या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. तरी 'जो कायावाचामनें । अतिकृपाळू दीनाकारणे । तोडी शिष्यांची भवबंधनें । उठवी ठाणे अहंकाराचें ॥ ९७ ॥ जो शब्दज्ञानें पारगतू । ब्रह्मानंद सदा डुल्लतू । शिष्यप्रबोधनी समयूँ । यथोचितू निजभावे ॥९८॥ ज्याचा जैसा जैसा भावो । तैसा तैसा करी अनुभवो। तरी गुरुत्वाचा अहंभायो । अणुमात्र पहा हो धरीना ।। ९९ ॥ शिष्यापासूनि सेवा घेणे । हे स्वप्नीही न स्मरे मने । शिष्याची सेवा स्वयं करणें । पूज्यत्वे पाहणें निजशिष्या ॥ ३०० ।। शिष्य देखावा पुत्रासमान । हे स्मृतिवाक्य असे प्रमाण । दृष्टी देखों नेणे गौण । शिष्या देखे पूर्ण ब्रह्मत्वे ॥१॥ शिप्यसेवा करी निजभावार्थे । परी तो सेवक न ह्मणे त्यातें । ज्यासी भगवद्रूप सर्व भूतें । शिष्य वेगळा तेथें सेवकत्वे नुरे ॥२॥ ऐसा मी एक महायोगी । हेही न मिरवी तो जगीं । गुरुत्वाचा ताठा अंगीं । सर्वथा शिगी लोगों नेदी ॥ ३ ॥ आपुल्या योगक्षेमाचे सांकडें । स्वमीही न घाली शिष्याकडे । शिष्यसकट अतिगाडे । निवारी रोकडे निजांगें जो ॥ ४ ॥ मी एक अकर्ता निजात्मयोगी । ह्मणोनि विषयांते न भोगी । अथवा विपयो निःशेप त्यागी । हाही आग्रहो अगी असेना ॥५॥ तो विषय भोगी ना स्वये त्यागी। तो अदृष्टाच्या निजविभागीं । लावूनियां देहाच्या अगी । परब्रह्मयोगी विचरत ॥६॥ देह दैवे पालखीमाजी चढे । अथवा विष्ठेमाजी पडे । ते 'दोहीचे सुखदुःख त्याकडे । मी ह्मणोनि पुढे कदा न रिघे ॥ ७ ॥ देही असोनि नाही अहंकृती । देही असोनि नाही गृहासक्ती । शेखी लोकामाजी लौकिकस्थिती । सुखें वर्तती लोकांसरिसे ॥८॥ त्यासी स्त्री ह्मणे माझा भर्ता । पुत्र ह्मणे माझा पिता । शिष्य ह्मणती गुरु तत्वता । तो त्याहूनि परता त्यामाजी वर्ते ॥ ९॥ ऐशिया पूर्णप्रतीती। आचरोनि दावी भक्ती । हरि भजावा सर्वाभूती । हेच शिष्याप्रती उपदेशी ॥ ३१० ॥ ही सद्गुरूची निजलक्षणे । पंडिता न कळती ज्ञातेपणे । पूर्णानुभवी जाणती खुणे । इतरांचे जाणणे पागुळे तेथ ॥११॥ त्याचे गुरुत्वाची चोळखण । अगी निजशांति पूर्ण । हेचि सद्गुरुत्वाचे लक्षण । मुख्य भूपण हेचि राया ॥१२॥ जगी शांति जाली परदेगी। कोठेही ठावो न मिळे तिशी । ते आली सद्गुरुपायापाशी । सुखवासासी चसावया॥१३॥ यापरी सद्गुरूपाशी शाती । स्वयें आली सुखवासवस्ती । जेवीं का माहेराआतीती । स्वानंदें क्रीडती कन्या जैशी ॥ १४ ॥ जाणोनि वेदशास्त्र निश्चिती । जो न मिरवी गा व्युत्पत्ती । ज्यासी अपरोक्ष पूर्ण शाती । तो सद्गुरुमूर्ति निश्चयें राया।॥१५॥ झणीं श्रोते कोपती येथ । हाणतील ग्रंथ वाढविला व्यर्थ । 'निष्णात' या पदाचा अर्थ । काढिता तेथ स्फुरले हो ॥ १६ ॥ हे माझे गाठीची नव्हे युक्ती । सद्गुरु आपण आपुली स्थिती। वोलवीतसे ग्रंथार्थी । पदपदार्थी साधूनी ॥ १७ ॥ तरी सद्गुरूची लक्षणे । न वर्णवती अगाधपणे । वेद वेडावले मुकेपणे । तेये माझं बोलणे सरे केवीं ॥१८॥ येय आश्चर्य कैसे देखा । श्रीभागवत देशभौखा । परमाथु साधिला नेटका ।तुष्टला निजसखा जनार्दनस्वामी ॥ १९ ॥ एका जनार्दना शरण । त्याची जै होय कृपा परिपूर्ण । त्या देहीं असतां देहबंधन। १नपनमा य काळमस्त जीवाच्या उद्धारविषयां सदय २ प्रथम शिष्याची अहरत्तिनमीपणा नाहीसा करितो गुरचे तीन गुण -परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान व बोधपाटव ४ न मनी मन ५ लघुत्व पाहात नाही ६ पूर्णत्वास, भरास चह देत नाही चरितार्थाचे ८ सकट अदृष्ट हणजे प्राम, साच्या भागाप्रमाणे अवश्य भोगावयाचा मुसदु सें देहापडे सोपवून देतो घ स्वरूपति मा होऊन आपण अलिप्तत्वे चागतो १० देहींचे. ११ हरिभक्ति १२ शदनान्यास १३ जागते पण फाराम १४ाश्रय, आधार १५शान १६ 'शाब्दे परे च निष्णात यातील निष्णातशब्दाचा १७ पदरची १४ नेति नेति हाणून तटस्थ राहिले १९ कर्स पुरेल २० मावा भाषा -- - -