या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

(९) . . ऐकू येऊ लागला व नेपथ्यपाठाचे धडे रोज मिळू लागले म्हणजे सर्व अभिमान पार विरघळून जाऊन निराशामय दु:ख प्राप्त होते व आपल्यापेक्षा विशिष्ट क्षेत्रांत त्यांना अधिक समजतें, आपल्या तार्किक ज्ञानापेक्षा त्यांचे अनुभवबन्य ज्ञान श्रेष्ठ आहे अशी प्रांजलपणे कबुली देण्याइतकी मनाची सात्विक तयारी झाली नाहीं तरी बांधण्यास सुरवात करण्यापूर्वी त्यांचा सल्ला घेतला असता तर या त्रासांतून तरी वाचलों असतो अशी उपरति प्राप्त होते. परंतु तिचा तादृश काही उपयोग नसतो. स्वतःचे घर असावे याबद्दल मनांत मोठी होस वाटत असली तरी खर्चाचा प्रथम केलेला संकल्प व नंतरचा आढावा ही मालकाने ताडून पाहिली म्हणजे Fools build houses, and wise men occupy them, (ataunit मूर्ख व भाड्याने रहाणारे शहाणे ) ही म्हण अक्षरशः खरी आहे असे अनुभवांती त्यांस पटते. त्यावरूनच घर बांधणे, लग्नकार्य करणे व विहीर खणणे या गोष्टी प्रत्यक्ष करूनच पहाव्या व अनुभव घ्यावा अशी सूक्ति रूढ झाली आहे. परंतु दूरवर विचार केला तर याचा दोष कामाकडे नसून स्वतःकडेच येतो, असे दिसून येईल. कारण कामास सुरवात करण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे काम किती करण्याचे आहे व त्यास अंदाजी किती खर्च येईल याचा विचार खोलवर केलेला नसतो. शिवाय एकदां कामास सुरुवात झाली म्हणजे " असे केले तर अधिक बरे दिसेल. याहून ते चांगले. एवढ्याशाने किती खर्च वाढणार ? ऐंशी तेथे पंचाऐंशी अशा विचाराने कोणी काहीही खर्चाच्या सूचना केल्या तर हौसेखातर त्या अंमलांत माणल्या जातात. मनुष्याच्या हौसेस मोल नाही. परंतु ती त्यास भलत्याच मोलात पाडते. म्हणून घर बांधणा-यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. केवढेहि लहान काम असो, त्यास अंदाजी किती खर्च लागेल त्याचे खुलासेवार टाचण करून कोणता माल किती व केव्हां लागेल या गोष्टींचा प्रथमच नीट विचार केलेला भसला म्हणजे खर्चातहि बरीच बचत होते. कारण तो कोठे मिळतो, भावाने मिळतो, स्वस्त भावात कसा मिळू शकेल, याबद्दल विचार करावयास भवकाश मिळून त्याची अगोदर तरतूद करून ठेवता येते. त्यामुळे आयत्या वेळी पडेल ती किंमत देऊन तो विकत घ्यावा लागत नाही, उलट पुष्कळच किफायतशीर भावाने मिळू शकतो. शिवाय त्याविणे कामानी खोटी न होऊन काम सुरळीत चालल्यानेहि बराच कमी खर्च येतो. खर्चाच्या अंदाजाचे खुलासेवार टांचण " . काय