या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८२ एकनाथी भागवत उपदेशी सत्पात्र पूर्ण । त्या सच्छिप्याचे लक्षण । तुज मी सांगेन निरूपण । ऐक सायधान उद्धवा ॥ ३५॥ एतेदोपैविहीनाय ब्रह्मण्याय मियाय च । साधये शुचये घूयाद्भक्ति स्याद्रयोपिताम् ॥ ३ ॥ उपदेशी मुख्य अधिकारपण । धडधडीत वैराग्य पूर्ण । तेंही 'पिशाचवैराग्य नव्हे . जाण । विवेकसपन्न शास्त्रोक्त ॥ ३६॥ दिवस चारी वैराग्य केलें । संवैचि विषयार्थी लागले । तेथ जे जे उपदेशिले । तें सर्पा पाजिले दुग्ध जैसे ॥ ३७॥ जेथ वैराग्य निघोनि जाये। तेथ ज्ञानाभिमान उरला राहे । तेणें अभिमाने करी काये । गुणदोष पाहे श्रेष्ठाचे ॥ ३८ ॥ नीच निदी हेळसून । श्रेष्ठाचे पाहे दोपगुण । जेथ वैराग्य होय क्षीण । तेथे ज्ञानाभिमान चढ़े ऐसा ॥ ३९ ॥ उद्धवा जगी दोनी अवस्था । वैराग्य कां विषयास. कता। तिसरे अवस्थेची कथा । जाण सर्वथा असेना ॥ ५४० ॥ जेथ विवेक विषयो होय क्षीण । तेथ वैराग्य प्रबळे परिपूर्ण । जेथ विवेकसी वैराग्य क्षीण । तेथ विपयाचरण ज्ञानाभिमाने ॥ ४१ ॥ यालागीं होय जंब ब्रह्मज्ञान । तंव जो वैराग्य राखे पूर्ण । वैराग्ये गुरूसी अनन्वशरण । ते अधिकारीरल उपदेशा ॥ ४२ ॥ गत श्लोकींचे दोपनिरूपण । आतां बोलिलों वैराग्याय जाण । इंहीं दोषी ज्यां रहितपण । ते अधिकारी सच्छिष्य ॥ ४३ ॥ ज्यासी ब्रह्मत्वे ब्राह्मणभक्ती । अनन्यभावे भजे भूती । त्याची आदणी भक्ति विरक्ती । तो जाण निश्चिती अधिकारी ॥ ४४ ॥ गुरूचा पंढियंताही पूर्ण । त्यापासी असत्या अभक्तपण । त्यासी नव्हे ब्रह्मज्ञान | अनन्य भजन जंब न करी ॥ ४५ ॥ प्रिय आणि भजनशीळ । दोपरहित निर्मळ । त्यासी विरक्ति करूनि अढळ । उपदेशावे प्राजळ हे गुह्य ज्ञान ॥४६॥ स्वदारा आणि स्वधन । याचा लोभ ज्यासी सपूर्ण । ज्यासी स्वर्ग ना मुक्तपण । जन्ममरण अनिवार ॥४७॥ परदारी परधन । सर्वथा नौतळे ज्याचें मन । ऐसे ज्यापाशी पवित्रपण । त्यासी हे ज्ञान उपदेशाचे ॥४८ ॥ जो वैराग्याचा वोतिला । विवे पूर्ण वोसला । सद्गुरुसेवेसी जीवे विकला। चरणी विनटला अनन्यत्वे ॥४९॥ सांडूनिया निजमहिमान । गुरुसेवेलागी आपण । ज्यासी आवडे रकपण । ऐसा सेवेसी पूर्ण सद्भाव ।। ५५० ।। अमरश्रेष्ठ जे सुरवर । ते मानी सद्गुरूचे किकर । सद्गुरूहूनिया थोर । हरिहर मानीना ॥ ५१ ॥ ज्यासी नाहीं गर्वमद । ज्यासी नाही कामक्रोध । ज्यासी नावडे विकल्पभेद । तो शिष्य शुद्ध परमार्थी ॥५२॥ काया याचा मन धन । सांडूनि समर्धतामहिमान । जो सद्गुरूसी अनन्यशरण । तो सच्छिष्य जाण साधुत्वे ॥ ५३॥ सांडूनि लज्जा लौकिक । जो ब्रह्मज्ञानाचा याचक । सद्गुरुवचनार्थी चातक । तो आवश्यक उपदेशी ॥ ५४॥ जे का द्विजन्म्यावाहेगे । वेद वाळूनि साडिले दूरी । जे का मंत्रार्थी अंमत्री। जे अनधिकारी श्रवणासी ॥ ५५ ॥ ज्यांसी नाही आनमधर्म । १ स्मशानवैराग्य, चचल, काही काळ उत्पन होऊन पुहा नाहीसे होणारं विरतपण २लगेच, पुन्हा ३ विषयप्रीति. ४ सारासारविवेकाने विषयासक्ति कमी होत जाते ५ ब्राह्मणाना ब्रह्मभावानें पूज्य मानणे ६ दासी ७ आवडता ८ परधन व परदारा ही जो मनाही पारित नाही तोच पविन पुरुष ज्ञानाधिकारी होय ९स्पर्शत नाही १० मुशीतून कारला १५ परिपूर्ण मरला १२ जडला १३ आपलें मोठेपण १४ नीचपण, सेवनपण १५ द्वैतभाव १६ सत्ता व मोठेपमा १७ तीन वर्षाच्या पलीकडचे १८ वगळले १९ खोटी मसलत