व्हती. अथपासून इतिपर्यंत समग्र कोशाचे अध्ययन पूर्वीच्या विद्यार्थांस होत असे, व त्यामुळे पाहिजे तो शब्द अर्थासुद्धा आठविण्यास प्रयास पडत नसत. इंग्रजी विद्येच्या प्रसाराबरोबर तद्विशिष्ट अध्ययनाची रीति पसरल्यापासून मात्र त्या कोशांचा उपयोग कमी होऊ लागून वर्णानुक्रमबद्ध कोश इकडेही होऊं लागले. ही गोष्ट अभिनंदनीयच झाली. त्यांतही विशेषेंकरून संस्कृतेतर भाषांच्या संबंधाने फारच अभिनंदनीय. कारण ह्यांत मूळचे कोश मुळींच नाहींत.
अशा रीतीने हिंदुस्थानातील बहुतेक चालू असलेल्या भाषांने कोश झाले व आमच्या मराठी भाषेचेही काही कोश झाले. ह्या कोशांपैकी पहिला मायाळू इंग्रज सरकाराने अनेक शास्त्र्यांकडून करविलेला "महाराष्ट्र भाषेचा कोश" होय. हा कोश शुद्ध मराठीच आहे, ह्मणजे मराठी शब्दांस मराठीच अर्थ दिले आहेत. ह्यांत कोठे कोठे शब्दांची व्युत्पत्ति व व्याकरण ही दिलेली आहेत, परंतु शब्दांस प्रतिशब्द दिलेले थोडेच सांपडतील. बहुतकरून व्युत्पत्तींचे शास्त्रीय रीतीने अर्थ लिहिले आहेत. उदाहरणार्थ:--
प्रकार, पुं० सं० सर्व पदार्थाचे भिन्नभिन्नत्वेकरून ज्ञान होण्यास त्या त्या पदार्थाचे ठायी भेदक जो धर्मविशेष असतो तो. तत्पदार्थविशेष्यक ज्ञानाच्या ठायी विशेषणत्वेकरून भासतो तो; २. प्रकारभेदाने भिन्न भिन्न जे पदार्थ ते प्र० उ० दोन चार प्रकारची वस्त्रे घेऊन ये, घरांत चार प्रकार असले ह्मणजे उपयोगी पडतात.
भाविक, ३ लिं० देव, गुरु, औषध इ० कांपासून बरे होते इ० जे त्याचे माहात्म्य लोक शास्त्रांत सांगतात त्याजवर ज्याचा मनःपूर्वक विश्वास असतो तो.
शोध, पु० कोणेक अर्थ कोठे आहे इ० रूप ज्ञान होण्याकरितां तत्संभावित स्थलाचे किं० त्या अर्थाचें त्या त्या नेत्रादि इंद्रियांनी जे पर्यालोचन तो आणि तेणेकरून तो अर्थ अमुक ठिकाणी आहे की नाही कि अमुक प्रकारचा आहे इ० रूप होते जे ज्ञान तो; २ लिहिण्यांत चुकलेली अक्षरें तीं ज्या स्थलींचीं चुकली त्या स्थली काकपद. इ० खूण करून अन्यत्र लिहितात तो.
आधारभूत दुसरा कोश नसतां त्यांनी केलेला हा कोश फारच चांगला आहे व त्याचा उपयोगही पुष्कळच होण्यासारखा आहे हे आम्ही प्रांजळपणे कबूल करितों. परंतु ह्या कोशाने दुसरी किंवा त्याहून पुढची एखादी आवृत्ति बघितली नाहीं असे अनुमान होते; कारण त्याची पुस्तकें फारच कचित् पहाण्यांत येतात. एवढ्या खर्चाने व मेहनतीने तयार झालेला ग्रंथ पुनः का छापला गेला नाही हे आह्मांस समजत नाहीं. असो.
ह्याच्या मागून तयार झालेला कोश ह्मटला ह्मणजे मोलस्वर्थ साहेबांचा होय. हाही त्याच्याच तोडीचा आहे असे ह्मणण्यास काही हरकत नाही. ह्यांत शब्दांचे अर्थ इंग्रजी भाषेत दिलेले आहेत. त्यामुळे तो निव्वळ मराठी जाणणारांच्या उपयोगी पडत नाही. ह्यांत कांही दोष आढळतात, परंतु परस्थाने प्ररदेशीय भाषेचं अध्ययन करून केलेल्या ग्रंथरचनेचे ते गालबोट आहे असे झटले पाहिजे.
तिसरा मराठी कोश कै. रघुनाथ शास्त्री गोडबोले यांनी केलेला. हा प्रथम कोशाचा