या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८१० एकनाथी भागवत नावा भरोनियां समया । शंखोद्धारा न्या ह्मणती ॥ १॥ पालाणोनि रथकुंजर । चतुरंग सेनासंभार । कृष्णसहित यादववीर । निघाले समग्र प्रभासासी ॥२॥ तसिन् भगवताऽऽदिष्ट यदुदेवेन यादवा । चक्रुः परमया भक्त्या सर्वधेयोपहितम् ॥ ११ ॥ यादव प्रभासा पावोन । जैसे होते श्रीकृष्णवचन । त्याहूनि विशेपी जाण । स्नानदाग तिही केले ॥३॥ यादव समस्त मिळोन । केले पारणाविधिभोजन । मग महामद्य आणूनि जाण । मद्यपान माडिले ॥ ४ ॥ ___ ततस्तस्मिन्महापान पपुरियक मधु । विष्टविभ्रशितधियो यद्रवेभ्रंश्यते मति ॥ १२॥ करूनियां तीर्थविधान । करावे अरिष्टनिरसन । वाप अदृष्टाचे विदान । तेथे मद्यपान मांडिलें ॥५॥ ज्याची गोडपणे पडे मिठी । उन्मादता अतिशय उठी । तें मद्यपान उठाउठीं । वडिलीधाकुटी मांडिले ॥६॥ ज्याचा वास येताचि प्राणीं । उन्माद चढे तत्क्षणीं । तैशिया मद्याचे मद्यपानी । वीरश्रेणी वैसल्या ॥ ७॥ मैरेयकमद्याची थोरी । मधुरता अतिशयें भारी । लागताचि जिह्वेवरी । म्रात करी सज्ञाना ॥८॥तें मद्यपान यादववीरी । आदरिले स्वेच्छाचारी । आग्रह करूनि परस्परी । लहानथोरी माडिले ॥१॥ महापानाभिमत्तामा वीराणां इसचेतसाम् । कृष्णमायाविमूढाना सङ्घर्ष सुमहानभूत् ॥ १३ ॥ पूर्वी अतिमित्र पोटात । ते मद्यपाने झाले मत्त । वीर मातले अति दृप्त । नोकूनि बोलत परस्परे ॥ ११०॥ कृष्णमाया हरिला बोधैं । अवघे झाले बुद्धिमंद । सांडूनि सुहृदसंबंध । निर्वाणयुद्ध मांडिले ॥ ११ ॥ नोकूनि बोलता विरुद्ध । अतिशय चढला क्रोध । शस्त्रे घेऊनि सन्नद्ध । सुहृदी युद्ध माडिले ॥ १२॥ ___युयुधु गोधसरधा घेलायामाततायिनः । धनुर्भिरसिमिलर्गदामितोमरभि ॥ १४ ॥ क्रोधे नेत्र रक्तांबर । वेगें वोइनि हातियेर । समुद्रतीरी महावीर । युद्ध घोरांदर ते करिती ॥ १३ ॥ धनुप्ये वाऊनियां जाणा । बाण सोडिती सणसणां । खॉ हाणिती खणखणा । सुहृदांच्या प्राणां घ्यावया ॥ १४॥ एकी उचलोनिया भाले । परस्परें हाणिते झाले । एकी गदा उचलोनि च । वीर करवळे पाडिती ॥ १५॥ एक तोमरें लवलाहीं। रणी खवळले भिडती पाही । एक टोणप्याच्या पायीं । वीर ठायीं पाडिती ॥ १६ ॥ यापरी चतुरगसेना | मिसळली रणकंदना । आपुलालिया अगवा । गज रथ रणा आणिले ॥१७॥ १पल्ययन भणजे योगीर ह्यापासून पल्याण, पालणं, इत्यादि शब्द निघाले. 'दुवार कामसिंही ज्या वीर पातचि पल्माण'-मोरोपतकृत सन्माणिमाला पालाणणे सोगीर घालणे, सज्ज करणे "रथकुजर पालाणा । सनद्ध करा चतुरंगसमा"-रुक्मिणीखयवर, प्रसग ५ "को सवळला सकर्पण । ह्मणे 'पालाणारे सकळ सैन्य' " मुकेश्वर आदिपर्व अध्याय ४७ पालाणणे झणजे चढवणे, तरगणे असाही अथ कोठे कोठे आहे "जलनिधिवार यानी शैल पालाणवावे"मुक्कवरी रामायण २ करणी, तत्व ३ लहानथोरानी ४ यादववीराच्या पती ५ उच्छखळपणाने, यथेच्छ ६ गर्वाने पुगरले ५ टाकून, सोचून नोकणे किवा नोमिणे मगजे छळणे, राकणे "ते हे चतुभुज कोमेली ! जयाची शोभा रूपासि आण। दयानि नास्तिकी नोकिली। भक्कदे"-ज्ञानेश्वरी अध्याय ६-३२४. जेव्हा भकदे नास्तिकानी छळिली, तेव्हा मा चतुभुज मूर्ति धारण फेली असा सदर ओवीचा अर्थ आहे नोकणे ह कानही क्रियापद दिसते त्याचा अर्थ टोचणे राम धरण, नेम धरणे असा आहे ८ कृष्णमायेने आत्मज्ञान हरण केले ९ सिद्ध झारेले १० आरत, लालभडक, १ हत्यार १२ घनघोर. १३ सोव्याच्या घावाने १४ कत्तल करण्यासाठी. १५ मदतीस, बाजूस.