या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागयत. मिळणी तात्मिका जाली ।। ३९ ॥ जैसी गती रुक्मिणी । तैशाचि मुख्य सातजणी। आणीक सोळासहस्र कामिनी । प्रवेशल्या अग्नी तादात्म्यभावें ॥ २४० ॥ जिहीं भोगिले कृष्णसुरतसुख । त्यासी गति न्यूनाधिक । बोलता यांचेसी लागे दोख । जाहल्या चिदास्मक कृष्णांगसगें ॥४१॥ जो वाचे स्मरे कृष्ण कृष्ण । तो तदात्मता पावे पूर्ण । मा जिहीं भोगिला श्रीकृष्ण । त्याशी दशा न्यून कदा न घडे ॥ ४२ ॥ ज्यासी लागे कृष्णांचा अंगसंग । त्याच्या लिंगदेहा होय भंग । त्यासी पूर्ण पदवी अभंग । भोगिता भोग तादात्म्य नित्य ॥४३॥ ज्याच्या ध्यानासी ये कृष्णमूर्ती । त्यासी चारी मुक्ति बंदिती। मा जिंहीं स्वयें भोगिला श्रीपती । त्यांसी अन्य गति असेना ॥४४ ॥ ज्यांसी इहलोकी कृष्णसंगती । त्यांसी परलोकी अन्य गती । वोलतां सज्ञान कोपती । त्यासी पूर्ण प्राप्ती पूर्णत्वे ॥ ४५ ॥ जो अडखळोनि गंगेसी पडे । त्याचे पातक तत्काळ उडे । मा ज्यासी विध्युक्त स्नान घडे । त्याचे पाप न झडे मग कसेनी ॥४६॥ तेवीं कृष्णव्यभिचारसगती । गोपी उद्धरल्या नेणों किती । त्याच्या निजपत्यांसी अन्य गती । कैशा रीती घडेल ॥४७॥ तृण वल्ली मृग पापाण । गायी गोपिका गौळीजन कृष्णसंग तरले पूर्ण । त्याचिया स्त्रियांसी अन्य गति कैशी ॥४८॥ यालागी कृष्णसगती । ज्यांसी घडली भलत्या रीती । ते उद्धरले गा निश्चिती । जाण परीक्षिती कुरुराया।। ४९॥ अर्जुन प्रेयस सायु कृष्णस्य विरहातुर । भारमान सान्वयामास कृष्णगीते सदुक्किमि ॥२१॥ ज्याचा रथ वागवी आपण । ज्याचा सारथी श्रीकृष्ण । ऐसा प्रियसखा अर्जुन । कृष्णविरहें पूर्ण उद्विग्न जाहला ॥ २५० ॥ तंव कृष्णगीता सदुक्ती। आठवली त्याचिये चित्ती । मग आपण आपण्याप्रती । चोलिला उपपत्ती त्या ऐका ॥५१॥ कृष्ण माझ्या मनाचें मन । कृष्ण बुद्धीचे आयतन । कृष्णप्रभा हे प्रकाशे ज्ञान । तेथ भिन्नपण मज कैसे ॥ ५२ ॥ कृष्णप्रभा दृष्टी देखे । कृष्णअवधाने श्रवण ऐके । कृष्णानुवादें बोल वोलके । तेय मी वेगळिके वृथा मानी ।। ५३ ।। कृष्ण हृदयस्थ आत्मा अव्यंग । कृष्ण माझ्या अगाचे अग । त्या कृष्णासी मज वियोग । हा मिथ्या प्रयोग मायिक ॥ ५४॥ कृष्ण माझ्या जीवाचें जीवन । कृष्ण सवाह्य परिपूर्ण । कृष्णे वियोग मानिजे मीपण । तेही निमग्न श्रीकृपणी ॥ ५५ ॥ भिन्न भिन्न भूताकृती । त्यामाजी अभिन्न कृष्णस्थिती। विपी समान श्रीपती । त्यासी वियोगप्राप्ति कदा न घडे ॥ ५६ ॥ घट मृत्तिकेसी नव्हे भिन्न । पट नव्हे तंतु त्यागून । तैसा श्रीकृष्णावेगळा अर्जुन । माझें मीपण निवडेना ॥ ५७ ॥ कृष्णवियोग मी मानी जेय । तेयही असे श्रीकृष्णनाथ । वियोग मानिजे सत्य । ते केवळ भ्रात अतिमूर्ख ।। ५८ ॥ नित्य सर्वगत परिपूर्ण । कृष्ण अखंडदंडायमान । त्यासी मजसीं वेगळेपण । सर्वथा जाण असेना ॥ ५९ ॥ 'न जायते वियते' हे वचन । स्वमुखें बोलिला पुरुपोत्तम । त्या कृष्णासी जन्ममरण । मूर्खजन मानिती ॥ २६० ॥ 'अक्षर ब्रह्म परम' । स्वयें बोलिला पुरुषोत्तम । त्या कृष्णासी जन्ममरण । मूर्ख मनोधर्म - १ कृष्णमुरतमुख ज्यानी भोगिलें खाना न्यूनाधिक गति योग्यतेप्रमाणे मिळाली असे नसून त्या कृष्णाच्या अगस. गान सवच चिदात्मक झाल्या . सायुज्यमुक्ति ३ स्थिति ४ वासनात्मक सूक्ष्म देहाला ५ तत्स्वरूपता ६ यथाशाख vोगत्याही प्रकारे ८दुर्भनरक, दुखी ९ भगरगीतामृत १० स्थान ११ बुडून गेले १२ बस्न १३ "अक्षर ब्रह्म परम"-भगवद्वीता अध्याय ८ टोक ३.१४ मनाचे धर्म, मनोवृत्तिः ।