या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

២ឌី • एकनाथी भागवत. सर्व भूतीं ज्यासी भजन । त्याचे वुद्धीची बुद्धी मी आपण । ते तूं बुद्धि ह्मणसी कोण । कर्म ब्रह्मार्पण महाबुद्धी ॥ ५ ॥ सर्व भूती माझे भजन ।'सर्व कर्म मदर्पण । हे बुद्धीची महाबुद्धि जाण । येणे ब्रह्म पूर्ण स्वयें होती ।। ६ ।। चतुराचे चातुर्य गहन । या नांव बोलिजे गा आपण । मिथ्या देहे करूनि भजन । ब्रह्म सनातन स्वयें होती ॥७॥ आधी मायाचि तंव वाचो । मायाकरिपत मिथ्या देहो । तें देहकर्म मज अर्पिता पहा हो। ब्रह्म स्वयमेवो स्वयें होती ॥ ८ ॥ मिथ्या देहाचेनि भजनें । सत्य परब्रह्म स्वये होणे। जेवीं कोंडा देऊनि आपणे । कण्याच्या घेणे महाराशी ॥ ९॥ देता फुटकी काचवटी । चितामणी जडे गाठी । का इटेच्या साटोवाटी । जोडे उठाउठी आव्हाशंख ॥ ४१० ॥ तेवी मिथ्या देही, कर्माचरण । जेणे जीवासी दृढ बंधन । ते कर्म करिता मदर्पण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥ ११॥ अनित्य देहाचियासाठी । नित्यवस्तूसी पडे मिठी । हेचि बुद्धिमंती बुद्धि मोठी । ज्ञानाची सतुष्टी या नाव ह्मणिपे ॥ १२ ॥ निष्टंकित परमार्थ । स्वमुखें बोलिला श्रीकृष्णनाथ । तो केळसा आणोनिया ग्रंथ । उपसहारार्थ सांगतू ॥१३॥ एष तेऽभिहित कृत्स्रो ब्रह्मवादस्य सङ्ग्रह । समासच्यासविधिना देवानामपि दुर्गम ॥ २३ ॥ संक्षेप आणि विस्तरे । साडूनि नाना मतातरें । म्यां सांगितले निजनिर्धारें । ब्रह्मज्ञान खरे अतिशुद्ध ॥ १४ ॥ तुज सागितले करून सुगम । परी हे ब्रह्मादि देवा दुर्गम । जे आलोडिती ऑगमनिगम । त्यासीही परम दुस्तर ॥ १५ ॥ तेथे नाना शास्त्रार्थ शब्दबोध । वस्तु नेणोनि करिती विवाद । जेथ वेदाचा ब्रह्मवाद । होय निःशब्द 'नेति' वादें ॥ १६ ॥ ते हे आत्मज्ञानाचे निजसार । परमार्थाचे गुह्य भांडार । मज परमात्म्याचे जिव्हार । फोडूनि सुखसागर सांगितले ॥ १७॥ अभीक्ष्णशस्ते गदित ज्ञान विस्पष्टयुक्तिमत् । एतद्विज्ञाय मुच्येत पुस्पो नष्टसशय ॥ २४ ॥ जेथ वेदशास्त्राशी वांकुडें । जे वोली बोलता नातुडे । तेंचि ज्ञान म्या तुजपुढें । निजनिवाडे सागितले ॥ १८ ॥ जे सागितले शुद्ध ज्ञान । ते नाना युक्तीकरूनी जाण । दृढतेलागी निरूपण । पुनःपुनः जाण तुज म्यां केले ॥ १९ ॥ बहुत न लाविता खटपट । तुज न वाटताही कष्ट । ज्ञान सागितले विस्पष्ट । जेणे होती सपाट सशय सर्व ॥४२०॥ हे जाणितलिया ज्ञान । सर्व संशया होय दहन । साधकू होय ब्रह्मसपन्न । स्वानंदपूर्ण सर्वदा ॥२१॥स्या सागितले गुह्य ज्ञान । एकादशाचे निरूपण । याचे श्रवण पठण मनन । करी तो धन्य उद्धवा ॥ २२ ॥ सुनिरिक्त तव प्रश्न मयेतदपि धारयेत् । सनातन ब्रह्मा गुह्य पर ब्रह्माधिगच्छति ॥ २५ ॥ ज्ञाते तरती है नवल कोण । परी भाळे भोळे जे अज्ञान । त्यासी उद्धरावया जाण । उद्धवे प्रश्न पुशिले ॥ २३ ॥ त्या प्रश्नानुसारें जाण । म्या सतोपोनि आपण । सागितले गुह्य ज्ञान । परम कारण परब्रह्म ॥ २४ ॥ जेवी घत्साचे हुंकारे । धेनु क्त चाल क्षार। तेवीं तुझेनि प्रश्नादरें । मी स्वानदभरें तुष्टलो ॥ २५ ॥ एथ न करिताही प्रश्न । हाता पजाड २ मायदल्यान ३ दक्षिणावर्ती शस, उजवा शस रत्न रूप असून तो येथे ही असणे मोठे लाभदायक आहे ४ परम शुद्ध ५ शेवटास ६ धुडाळितात १ पाहापत, दृष सोडीत वेदवेदातशाच ८ पूर्ण ठसण्याकरिता ९ साफ, दूर १० हपरण्यान