या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७५६ एकनाथी भागवत. एकचि एथें । हेही ह्मणावया नाही ह्मणते । यापरी मिळोनि मातें । भक्त निजसुखातें पावले ॥ ९४ ॥ तो हा ब्रह्मज्ञानाचा कळसू । अध्याय जाण अठ्ठाविसू । वाप विंदानी हपीकेशू । तेणे देउळासी कळसू मेळविला ॥ ९५ ॥ जेवीं अळंकारी मुकुटमणी । तेवीं अट्ठाविसावा ब्रह्मज्ञानी । श्रीकृष्ण भक्तांची निजजननी । तो उद्धवालागोनि श्रृंगारी ॥ ९६ ॥ माता उत्तम अलंकारकोडी । अपत्य शृगारी अतिआवडी । तेवी उत्तमोत्तम ज्ञाननिरवडी । उद्धव कडोविकडी शृंगारिला ॥ ९७ ॥ मातेसी आवडे निपटणे । तेवी उद्धव वृद्धपणीचे ताने । श्रीकृष्ण त्याकारणे । गुह्यज्ञाने शंगारी ।। ९८ ॥ माता वाळकाते शंगारी । तें लेणे मागुते उतरी । उद्धव शृंगारिला श्रीहरी । ते अंगावाहेरी निघेना ॥ ९९ ॥ अगी लेणे जडले अलोलिक । तेणे गुणे उद्धव झाला अमोलिक । पायां लागती तीनी लोक । ब्रह्मादिक पूजिती ।। ७०० ॥ निजात्मअळंकारें श्रीपती । उद्धव शृंगारिला ब्रह्मस्थिती । तेणे बंद्य झाला त्रिजगतीं । त्याते पुराणी पढती महाकवी ॥१॥ गोडीमाजी श्रेष्ठ अमृत । तेही फिके करूनि एथ । उद्धवालागी परमामृत । श्रीकृष्णे निश्चित पाजिले ।। २ ॥ अमर अमृतपान करिती । तेही मरणार्णवी बुडती । उद्धव अजयी केला श्रीपती । कथामृती निववूनी ॥ ३ ॥ तेणे तो सर्वांगी निवाला । परमानंदी तृप्त झाला । तेणे उद्धचत्वा विसरला । डोलों लागला स्वानंदें ॥४॥ तेव्हां स्वानंदउन्मत्तता। दुजे निर्दळी देखता । ससारा हाणोनि लाता । चढे माथा देवांच्या ॥ ५ ॥ चढोनि देवांचिया माथां । शेखी गिळी देवभक्तता । मग सच्चिदानदस्वानदता । निजात्मता स्वयं झाला ॥ ६॥ तेथ सत् चित् आनंद । हाही नाही त्रिविध भेद । सदोदित परमानंद । स्वानंद शुद्ध कोदला ॥७॥ नश्वर त्यागाचिये स्थिती । अनश्वरातें सत झणती । जंडाची करितां निवृत्ती । चिद्रूपं ह्मणती वस्तूतें ॥ ८॥ जेथ दुःखाचा नाही वाधू । त्यातें ह्मणती आनंदू । एवं सच्चिदानंदू । ज्ञानसबंधू मायिक ॥ ९॥ वस्तु सर्त ना अंसत । चित् नव्हे अचित् । ते सुखदुःखातीत । जाण निश्चित सन्मात्र ।। ७१०॥ हा अठ्ठाविशींचा निजबोध । उद्धवासी तुष्टोनि गोविद । देता झाला आनंदकद ! भाग्य अगाध तो एक ॥११॥ साडोनि निजधामा जाणे । स्वयें श्रीकृष्ण त्याकारणे देता झाला निजगुह्यठेवणे । त्याचें । भाग्य चानणे ते किती ॥ १२ ॥ जे नेदीच पित्या वसुदेवासी । जे नेदीच बंधु चळभद्रासी । जे नेदीच पुत्रा प्रद्युम्नासी । तें उद्धवासी दीधले ॥ १३ ॥ जे नेदीच देवकीमातेसी । जे नेदीच कुंती आतेसी । शेखी नेदीच यशोदेसी । तें उद्धवासी दीवले ॥१४॥ ह्मणाल सांगीतले अर्जुनासी । तोही अत्यंत पढियता त्यासी । त्याहाती उतरावया घेराभारासी । युद्धी त्वरेंसी उपदेशिला ॥ १५॥ तैसे नव्हे उद्ध्वाकडे । सावकाश निजनिवाडें । गुस ठेवणे फाडोचा। अवघे त्यापुढें अपिलें ॥१६॥ पित्याचिया निजधनासी। स्वामित्व लाभे निजपुत्रासी । तेवीं श्रीकृष्णाचिया गुह्यज्ञानासी । झाला मिरीशी उद्धव ॥ १७॥ पाडवामाजी धन्य अर्जुन । यादवामाजी उद्धव धन्य । या दोघाच्या भाग्या समान । न दिसे आन त्रिजगतीं ॥१८॥ सकळ साराचा निजसारांश । तो हा एकादशा १मोटा कुशल कारागीर २ शाननिर्णयान ३ कभी गोड ४ मृत्यसागरात ५ शेवटीं ६ पाचभातिकाचा, अपचाचा शनरूप ८ सत् नव्हे असत् नारे ९ चैतन्य १० याच अर्थाच्या ओव्या ज्ञानेश्वरात आहेत अ०४-८ ते १० प्रेनासला १२ पृथ्वीच्या भारला १३ सटपणे १४ वतनदार, मालक