या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. थादव समस्त निमाले ॥ ९३ ॥ यादवी जाऊनि प्रभासासी । केला तीर्थविधि विधानेसीं । दान भोजने देऊनि द्विजासी । मद्यपानासी माडिलें ॥ ९४ ॥ चढला मद्याचा उन्मादू। , यादव सखे सगोत्र बंधू । परस्परें युद्धसवंधू । गोत्रवधू तेध घडला ॥ ९५ ॥ शस्त्रेकरूनि स्वयमेव । कोणी न मरतीच यादव । तेथ घडले एक अपूर्व । एरिकेने सर्व निमाले ॥१६॥ बलिभद्रे त्यागिले देहासी । श्रीकृष्ण गेला निजधामासी । मज धाडिले तुह्मापासीं । क्षण द्वारकेसी न राहावे ।। ९७ ॥ हरीने त्यागिले द्वारकेसी । समुद्र बुडवील शीघ्रगतीशीं । हे कृष्णे सांगीतले तुझांसी । एथूनि त्वरेंसी निघावे ।। ९८ ॥ ऐकूनि दारुकाची गोठी । द्वारकेसी एक वॉव उठी । उग्रसेन कपाळ पिटी । मस्तक आपटी वसुदेव ॥ ९९ ॥ एक कुस्करिती दोनी हात । एक अत्यंत चरफडत । एक आक्रोशे आक्रंदत । एक मूछित 4 पडली ॥ २०० ॥ एका रडतां शोपले कंठ । एकाचे दोनी फुटले ओंठ । एकाचा होऊ पाहे हृदयस्फोट । दुःख अचाट सर्वांसीं ॥१॥ एक स्फुदती उकसावुकशी । एक पिटिती हृदयासी । एक तोडिती कानकेशी । एक दुःखें पिशी पै जाहली ॥२॥ एक देती दीर्घ हाका । एक पडली अधोमुखा । एक मीनापरी देखा । अत्यंतिका तळमळती ॥३॥ वोव सुटली नरनारी । शंख करिती घरोघरी । कोण कोणाते निवारी । समस्तां सरी समदुःख ॥४॥ देवकी आणि रोहिणी । मूञ्छित पडल्या धरणीं । सवेचि उठती आक्रंदोनी । दीर्घध्वनी विलपती ॥ ५॥ कृष्णा निजाच्या विसीविया । भेटी दे कां रे कान्हया । कां रुसलासी तान्या । तुझिया पाया लागेन ॥ ६ ॥ कृष्णा तू माझा कैवारी । कृष्णा तूं माझा सहाकारी । शेखी मज साडोनि अंधारी । तू दूरचे दूरी गेलास ॥७॥ जिंणोनि कसकेशियांते । वदी सोडविले आमुते । शेखी तुवा सांडिले एथें । अती किले मातें श्रीकृष्णा ॥ ८॥ आणूनि निमाल्या पुत्रातें । तुवा मज सुखी केले एथे । शेखी तुवा साडिले एथे । निष्ठुर चित्तें जाहलासी ॥ ९॥ कृष्णा निरसूनि माझे दुःख । तुवा दिधलें परम सुख । तो तूं निष्ठुर जाहलासी देख । अंती निःशंक साडिलें ॥२१०॥ माझिया पुत्रा कृष्णराया। चेगी ये कारे कान्हया । माझ्या नाहीं प्राशिले पान्हया । ह्मणोनि तान्हया रुसलासी ॥ ११ ॥ जिचे केले स्तनपान । ते यशोदाही जाहली दीन । तझें न देसता वदन । कैसेनि प्राण राहतील ॥ १२ ॥ कृष्णा येरे येरे धावोन । चौभुजी मज दे आलिंगन । तुझे चुंवीन रे वदन । मी अतिदीन तुजलागीं ॥ १३ ॥ कृष्णा माझिया श्यामसुंदरा । राजीवलोचना सुकुमारा । चतुर्भुजा शार्ङ्गधरा । ये का रे उदारा श्रीकृष्णा ॥१४॥ तुझे पझांकित पाये । मज आठवती पाहे । तेणे हृदय फुटताहे । करूं भी काये श्रीकृष्णा ॥ १५ ॥ कृष्णा तुजहूनि वेगळी । मी जाहले रे आधळी । माझी धरावया आगोळी । धाव वनमाळी श्रीकृष्णा ॥ १६ ॥ मज अंधेची कृष्ण काठी । कोणे घातली बैकुंठी । आता मी मार्ग केउता कंठी । पाय जगजेठी श्रीकृष्णा ॥१७॥ पुत्र नातू वंशा. वळी । एके वेळी जाहली होळी । कोणी नुरेचि यदुकुळीं । चक्षास्थळी पिटिती ॥१८॥ १ सपळे, मेले २ प्रभासपणनामक क्षेत्रास ३ यथासान ४ रम्हाळ्यानी ५ र रडवून रडू लागले कान माणि पेश ७ घडी ८ विलाप करु लागल्या ९ आमच्या १० विश्रांति देणा-या ११ परामवन पनि* ११ धाच्या पा ह्यास १४ कमलनेत्रा १५ फमलान चिहित कसा पार पाडीन