पद्योमयविध ग्रंथांविषयीं पहातां केवळ गद्यात्मक व गद्यपद्यात्मक असे ग्रंथ मुळींच नाहींत. पद्यात्मक मात्र बरेच प्रसिद्ध आहेत व अजूनही प्रसिद्ध होत आहेत. हे बहुतेक राम, कृष्ण, पांडव इत्यादींच्या पराक्रमाने वर्णन करणारी काव्ये आहेत. पाश्चात्य अपूर्व ज्ञानसूर्याचे किरण पूर्वेकडे झळकूं लागल्यापासून मात्र मराठी व इतर देशभाषांत अनेकविषयमकरंदमय कांहीं ग्रंथकमलें विकसलीं. विकसत आहेत व उत्तरोत्तर अधिकाधिक विकसतील अशी आशा आहे असें महास्वदेश भाषाभिमानीही निर्विवाद कबूल करितील. अर्वाचीन ग्रंथांत नानाविध विषयांचे प्रतिपादक ग्रंथ गद्यघटित व काव्यग्रंथ पद्यघटित व गद्यपद्यघटित आहेत हे सांगणे न लगे.
अर्वाचीन ग्रंथांचे विविधविषयप्रतिपादक व काव्यनाटकें असे दोन ग्रंथ विभाग करितां येतात. त्यांत विविधविषयप्रतिपादक ग्रंथांत बहुतेक पाश्चात्य ग्रथांची भाषांतरेच आहेत; व त्यांत मानसिक उन्नति करणारे ह्मणजे तर्कमीमांसादिविषयप्रतिपादक ग्रंथ तर आमच्या बिलकुल पहाण्यांत नाहींत. ही शोचनीय उणीव कधी भरून येईल ती येवो ! सदरहू प्रमाणेच काव्यनाटकादि ग्रंथांची स्थिति आहे. परंतु ती तितकी शोचनीय आहे असें नाही; कारण, त्यांपैकी कांहीं त्यांच्या कर्त्यांनी स्वतःच्या कल्पनेने केलेलीं आहेत. व कित्येक तर विषयविशेषप्रतिपादकही आहेत. एतावता मराठी भाषेतील ग्रंथसंग्रह फार थोडा आहे. तो योग्य रीतीने मोठा होईल तो सुदिन !
आतां मराठी व्याकरणाविषयी. कै. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांच्या आद्य बालव्याकरणापासून तो अगदी नवीन झालेल्या प्रौढबोधापर्यंत मराठी भाषेच्या व्याकरणाचीं पुस्तकें आमच्या पहाण्यांत आहेत. परंतु ह्यांतील कित्येक शुद्ध संस्कृत व्याकरणाचे अनुकरण करणारी व कित्येक शुद्ध इंग्रजी व्याकरणाचे अनुकरण करणारी आढळतात. व कित्येकांतला विषयप्रतिपादनाचा मनसोक्त प्रकार पाहून तर हसूच येतें. मराठी भाषेची पीठिका व तिला किती दायांनी आपल्या शब्दरूपी दुग्धाने पुष्ट केले आहे, ह्याचे पूर्ण ज्ञान करून घेतल्याशिवाय त्यांनी तिने व्याकरण लिहिण्याचे साहस केले, ह्मणूनच त्यांच्या हातून प्रमाद घडले ह्यांत संशय नाही. तथापि दृष्ट वस्तूच्या अत्यंत अभावापेक्षा तिचा अल्पांश मिळाला तरी तो अभिनदनीयच आहे, या न्यायाने पहातां सर्वच मराठी व्याकरणाची पुस्तकें ग्राह्य ह्मटल्यास चालेल, त्यांतूनही गुणाच्या मानानें पहातां कै० बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांचे बालव्याकरण व गंगाधर शास्त्री टिळक यांचे लघुव्याकरण हीं थोडक्यांतल्या थोडक्यात चांगली होती असे ह्मटल्यावाचून आमच्यानें रहावत नाही व ती लुप्तप्राय झाली व त्यांच्या पुनः आवृत्ति निघत नाहीत हे पाहून वाईट वाटतें. असो.
सदरी लिहिल्याप्रमाणे मराठी भाषेची पीठिका व तिला कोणकोणत्या दायांनी आपल्या शब्दरूपी दुधानें पोषिले हे जाणून लिहिलेले एकच व्याकरण आमच्या पहाण्यांत आहे. तें कै० कृष्ण शास्त्री गडबोले यांनी केलेले होय, आमच्या मतें एवढें मात्र व्याकरण