या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. जेवी प्रत्यक्ष दिसे मृगजळ । परी ते निदाघ केवळ । तेवी स्वरूपी माया प्रबळ । मुळी निर्मूल आभासे ॥ ११॥ हे मिथ्या माया कल्पनावशे । प्रवळ बळे भासली दिसे । नासूं जातांनाशिजे ऐसे । सत्यत्वे नसे निजांगें ॥१२॥ नायरूपाचिया भंडसे । ब्रह्मादिक केले पिसे । मिथ्या त्रिपुटीविन्यासे । ज्या बांधिले दिसे त्रैलोक्य ॥ १३ ॥ जेवी दीपासवे दिसे छाया । नाशिता नीतुडे नाशाचया । तेवी स्वरूपी मिथ्या माया । अतिदुर्जया देवासी ॥ १४ ॥ जेवी देहासवे मिथ्या छाया । तेवी ब्रह्मी मिथ्या माया । कल्पनायोगे वाढली वायां । यालागों 'अर्जया' वेदशास्त्रे ह्मणती ॥ १५ ॥ राया कल्पना वाढे जे गयीं । तेचि मायेचें हड मूळ पाहीं । जो निर्विकल्प निजदेहीं । त्यासी माया नाही तिहीं लोकीं ॥१६॥ कल्पिती कल्पना जे राया । तेचि जाण मुख्य माया । आणीक रूपकें सागावया । नातुडे मायानिरूपणीं ॥ १७ ॥ तेचि त्रिविध मुख्यलक्षणीं । माया सागीतली विवंचोनी । आतां कोण्या अर्थीचे श्रवणीं । अत्यादरू मनी बर्ते राया ॥ १८॥ माया दुस्तर दारुण । ऐकूनि ऋत्विज ब्राह्मण । थरारले सभाजन । राजाही पूर्ण विस्मित जाहला ॥ १९ ॥ नवल मायेचें रूपक । नाशं न शकतीच जाते लोक । जिया 'गोविले ब्रह्मादिक । इतरांचा देख पांडु कोण ॥२२०॥ माया आक्रमूनि शिवासी । तोही आणिला जीवत्वासी । ते माया तरावया दीनासी । उपावो यासी पुसो पां ॥ २१ ॥ सुखोपायें दीन जन । दुस्तर माया तरती पूर्ण । तदर्थों राजा आपण । अत्यादरें प्रश्न श्रद्धेने पुसे ॥२२॥ राजोवाच-ययैतामैश्वरी माया दुस्तरामकृतात्मभि । तरत्यक्ष स्थूलधियो महर्प इन्मुच्यताम् ॥ १७ ॥ __ अतिदुस्तर हरीची माया । आइकोनि हांसें आले राया।लटकीच परी देहाभिमानिया । बांधावया दृढ जाहली ॥ २३ ॥ माया दुस्तर शास्त्रप्रसिद्धी । तेथ भाळेभोळे स्थूळबुद्धी। सुखें तरती कोण विधी । तो सांग त्रिशुद्धी उपावो ॥ २४ ॥ ज्यासी वश्य नाहीं निजमन । आणि भवान्धि तरावया भाव पूर्ण । ऐसे भोळे भाविक जन । त्यासी मायातरण सुगम सागा ।। २५ ॥ मागा कवी वोलिला सकलितीं । 'तन्माययाऽतो बुध आभजे ति । गुरु ब्रह्म अभेदस्थिती । करिता भक्ती माया तरिजे ॥२६॥ ते भक्तीचे स्पष्ट लक्षण । विशद होआवया श्रवण | पुढती मायेचे तरण । पुसावया कारण मुख्यत्वे हेची ॥ २७ ॥ तो मायातरणोपायविधी । सुगम सांगावया त्रिशुद्धी । अतरिक्षाधाकुटा सुबुद्धी । प्रवुद्ध प्रज्ञानिधी बोलता जाला ॥ २८ ॥ प्रजुद्ध उवाच-कर्माण्यारभमाणाना दुखहत्यै सुखाय च । पश्येत्याकविपर्यास मिथुनीचारिणा नृणाम् ॥१८॥ मुख्य मायेचे तरण । प्रबुद्धचि जाणे पूर्ण । प्रबुद्ध जाहलिया आपण । मायेचें विदान तरते तरती ॥ २९ ॥ मनी विपयाचा छंदू । तो केवळ महावाधू । विपयत्यागी तो प्रबुद्ध । तोचि विशद भावो आइका ।। २३० ॥ विषयीं लोभले अत्यंत मन । तेथ नव्हतां वैराग्यज्ञान । कदा नव्हे मायेचें तरण । वैराग्यार्थ जाण विषय निदी ॥ ३१ ॥ केवळ नश्वर विपय देख । तेचि मानिती परम सुख । तें सुखचि दुःखदायक । स्त्रीकामें मुख्य माया बाधे १रसरवीत ऊन २ तिचा नाश कराया जावे तर तिला अगच नाही ३ भपक्याने ४ ज्ञेय, ज्ञाना, आणि ज्ञान अशा त्रिपुटीच्या विस्तारकस्न ५रूपासवें ६ सापडत नाहीं ७ जिंकण्याला अशक्य ८ करपा करणारी १ स्पष्ट करून १० गडवडर ११ गुनिले १० प्रतिष्ठा १३ तरवे दीनासी तो १४ रधून देहालाच आत्मा समजणारे मड जन १५ सरापुरा १६ भवसागर, जन्ममरणरूप ममुद्र १५ सोपाी १८ ज० २लो०३७ १९ गुरु व ना एक्रूर आहेत अशी भावना २० सर २१ मायातरण विधि प्रबुद्ध मणजे ज्ञानीच जाणतो, तेव्हा प्रबुद्धान (या नावाच्या मुनी) तो सांगावा च योग्य आहे