उपोद्घात प्राणिमात्रास घर बांधण्याची स्वाभाविकपणे उपजतच आवड असते. मुंग्या आपली वारुळे बांधतात, उंदोरघुशीसुद्धां जमिनीत किंवा भिंतींत बिळें करून राहतात; मधमाशा फुलांतील मध भरपूर मिळेल अशा ठिकाणी व माणसांचा उपद्रव शक्य तितका कमी होईल अशा ठिकाणी उंच झाडांवर आपली पोवळी बांधतात. निरनिराळ्या जातींचे पक्षी आपापली घरटी, गवत, काड्या, झाडपाला यांनी पकी मजबूत बांधन शक्य तितकी सुखसोयींची व दिसण्यासहि सुंदर अशी बांधतात. मनुष्यप्राणीच त्या नियमास कसा अपवाद ठरेल ? लहान मुलांच्या मनांत घरे बांधण्याची आवड स्वाभाविकपणे असलेली स्पष्ट दिसून येते. मुली भातुकलीचा खेळ खेळू लागल्या म्हणजे कोपऱ्यांत भिंतींचा आधार घेऊन पाट किंवा सुपे उभी करून “घरकूल " तयार करितात. मुंबई येथे चौपाटीवर मोठी माणसें सहल करण्यांत व मित्रमंडळींशी गप्पागोष्टी करण्यांत गुंतली असली तर लहानथोर सर्व मुलें वाळूचा ढीग करून त्यास पोखरून घरे, देवळे बांधण्यांत चर झालेली सर्वांच्या पाहण्यात येतात. येवढेच नव्हे तर काडेपेटीच्या विटाळ्यांत चिखलाच्या विटा करून पाटावर त्यांची घरे बांधण्याचा खटाटोप ज्यांनी केव्हांना केव्हां तरी आपल्या बालपणांत केला नाही अशी माणसें विरळा. घर बांधण्याची इच्छा मनुष्यमात्राच्या मनांत उपजतच असते, एवढेच नव्हे तर स्वतःच्या मालकीचे घर असणे ही एक मोठ्या भावनेची गोष्ट समजली जाते. मोडतोडके का असेना पण स्वतःचे असे एकाद्याचें घर असले म्हणजे त्यास समाजांत लौकिक दृष्टया एक प्रकारची बी स्थिरता आहे असे समजले जाते, ती जवळ नुसता पैसा कितीहि असला तरी येत नाही. उलटपक्षी ज्याचे स्वतःचे घर नाही त्यास " ना घर, ना दार, खुंटावरचा कावळा" नसे गणिले जाते. घर बांधणारा मनुष्य व्यापारउदिमांत कितीहि मोठ्या रकमांची देवघेव करीत असला तरी त्यास स्वतःचे घर बांधण्याचे बसले व त्या मानाने त्यास पुष्कळच कमी पैसा खर्च करावयाचा असला तरी
पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/१३
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही