या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८३८ एकनाथी भागवत. यन्धूनां मांगोग्राणामर्जुन सांपरायिकम् । हताना कारयामास यथावदनुपूर्व ॥ २२ ॥ यादव निमाले कुलवंशेसी । गोत्रज नाहीं कर्मातरासी । वज्रं राहिला द्वारकेसी । तो विधी अर्जुनासी करणे पडला ॥ ८५ ॥ मी पावलो निष्कर्म ब्रह्म । तो मी न करीं अंत्य. कर्म । ऐसा ज्ञानगर्वोपक्रम । तोही सूक्ष्म भ्रम अर्जुनी नाहीं ॥ ८६ ॥ 'कर्मण्यकर्म यः पश्येत् । हा अर्जुनी वाणला पूर्णाश । तेणे तो अंत्यकर्मास । स्वयें सावकाश करिता जाहला ॥ ८७ ॥ प्रथम ज्येष्ठांचे दहन । पाठी कनिष्ठाचे जाण । तसेच करी पिंडदान । तिळतर्पण सर्वांचे ॥ ८८ ॥ उत्तरक्रिया करूनि सपूर्ण । द्वारकेसी आला अर्जुन । तेही वर्तले आन । समुद्र दारुण क्षोभला ॥ ८९ ॥ द्वारका हरिणा सक्ता समुदोऽसावयरक्षणात् । वर्जयित्वा महाराज श्रीमद्भगवदालयम् ॥ ३ ॥ नित्य सनिहिवस्तान भगवान् मधुसूदन । स्मृत्याऽशेपाशुभहर सर्वमगरमएम् ॥ २५ ॥ द्वारका सांडूनि गेला कृष्ण । तेथ समुद्र आला आपण । बुडविली न लागतां क्षण । पळाले जन हाहाभूत ॥ २९० ॥ द्वारका बुडविली पूर्ण । रासिले भगवंताचे स्थान । जो आला पाताळीहून । कुळनिर्दळण करावया ॥ ९१ ॥ तें भगवंताचे स्थान । समुद्र न करीचि निमग्न । जेथ हरीचे सन्निधान । नित्य नूतन स्फुर्रद्रूप ॥ ९२ ॥ ज्याचें करितांचि स्मरण । महापातका निर्दळण । सकळ मंगळाचे आयतन । तें हरीचे स्थान उरले असे ॥ ९३ ॥ द्वारकेमाजी नित्यपूजा । अद्यापि होतसे गरुडध्वजा । ऐक परीक्षिति महाराजा। ते अधोक्षजाचे स्थान ।। ९४ ॥ स्त्रीवारवृद्धानादाय हतशेपान् धनञ्जय । इन्द्रप्रस्थ समायेश्य यन्न तनाभ्यपेचयत् ॥ २४ ॥ ___ एवं द्वारका जाहलिया निमग्न । उरले वाल वृद्ध स्त्रीजन । त्यांसी घेऊनियां अर्जुन । निघाला आपण इंद्रप्रस्था ॥ ९५ ॥ यादव प्रभासापर्यंत । गेले ते निमाले समस्त । उरले जे द्वारकेआंत । वज्रादिकासमवेत अर्जुन निघे ॥९६ ॥ एवं घेऊनिया समस्तांसी । पार्थ आला इंद्रप्रस्थासी । राज्यधर यादववशीं । तेथ बनासी अभिषेकी ॥ ९७ ॥ अनिरुद्धाचा पुत्र बन । यादववंशी राज्यधर । अभिपेकूनि अर्जुनवीर । निघे सत्वर धर्माप्रती ।। ९८॥ अस्था सुहृद्ध राजतर्जुनाते पितामहा । स्वा तु पशधर हरवा जग्मु सर्वे महापथम् ॥ २६ ॥ निजधामा गेला श्रीपती । अर्जुने सागता धर्माप्रती । तुज राज्य देऊनि परीक्षिती । लागले महापंथीं तत्काळचि ॥ ९९ ॥ निजधामा गेला श्रीपति कृष्ण । ऐकतां कुत्या सांडिला प्राण । द्रौपदीसहित पाचही जण । महापंथी जाण निघाले ॥ ३०॥ यण्त देवदेवम्य बिष्णो कर्माणि जन्म च । कीर्तयेत् श्रद्धया मस्यै सर्वपापै प्रमुच्यते ॥ २७ ॥ देवाधिदेव सर्वेश्वर । त्याचे मत्स्यकूर्मादि अवतार । जन्मकर्मादि नाना चरित्र । गाती ते पवित्र पुण्यराशी ॥१॥ तेंचि चरित्र तत्त्वता । श्रद्धायुक्त गीती गातां । प्रयागादि समस्त तीर्था । होय पवित्रता त्याचेनी ॥२॥ श्रद्धायुक्त हरिकीर्तन । त्याचे पवित्रतेसमान । आन नाहीं गा पावन । तुझी आण गा परीक्षिति ॥ ३ ॥ ते तूं श्रद्धा कोण मणसी । जेवीं धनलोभी धनापासीं । गुळी आवडी माकोड्यांसी । तैसी कीर्तनासी १ मनिरुदाचा मुलगा २ ज्ञानगर्चाचा फुज ३ गीता अध्याय ४-१८ ४ आणखी ५ हाहाकार करीत. प्रकारारूप. ७ स्थान. ८ रापिले निर्याणी. १० कुतीने ११ भुगळ्यांस - - - -