या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. ऐसे जे अज्ञान जन । तरावया साधन सुगम सांगें ॥ ४५ ॥ मनोनिग्रहो अतिकठिण । साधका नेमवेना सपूर्ण । तेचि अर्थीचे निरूपण । उद्धव आपण सागत ॥ ४६॥ । प्रायश पुण्डरीकाक्ष युजतो योगिनो मन । विपीट त्यसमाधानान्मनोनिग्रहकर्शिता ॥ २ ॥ ऐकें कृष्णा कमलनयना । शिणतां साधक साधना । कदा नाकळवे मना । तेही विवंचना अवधारी ॥४७॥ निग्रहावया निजमन । साधक साधिती प्राणापान । त्यासीही छळोनिया मन । जाय निघोन तत्काळ ॥ ४८ ॥ घालूनियां एकाती आसन । मनोनिग्रहीं जे सावधान । त्यांसीही ठकूनियां मन । जाय निघोन चपलत्वें ॥४९॥ मनोनिग्रही आही हैटी । ह्मणोनि रिघाले कपार्टी । त्यासीहि ठकूनि मन शेवटीं । जाय उठाउठी चपलत्वे ॥ ५० ॥ एक आकळावया मन । त्यजनि वैसले अन्न । तंव मने केले आनेआन। जागृति स्वप्न अन्नमय ॥ ५१ ॥ मनोनिग्रह करितां देख । मन खवळे अधिकाधिक । मनोनेमी सज्ञान लोक । शिणले साधक साधनीं ॥ ५२ ॥ वारा वाधवेल मोटे । अग्नि प्राशबेल अवचटे । समुद्र घोर्टवेल घोटें । मन आत्मनिष्ठे तरी न ये ॥ ५३ ।। आकाश करवेल चौघडी । महामेरु बांधवेल पुडी । शून्याची मुरडवेल नरडी । परी या मनाच्या वोढी अनिवार ॥ ५४ ॥ काळ जिंकवेल तत्त्वतां । त्रिभुवनींची लाभेल सत्ता । परी मनोनिग्रहाची वार्ता । तुजवीण अच्युता घडे केवीं ॥ ५५ ॥ तापसा मन तत्काळ छळी । मन नेमस्ताचा नेम टाळी । मन बळियांमाजी महावळी । करी रांगोळी धैर्याची ॥५६॥ मन इंद्राते तळी पाडी । मन ब्रह्मयातें हटेंचि नाडी । ऐशी मनाची चोखंटी,खोडी । आपल्या प्रौढी नावरे ॥ ५७ ॥ साधनी साधक शिणता । मनोजयो न येचि हाता| तुजवांचूनि अच्युता । मन सर्वथा नावरे ॥ ५८ ॥ अत्यंत साधूनि निरवंडी । मनोजयो आणितां जोडी । तंव सिद्धीची दाटे आडाडी । तेणेही मन नाडी साधकां ॥५९॥ तुझी कृपा नव्हता जाण । साधका कदा नागवे मन । मनोनिग्रहार्थ जाण । तुझे चरणा शरण रिघावें ॥ ६० ॥ तुझी कृपा नव्हता जाण । साधका कदा नागवे मन । तू तुष्टल्या जना दैन । मनपणा मन स्वयें विसरे ।। ६१ ॥ सर्वभावे न रिघतां शरण । साधका कदा नावरे मन । मनोनिग्रहार्य जाण । तुझे चरणा शरण रिघावें ॥ १२॥ भयात्त भानन्ददुध पदाम्बुज इसा श्रयेरनरविन्दलोचन । सुख नु विश्वेश्वर यो न कर्मभिस्यन्माययाऽमी विहता न मानिन ॥६॥ कमलापति कमलवदना । कमलालया कमलनयना । नाभिकमळी कमलासना । तुवा ब्रह्मज्ञाना आपिलें ।। ६३ ।। त्या तुझ्या चरणींचे चरणामृत । तुझ्या कृपा ज्यास होय प्राप्त । मनोजय त्याचा होय अकित । तो होय विरक्त भवभावा ॥ ६४ ॥ तुझ्या चरणामृताची गोडी । मनोजयात तत्काळ 'जोडी। आधिव्याधिभवपाश तोडी। स्वानंदकोडी साधकां ।। ६५ ।। सकळ साधनाचें निजसार । साख्ययोगविवेक संधर । त्या साराचेही १ मनाचे नियमन होत नाही २ विवेचन, विचार. ३ मन नियहीजे ४निग्रही ५ गिरिगव्हराकडे ६ अन्नअन्न. ५ दमले ८ एका घोंटान पिऊन रावल ९ रासाडी, नाश १० वाईट ११ चातुर्य, सावधपणा १२ गदा १३ सापडत नाही, भावरत नाही १४ कृपेने, १५ अपचातील पदार्थाविपयाँ १६ मिळविते १७ बळकट