या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८४ . एकनाथी भागवत. ह्मणशी कणवा । तरी तो अधिकार वोळखावा । ऐक उद्धवा सांगेन ॥ ७९ ॥ स्त्रीपुरुषअवलोकन । जयाचे दृष्टी समसमान । ऐसे अनुभवी जो परिपूर्ण । तोचि स्त्रियासी जाण उपदेशी ॥ ५८० ॥ तोही अधिकार न पाहतां । उपदेश न करिती सर्वथा । त्याही उपदेशाची कथा । ऐक तत्त्वतां सागेन ॥ ८१॥ म्यां ज्या कां निदिल्या वनिता । त्यांमाजी सभाग्या सात्विकता । साडूनियां विषयावस्था । जे परमायो उद्यत ॥ ८२ ॥ त्यजूनिया प्रपंचाची हांध । नावडे विपयाचे नाव । वैराग्य उठला समाव । घेऊनि धांव परमार्थी ॥ ८३ ॥ अतिथि आणि पतिपुत्रासी । भोजनी समता नित्य जिसी । धनलोभ नाहीं मानसीं । परमार्थी तिसी अधिकारू ॥ ८४ ॥ जन्ममरणनिवारणी । जीवामनाची नित्य काचणी । माझे भवपाशच्छेदनीं । धर्मदाता कोणी मिळता का ॥ ८५ ॥ सद्गुरुप्राप्तीची अतिआर्त । काया वाचा वित्त जीवित । कुरवंडी करूनि साडित । परमार्थ सद्भावें ॥८६॥ यापरी निजपरमार्था । सद्भावे जे विनंटे वनिता । तिसी उद्धवा हे उपदेशितां । दोप सर्वथा लागेना ॥ ८७ ॥ क्षत्रिय वैश्य स्त्री शूद्रजन । याची सच्छद्धा दृढ पाहून । उपदेशिता ब्रह्मज्ञान । दोपनिर्दळण शिष्याचे ॥ ८८ ॥ उपदेशिता ब्रह्मज्ञान । जै गुरुसीच लागे दूपण । ते शिप्यासी उद्धरी कोण । हे व्याख्यान अवद्ध ॥ ८९ ॥ पहावया पात्रशुद्धता । मी बोलिलो दोपवार्ता-। वाचूनि ब्रह्मज्ञान उपदेशितां । दोप सर्वथा असेना ॥ ५९० ॥ हे ज्ञान जाणितल्यापाठीं । जाणणेचि सरे सृष्टी । ससारासी पडे तुटी। तेथ दोपाची गोठी असेना ॥ ९१॥ नेतद्विज्ञाय जिज्ञासोझतव्यमवशिष्यते । पीत्वा पीयूपममृत पातव्य नावशिष्यते ॥ ३२ ॥ ये ग्रंथींचे जाणितल्या ज्ञान । मुमुक्षु जे माधक जन । त्यासी जाणाचया आन । जाणितेपण उरेना ॥ ९२ ॥ जेवीं केलिया अमृतपान । पुढें प्राशनासी नुरे आन । तेवीं जाणितल्या हे ज्ञान । ज्ञातव्य ज्ञातेपण समूळ नुरे ॥ ९३ ॥ ॥ आशंका ॥ धर्मार्थकाममोक्षाप्रती । साधने असती नेणों किती । तुवां हे एकचि श्रीपती । केशा रीती प्रतिपादिले ॥ ९४ ॥ उद्धवा साधनें जी आनान । ती अभक्त शोधिती आपण । माझ्या भक्तासी गा जाण । मीच साधन सर्वार्थी ॥ ९५ ।।। शाने कर्मणि योगे च यातया दण्डधारणे । यावानों नृणा तात तापास्तेऽह चतुर्विध ॥ ३३ ॥ मोक्षालागी ज्ञान साधन । धर्मालागी स्वधर्माचरण । स्वामित्वालागी दंडधारण । अर्थोम जाण जीविकावृत्ती ॥ ९६ ॥ इहामुत्र कामभोग । तदर्थ करिती योगयाग । 'चहू पुरेपार्थी हा चाग । साधनमयोग अभका ॥ ९७ ॥ ऐसे शोधितां साधन । सहसा सिद्धि न पवे जाण । अनेक विकळता दूपण । माजी छळी विघ्न देवाचें ॥ ९८ ॥ तैसे मनकासी नव्हे जाण । माझें करिता अनन्यभजन । चारी पुरुषार्थ येती शरण । पायाँ १येत, करुणा २समासमान ३ उत्सठित ४ तळमळ, चिंता ५ उत्सुकता ६ ओवाळणी ७ सिद्ध होते ८ अयोग्य ९ वार्ता १.मुक होण्याची इच्छा करणारे १५ निराळे, दुसरे १२ सागितले १३ निरनिराळी १४ द्रव्याजनाचा उद्योग १५ या लोकीचे व खगाचे. १६ ज्ञानान मोक्ष, कर्माने धर्म आणि काम, योगाने अणिमादि अष्टसिद्धी, शेतीमाती व व्यापार यान इन्य, आणि ददनीतीन ऐश्वर्य, येणेप्रमाणे अनुकमान मिळवायाची असतात १७ भक्तिहीनाला. १८ घन, अर्थ, काम माणि मोक्ष