या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

HT. एकनाथी भागवर. मृत्तिका । ते वंद्य होती तिहीं लोकां । नित्य निजसखा श्रीकृष्ण जो. ॥४७० ॥ जे पठणरूपं जाणा । प्रत्यंगावृत्ति प्रदक्षिणा । सद्भावे करितां सुजाणा । श्रीकृष्णचरणां विनंटती ॥७१॥ ये कथेच्या विचित्र लीला । जे नित्य घालिती रंगमाळा गळा । ते नांगवती कळिकाळा । सदा त्यांजवळा श्रीकृष्ण ॥ ७२ ॥ हे एकादशाचे वृंदावन । जोनवणे करी नित्य पूजन । त्यासी प्रसन्न तो श्रीकृष्ण । देहामिमान निर्दळी ॥ ७३ ॥ तेथ मनाची पुष्पांजळी । जो अनुदिनीं अी त्रिकाळी । तोही पावे हरिपदकमळी । निजात्ममेळी निजनिष्ठा ॥ ७४ ॥ हे श्रीभागवत वृंदावन । मेळवूनि संत सजन । ये कथेचें करी जो व्याख्यान । जो पठण करी निरपेक्ष ॥ ७५ ॥ हे देखूनि महापूजन । सतोपे श्रीजनार्दन । श्रोते वक्ते जे सावधान । त्यासी निजात्मज्ञान स्वयें देत ॥७६ ॥ श्रवणें पठणे मननें । अर्थावबोधव्याख्याने । एकादशे समान देणे । ज्ञान पावणे जाणत्यां नेणत्याही ॥ ७७ ॥ श्रवण मनन नव्हे पठण । तरी एकादशाचे पुस्तक जाण । ब्राह्मणासी द्यावे दान । विवे. कज्ञान तेणे उपजे ॥ ७८ ॥ एकादश द्यावे दान । करावे एकादशाचे पूजन । करितां एकादशाचे स्मरण । पाप सपूर्ण निर्दळे ॥ ७९ ॥ एकादशसंग्रह जो करी । कृष्ण तिष्ठे त्याचे घरीं । जो एकादशाची श्रद्धा धरी । ज्ञान त्यामाझारी स्वयें रिघे ॥ ४८० ।। श्लोक श्लोकाध पदमान । नित्य स्मरे ज्याजें वैन । तोही होय परम पवित्र । अतिउदार एकादश ॥ ८१ ॥ अवचटें कार्यातरी । दृष्टी पडे एकादशावरी । तैं पातक होती रानभरी। अपंधा दूरी ती पळती ॥ ८२ ॥ तो एकादश ज्याचे करी । देव वंदिती त्याते शिरी । तो निजांगें जग उद्धरी । एवढी थोरी एकादशाची ॥ ८३ ॥ सकळ पुराणांमाझारी । हा एकादश नवकेसरी । भवगजाते विदारी । क्षणामाझारी श्लोकार्धं ॥८४ ॥ 'मामेकमेव शरणं' । याचि श्लोकाचें करिता पठण । मायेचा गळा धरोनि जाण । अधाकें पूर्ण ससार निमे "॥ ८५ ॥ 'निरपेक्षं मुनि शांतं । हा श्लोक चढे जै हात । ते सेवका सेवी कृष्णनाथ । भवभय तेथ उरे कैचें ॥ ८६ ॥ एकादशींचा एकेक श्लोक । होय भवबंधच्छेदक । जेथ वक्ता यदुनायक । तेथ हा विशेख ह्मणों नये ॥ ८७ ॥ श्रीभागवतामाजी जाण । एकादश मोक्षाचे स्थान । यालागी श्लोकार्धमात्रेकरून । भववंधन निर्दळी ॥८॥ श्रीकृष्ण वेदाचें जन्मस्थान । त्याचे मुखींचे हे निरूपण । तें सकळ वेदार्थ जाण । माहेरा आपण स्वयें येती ॥ ८९ ॥ यालागी एकादशी वेदार्थ । माहेरी सुखावले समस्त । ते साधकासी परमार्थ । स्वानंद देत सपूर्ण ॥ ४९० ॥ मंथोनि वेदशास्त्रार्थ । व्यासे केले महाभारत । त्या भारताचा मथितार्थ । श्रीभागवत हरिलीला ॥ ९१ ॥ त्या भागवताचा साराश । तो हा जाण एकादश । तेथ वक्ता स्वयें हपीकेश । परब्रह्म सुरस' प्रवोधी ॥९२ ॥ भागवतामाजी एकादश । जैसा यतीमाजी परमहंस । का देवामाजी जगन्निवास । तैसा एकादश । परम वंद्य ॥ ९३ ॥ पक्ष्यामाजी राजहंस । रसामाजीं सिद्धरस । तैसा भागवतामाजी एकादश । परम सुरस अतिबंध ॥ ९४ ॥ तीर्थ क्षेत्र वाराणसी। १ अनेक पाठ ह्याच प्रदक्षिणा २ दास मनतात. ३ सापडत नाहीत ४ सकरपरहित ५ तोंड ६ सहज ७ दुसरे काम करितांना ८ र पा जातात भयाने १० तरुण सिंह , ११ नाहीसा होतो १२ विशेप १३ साराशः १४ परी १५ फुटचक, बदक, इस, र परमहस, या चार प्रकारच्या सम्याशात १६ विष्णु १७ अमृत