या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. क्षोभ न साहवती । निंदकांची निदा न जिरे चित्ती । तै तो कोरडाचि परमार्थी । क्षोभ निश्चिती नागविला ॥ २१ ॥ एवं पराचे , प्रकृतिगुण । पाहतां सर्वथा क्षोभे मन । ते न पहावे आपण । सर्व भूती चैतन्य समत्वे पहावे ॥२२॥ येचि उपदेशी अत्यादर । जनादेने केला थोर । यावेगळा भवाब्धिपार । सज्ञान नर पाहो न शके ॥ २३ ॥ येणेचि निर्धारें गुरु तो गुरू । आमां शिष्य तोही सवादगुरू । निंदक तो परम गुरू । निरपराध सद्गुरु जनार्दनकृपा ॥ २४ ॥ जनार्दनकृपा एथे। गुरुवेगळे नुरेचि रितें । मीपणासह सकळ भूतें । गुरुत्वा निश्चिते आणिली तेणे ॥ २५ ॥ तेणेचि हे ग्रंथकथा । सिद्धि पावः विली परमार्था । माझे गांठीची नव्हे योग्यता । हे जाणितले श्रोता ग्रंथारभी ॥ २६ ॥ ग्रथारभ प्रतिष्ठानी । तेथ पंचाध्यायी सपादूनी । इतर ग्रंथाची करणी । आनंदवनी विस्तारिली ॥ २७ ॥ अविमुक्त महाश्मशान । वाराणसी आनंदवन । एकासचि नांवें जाण । ऐका लक्षण त्याचेही ॥ २८ ॥ अतिशय जेथ मुक्की। अधमोत्तमा एकी गती। पुढती नाही पुनरावृत्ती। अविमुक्त ह्मणती या हेतू ।। २९ ।। जे श्मशानी सांडिल्या प्राण । प्राणी पुनः न देखे मसण । यालागी हे महाश्मशान । अती ब्रह्मज्ञान शिव सागे ॥ ५३० ॥ मोदासेतु वरुण अशी। मध्ये नांदे पंचक्रोशी । रिगमु नाहीं पातकांसी । थालागी वाराणसी मणिपे इते ॥३१॥ वरुणा पातकाते वारी । अशी महादोप संहारी। मध्ये विश्वेश्वरनगरी । वाराणसी खरी या हेतु ॥ ३२ ॥ जे विश्वेश्वराचे क्रीडास्थान । जेथ स्वानंदें शिव क्रीडे आपण । यालागीं तया आनंदवन । ज्यालागी मरण अमर . वाछिती ॥३३॥ जेथें जिता सदन्ने भुक्ती । मेल्या मार्गे अचूक मुक्ती । यालागी आनंदवन ह्मणती । पार्वतीप्रती सदाशिव सांगे ॥ ३४ ॥ तया वाराणसी मुक्तिक्षेत्रीं । मणिकर्णिकामहातीरी । पचमुद्रापीठामाझारी । एकादशावरी टीका केली ॥ ३५ ॥ ऐकतां सतोपले सज्जन । स्वानंदें तुष्टला जनार्दन । पंचाध्यायी सपता जाण । स्वमुखें आपण वरद वदला ॥ ३६ ॥ ग्रंथ सिद्धि पावेल यथार्थी । येणे सज्ञानही सुखी होती । मुमुक्षु परमार्थ पावती । साधक तरती भवसिधू ॥३७॥ भाळे भोळे विपची जन । याचें करिता श्रवण पठण । हरिभक्त होती जाण । सन्मार्गों पूर्ण बहुत होती ॥ ३८ ॥ हे टीका तरी मराठी । परी ज्ञानदाने होईल लाठी। ऐसे निजमुखी वोलोनि गोठी। कृपादृष्टी पाहिले ॥ ३९ ॥ तेथ म्याही केली विनंती । जे ये ग्रंथी अर्थार्थी होती । त्यासी ब्रह्मभावे ब्राह्मणभक्ती । नामी प्रीती अखंड द्यावी ॥ ५४०॥ते न व्हावे' ब्रह्मद्वेपी । निदा नातळावी तयासी । समूळ क्षय ब्रह्मदेसीं । निदेपासीं सकळ पापें ॥४१॥ ऐसी ऐकता विनवण । कृपेने तुटला जनार्दन । जे जे माझें वरदान । वरद आपण स्वयें बदला ॥४२॥ ये ग्रंथीं ज्या अनन्यभकी । निंदाद्वेप नुपजे चित्ती । रामनामी अतिप्रीती । सुनिश्चिती वाढेल ॥४३॥ अविद्य सुविद्य व्युत्पत्ती । न करिता ब्राह्मणजाती । ब्रह्मत्वे होईल ब्राह्मणभक्ती । तेणें प्राममाप्ती अचूक ॥ ४४ ॥ नामापरता साधनसम्झायो । नाहीं ब्राह्मणापरता आन देवो । १ परमार्थरूप भावाय १ ससारसमद्राचे परतीर ३ पदरची, भीपणाच्या ठिकाणची ही योग्यता नव्हे ४ पैठणात ५ काशीत काशीला भानदवन क्षणतात काशीचें नाव पकामाने निधयाने पाच अध्याय १० मोठी. प्रार्थना.