या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. आभाळ । तेवीं ज्ञात्यासी संग सकळ । इंद्रियकर्माचा विटाळ । ज्ञात्यासी अळुमाळ लागेना ॥ ३८ ॥ ऐक ज्ञात्याचे रूप परम । तो देही असोनि परब्रह्म । यालागी त्यासी इंद्रियकर्म । समविषम बाधीना ॥ ३९ ॥ ज्ञाता सर्वार्थी अलिप्त । तेंचि करावया सुनिश्चित । दृष्टांतेसी श्रीकृष्णनाथ । स्वये सांगत साक्षेपें ॥ ३४० ॥ यथा नमो वायवनलाम्बुभूगुणैर्गतागतैर्वगुणेन सजते । सथाऽक्षर सत्वरजस्तमोमलेरहमते मसृतिहेतुभि परम् ॥२६॥ पृथ्वी जळ अनळ अनिळ । त्यांसी नभ व्यापक सकळ । परी पृथ्व्यादिकांचा मळ । नभासी अळुमाळ लागेना ॥४१॥ नभ पृथ्वीरजें कदा न मैळे ।धुरकटेना धूमकल्लोळें । अग्नीचेनि महाज्वाळें । कदाका जळेना ॥४२॥ वायूचेनि अतिझडा. । आकाश कदाका न उडे । उदकाचेनि अर्तिचढ । आकाश न वुडे सर्वथा ॥४३॥ का सूर्याचे निदाघंकिरणी । नभघामिजेना उन्हाळेनी। अथवा हिमाचिया हिमकणीं। नभ कांकडोनी हिवेना ॥४४॥ पर्जन्य वताप्रबळ। नभ बोले नव्हे अळुमाळ । यापरी नभ निर्मळ । लाविताही मळ लागेना ॥४५॥ त्या आकाशासी अलिप्त । जे क्षराक्षराही अतीत । अक्षर परब्रह्म सदोदित । त्रिगुणातीत चिन्मात्र ॥४६॥ जे अजरामर अविनाशी । जे प्रकाशमान स्वप्रकाशीं । ऐसिये वस्तूची प्रतीति ज्यासी । अद्यत्वेसी फावली ॥ ४७ ॥ जेवी न मोडिता लागवेगे । सोनटका सोने झाला सर्वांगें। तेवीं करणीवीण येणे योगें । जे झाले निजागें परब्रह्म ॥ ४८ ॥ त्यासी गुणांची त्रिगुण मोगी। लाविताही न लगे अगी । विपयाँ करिता विपयभोगी । ते विपयसगी निःसग ॥४९॥घर्टी चंद्रबिंब दिसे । ते घटासी स्पर्शले नसे । ओल नव्हे जळरसे । देही जीव असे अलिप्त तैसा ।। ३५० ॥ ते घटी कालविल्या शेण । विप्रतिविधा नातळे जाण । तेवीं देहींचे पापाचरण । जीवशिवस्थान ठोंकीना ॥५१॥ घटी कालविल्या कस्तूरी । विवप्रतिविव सुवास न धरी । तेवी देहीच्या पुण्याची थोरी । जीवशिवावरी पावेना ॥५२॥ आकाग जाळावयालागी । धृतें पेटविली महाआगी । आकाश असतां अग्निसगी । दाहो अगी लागेना ॥ ५३ ॥ अवकाश असोनि अग्निमेलें । अग्निज्वाळे कदा न जळे । तेवीं ज्ञाता विपयकल्लोळें । कदा काळें विषयी नव्हे ॥ ५४ ॥ गुणाचेनि देहसगें । योगी वर्तता येणे योगें । ते भोगिताही विषयभोगें । अलिप्त सर्वांगें सर्वदा ॥ ५५ ॥ हे कळले ज्या भोगवर्म । ते देही असोनि परब्रह्म । त्यांसी बाधीना भोगभ्रम । अक्षर परम स्वयें झाले ।। ५६ ।। ते अक्षर झाले आता । याही वोलासी ये लघुता । जन ज्ञानी अज्ञानी वर्तता । अक्षरता अभंग ॥ ५७ ॥ ते विसरोनि ब्रह्मरूपता । मी देही झणवी देहअहंता । तेथें वाढली विषयावस्था । दृढ वद्धता तेणें झाली ॥ ५८॥ ते निवारावया वद्धता । त्यजावी विपर्यंलोलुपता । विपयत्यागेंवीण सर्वथा । नित्यमुक्तता घडेना ॥ ५९॥ न जोडता नित्यमुक्तता । साधक जरी झाला ज्ञाता । तेणे ज्ञातेपणे सर्वथा । विपया सक्तता न करावी ।। ३६० ॥ - -- - पापपुण्यात्मक कोणनीच कम धात्यास बाधत नाहीत • पृथ्वी, आप, तेज, व वायु, याच मालनता, माता, दहा पापण, हे गुण आकाशास लागत नाहींत ३ स्वत्पमुद्धा ४धळीने ५ नपाट्यान्६ अतिशयान ७ उष्ण किरणाना यता नाही १ अक्षय ग्रह्म १० प्राप्ती ११ मिळाली १२ एक सोन्याच नाणे १३ मार्ग, प्रकार १४ लागेना १५ फगीपणा १६ निपयाराफि