान दृढ झाला ॥७॥देहाभिमानाचे दृदयण । तेचि बद्धतेचे लक्षण ! देहाभिमानार्चे निरसन । मुक्तता जाण ती नाव ॥ ८॥ समूळ मिथ्या देहाभिमान । मिथ्या भेदाचें भवेभान । त्याचे आद्यत निर्दळण । होते लक्षण हरि सागे ।। ९ ।। अमूलमेतबहुरूपरूपित मनोवच प्राणशरीरकर्म। ज्ञानासिनोपासनया शितेन रिछरवा पुनगा विचरत्यष्ण ॥ १७॥ भेदरूपें भवभान । मनसा वाचा कर्म प्राण । देहदयाचे स्फुरण । तें निर्मूळ जाण १मायेचे अधीन २ जीव ३ बाटला जातो ४ समुदाय ५ राहिला ६ सगग ७ आभयभूत ८ सहारामुळे क्षोभविणारी ९ परब्रह्माची स्फूर्ति किंवा सकल्प सोच समार १० अनेकविध पदार्थ तो मीच ११ द्वैताचे भान १२ निजात्मज्ञान विसरला १३ नाहीसे होणे १४ मोक्ष १५ ससारस्तुति