चांगले आहे. कारण, ह्यांत मराठी भाषेतील त्या त्या शब्दांची व्युत्पत्ति चांगली दिली असून तदनुसार नियम बांधले आहेत, व व्याकरणसंबंधी सर्व विषयही यांत आहेत.
दुर्बोधत्वाचा आरोप ह्या व्याकरणावर कोणी आणितात; परंतु ज्याप्रमाणे नावेतून पैलतीरास जावयाचें आहे त्यास तिचे हिसके सोसावे लागतात त्याप्रमाणेच व्याकरणाब्धिपारंगत होण्यास त्याच्या दुर्बोधत्वाचे हिसके सोसले पाहिजेत.
तिसरे उपकरण कोश. प्रस्तुत पुस्तक कोशाचें असल्याकारणानें त्यासंबंधें थोडें तपशीलवार लिहिणे इष्ट दिसते. कोशाची पद्धति अगदी प्रथम भाषांमध्ये श्रेष्ठत्व पावलेल्या संस्कृत भाषेत सुरू झाली. हे कशावरून हा आक्षेप पुढे येणारच; त्यास हल्ली चालू असलेल्या कोशपद्धतीच्या इतिहासाचे आविष्करण हेच उत्तर होय. हे आविष्करण योग्य स्थळी होईलच. संस्कृत भाषेत ५६ कोश आहेत असे ह्मणण्याची रूढी पूर्वापार आहे. परंतु ह्या संख्येपेक्षा कोशांची संख्या जास्त असावी असे आमचे अनुमान आहे. ह्या कोशांची व्यवस्था हल्लीच्या कोशांतील व्यवस्थेप्रमाणें वर्णानुक्रमानें केलेली नाही. वेगळाल्या विषयांच्या संबंधानें शब्दांचे वर्गीकरण त्यांत केले आहे व त्यांस स्वर्गवर्ग, मनुष्यवर्ग, वनौषधिवर्ग, वैश्यवर्ग इत्यादि नांवें दिलेली आहेत. ह्यांत तत्तद्वर्गीय शब्दांचा संग्रह असतो. क्वचित आद्यंत वर्णांवरूनही शब्दांचे परिगणन असते. असल्या कोशांच्या रचनेचा काल भारतवर्षीय राजांच्या व विद्यांच्या र्हासाबरोबरच झाला. त्याचें पुनरुज्जीवन बर्याच वर्षांत झाले नाहीं. पुढे बराच काळ लोटल्यानंतर मराठी राज्याचे संस्थापक श्रीशिवाजी महाराज ह्यांनी स्वराज्य स्थापिल्यावर तो काळ पुनः डोकावूं लागला. तेव्हांपासून पेशव्यांच्या राज्याच्या अखेरीपर्यंत कांही विद्वद्रत्ने भरतभूमीच्या पोटी निपजलीं. त्यांनी संस्कृत व प्राकृत ग्रंथरचना बरीच केली. त्यांत अशा तऱ्हेचा एकच ग्रंथ झालेला पहाण्यांत येत आहे; तो पंडित रघुनाथरायकृत राजव्यवहारकोश होय. हा कोश हल्ली छापला असल्यामुळे पुष्कळांस माहित असेलच.
पेशव्यांचे राज्याचा वारसा दुसर्या बाजीरावाने सोडून दिल्यापासून दक्षणेंत इंग्रजांचा अम्मल झाला. राजकीय अमलाबरोबर इंग्रजी विद्याकलांनीही आपला अंमल सुरू केला. जसजसा हा अंमल जारी झाला तसतसे पाश्चात्य विद्याकळादिकांच्या इतिहासाचे ज्ञान वाढत गेले. त्या इतिहासावरून असे स्पष्ट दिसते की हल्ली भूगोलाच्या बर्याच अंशावर बोलली व लिहिली जाणारी व त्यामुळेच भूगोलातल्या सर्व भाषांपेक्षां श्रेश्ट श्रेष्ठत्व पावलेली अशी जी इंग्रजी भाषा त्या भाषेतला पहिला कोश डा० जानसन नावाच्या महापंडिताने तयार केला व डा. जानसनचा इंग्रजी भाषेचा कोश पाहूनच युरोपांतील इतर राष्ट्रांनीही आपआपल्या भाषांचे कोश तयार करविले. ह्यावरून संस्कृत भाषेतच प्रथम कोश झाले होते हें आमचें सदरचें ह्मणणें सिद्ध होते.
डा० जानसनच्या कोशाप्रमाणे संस्कृत भाषेचे कोश वर्णानुक्रमबद्ध-व ह्मणूनच पहाण्यास अति सुलभ-नव्हते, हे खरे; परंतु संस्कृत शब्दसंग्रह शिकण्याची पद्धति इंग्रजी तर्हेची न-