या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७५८ एकनाथी भागवत. --अध्याय एकोणतिसावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो श्रीगुरुदयार्णव । तुझे कृपेसी नाहीं थांव । कृपेनें तारिसी जीव । जीवभाव सांडवूनी ॥१॥ साडयूनि देहबुद्धी । निरसोनि जीवोपाधी । भक्त तारिसी भवान्धी । कृपानिधि कृपालुवा ॥२॥ तुझें पाहता कृपाळूपण । जीवासी जीवे मारिसी पूर्ण । नामा रूपा घालिसी शून्य । जातिगोत सपूर्ण निर्दळिसी ॥ ३ ॥ निर्दळनि आपपरा । निसंतान करिसी ससारा । तो तूं जिवलग सोयरा । कृपाल खरा घडे केवीं ॥ ४ ॥ जेवी आंधारी नादते दृष्टी । भासती नक्षत्रे खद्योतकोटी । ते आंधारेंसी सूर्य घोटी । तेवी तुझी भेटी साधका ॥ ५ ॥ तुझी जेथ साचार भेटी । तुवां केलिया कृपादृष्टी । ससारभेदाची निपुटी । त्रिगुणेसी सृष्टी दिसेना ॥ ६॥ न दाखवूनि गुणादि सृष्टी । दाविसी अद्वय ब्रह्म दृष्टी । त्यासी कदा नव्हे दृष्टिभेटी । भेटीसी तुटी कदा न पडे ॥७॥ जो कदा न देखिजे दृष्टी । त्यासी केवी होय भेटी । भेदीसी कदा न पड़े तुटी । हेही गोष्टी घडे केवी ॥ ८॥ जैसा गर्भ मातेच्या पोटी । असोनि माउली न देखे दृष्टी । तरी तिचे भेटीसी नव्हे तुटी । तेवी तुझे पोटी साधक ॥ ९॥ माता कळवळोनि पाळी तान्हें । शेखी माउली ते नेणे । तेवी तुजमाजी अज्ञाने । तुवा प्रतिपाळणे निजलोमें ॥१०॥ जन्मल्या वाळाकारणे । माता वाढवी शहाणपणे । तेवी तुझेनि निजज्ञानें। सज्ञान होणे साधकीं ॥ ११ ॥ साधी लाहता तुझें ज्ञान । यितें नाठवे मीतूपण । जीव विसरला जीवपण । अयें पूर्ण परमात्मा ॥ १२ ॥ असोत या बहुता गोष्टी । नव्हता सद्गुरुकृपादृष्टी । करिता उपायाच्या कोटी । नव्हे भेटी परमार्था ॥ १३ ॥ जाहलिया सद्गुरुकृपादृष्टी । साधने उठती उठाउठी । ब्रह्मानंद कोंदे सृष्टी । स्वानंदपुष्टी साधका ॥१४॥ आहलिया गुरुकृपा प्राप्त । उपनिषदांचा मथितार्थ । साधकाचा चढे हात । कृपा समर्थ श्रीगुरूची ॥ १५ ॥ सद्गुरुकृपा समर्थ । तेणे कृ श्रीभागवत । वाखाणिले जी प्राकृत । शुद्ध मथितार्थ सोलीव ॥ १६ ॥ जनार्दनकृपादृष्टी । माझ्या मराठ्या ऑरिखा गोष्टी । रिघाल्या एकादशाचे पोटीं । स्वानंदतुष्टी निजबोधे ॥ १७ ॥ सस्कृतप्राकृतपरवडी । सज्ञान सेविती स्वानंदगोडी । गाय काळी आणि तावडी । परी दुधी चौकुडी चवी नाहीं ॥ २८॥ तेवीं सस्कृतप्राकृतभाखा । ब्रह्मासी । ६ बदला एका । साह्य निजसखा जनार्दन ॥ १९ ॥ जन जाण। चे निरूपण । गुह्य गभीर स्वानंदधन ," .. या उपपत्ती । निजबोधैं साथूनि ॥ २१ ॥" ब्रह्म अद्वयत्वे परिपूर्ण । ४. जाण सर्वार्थी ॥ २२॥ नार कारण । मीतूपण असेना ॥ गत, पार २जीवपणारे धर्म : निदरवारातू मपार खराना । आर, सरकारदीयेच्यावाकड्या . मा १५ युफि, रात, प्रमा, म घोप, ही