या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठ्ठाविसावा. ७३७ आरोगिले सर्वथा । हे अनुभवैकवेद्य तत्त्वता । शब्दप्रगल्भता सरेना ॥ ७६ ॥ एथ न चले युक्तिप्रयुक्ती । न चले जाणिवेची व्युत्पत्ती । न चले लक्ष्यलक्षणस्थिती । गुरुकृपामाप्ती तुरीय ॥७७ ॥ जागृत्यादि सर्व सत्ता । सुपुप्ति सर्वही असतां । याचा तुरीय मी प्रकाशिता । मजवीण सर्वथा या भासती केवीं ॥ ७८ ॥ जो सुपुप्ती साक्षित्व पावता। तो मी तुरीय जाण पा चीया । त्या मज सत्यस्वरूपता । केला निश्चितार्थी निश्चयो वेदें ॥ ७९ ॥ या स्वरूपावेगळें एय । जे भासे तें मिथ्याभूत । तेचि अर्थी श्रीकृष्णनाथ। असे सागत निजबोधे ।। २८०॥ न यस्पुरस्तादुत यस पश्चान्मध्ये च तत्तब्यपटेशमात्रम् । भूत प्रसिद्ध च परेण यसदेच तरस्यादिति मे मनीपा ॥ २१ ॥ जागृतीमाजी जे जे दिसे । ते ते जागृतीसवे नासे । स्वप्नी जे जे आभासे । ते स्वप्नासरिसे मावळे ॥ ८१॥ जागृती स्वा निजकार्यसीं । दोनी हारपती सुपुप्तीपाशीं । सुषुप्ति हारपे जागृतीसी । यापरी प्रपंचासी सत्यत्व नाही ।। ८२ ॥ प्रपच सृष्टीपूर्वी नाही। प्रळयानतर नुरेचि काही । मध्येचि आभासे जे काहीं । तें मिथ्या पाही असत ॥ ८३ ॥ प्रपचाचें बोर्डवर । नामरूपाचे उभारी भार । तें प्रत्यक्ष देसी नम्वर । गंधर्वनगर तत्माय ॥ ८४ ॥ पित्यादेखता पुत्र मरे । पुत्रादेखता पिता झुरे । काळेकाळ अवघेचि सरे । कोणी नुरे कियेसी ।। ८५ ।। सागरी जे लहरी उसासे । उसासली ते स्वयेंचि नासे । तेजी नामरूपा आले दिसे। ते अनायास नश्वर ॥ ८६ ।। प्रपंच है नाममात्र । येरवी परमात्मा मी स्वतत्र । एवं ससाराचें जन्मपन्न । नेणोनि दुस्तर मानिती जीव ।। ८७ ॥ प्रपंच ज्यापासनि झाला । जेणे सर्वार्थी प्रकाशिला। अती ज्यामाजी सामावला तो तदप सचला निजात्मा ॥८॥शुक्तिकारजतन्यायें जाण । प्रपंच ब्रह्मेसी अभिने । जे प्रपचाचें स्फुरे स्फुरण । ते ब्रह्मचि पूर्ण उद्धवा ॥ ८९ ॥ त्या माझेनि सत्य श्रुतिस्मृती । तो मी सत्यप्रतिज्ञ श्रीपती । त्रिसत्य सत्य तुजमती । सागीतला निश्चिता निजभावार्थ ॥ २९० ॥ ऐकोन देवाचे वचन । उद्धव आशंकी आपण । एकाचेनि मते जाण । प्रपच भिन्न मानिती ॥९१ ॥ प्रपंचासी देवो काही । निजागी आतळला नाहीं। ऐसे तूं कल्पिसी काहीं। ऐक तेविषयीं सागेन ॥ ९२॥ __ अविद्यमानोऽप्यवभासते यो कारिको शजससर्ग एप ।। ग्रहह्म स्वयज्योतिरतो विभानि ब्रह्मेन्द्रियात्मविकारचित्रम् ॥ २२ ॥ मुख्यत्वें विकारी मन पूर्ण । त्यासी मिळूनि तिनी गुण । नसताचि ससार जाण । विचित्राभरण दासवी ।। ९३ ॥ मन बुद्धि चित्त अहंकार । आणि अधिष्ठाते सुरवर । हे सत्वगुणाचे विकार । जाण साचार उद्धवा ।। ९४ ।। रजोगुणाची दशद्रियं । पंचभूतें पचविपये । तमोगुणिया जन्म होये । ते जनासी पाहें भुलविती ॥ ९५ ॥ जेवीं वोडंवरियाचा खेळ । नसताचि भासे प्रवळ । तेवीं त्रिगुणाचे विचित्र जाळ । मिथ्या निर्मळ १पुरी पडत नाही २ तत्र व्यपदेशमात्रम् ३ जागृतिवशे ४ आपल्या कार्यासहित ५ लीन होतात ६ गाडनिदेमध्य ५ असत्, सो ८ जादूगिरी, माया ९ आकाशातल्या वारवार रूप बदलणान्या दगाप्रमाणे १० दिव. संदिवस, क्षणक्षण, कालमाने ११ जग है कारणस्वरूपापासून मिन नाही, त्यास नाव मान रियळे आहे १२शिंपी. वर रुप्याचा भास होतो या न्यायान १३ प्रपच झणजे जग ब्रह्माडून अभिन आहे हे यथाय जाणणे च खरे ज्ञान आहे १४ स्पर्शला १५ त्याच्या देवता १६ जादुगाराचे खेळ