या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

> > (१०) केले असले म्हणजे कोणत्या कामाचा अंदाजी भाव काय धरला होता व तो प्रत्यक्ष किती पडतो हेहि पडताळून पाहता येते. काहीहि झाले तरी काटकसर अवश्य झालीच पाहिजे. काटकसरचिं तत्त्व कितीहि अमलात आणण्याचे ठरविले तरी स्वतः मालकास वास्तुविद्येबद्दल थोडीबहुत व्यावहारिक माहिती असल्याशिवाय ते अमलात आणणे शक्यच नाही; त्यास सर्वस्वी पराधीन होऊन, काम कंत्राटाने दिले असल्यास कंत्राटदार, व रोजंदारीने चालू ठेविले असल्यास मिस्त्री, गवंडी, सुतार वगैरे लोकांच्या ओंजळीने पाणी प्यावे लागते. घर बांधण्याचे शास्त्र व्यवहारचतुर मनुष्यास आपल्या कामापुरते समजून घेणे फारसे कठिण नाही. परंतु मौज अशी आहे की, प्रत्येक घरवाल्याच्या आयुष्यावधीत नवीन बांधणे किंवा दुरुस्ती, फेरफार, पुस्ती जोड (Additions, Alterations) अशा कोणत्याना कोणत्या तरी प्रकारचे काम करण्याचे अंगावर पडले व त्यांत टक्केटोणपे सोसून, धंदेवाल्या लोकांकड़ डून लुबाडला जाऊन तो शहाणा झाला तर त्याच्या शहाणपणाचा व अनुभवाचा फायदा दुसऱ्या लोकांस मिळत नाही. तेहि आपल्यापरी असेच फसून नंतर शहाणे होतात. हा क्रम पिढयानपिढया चालू आहे. शिवाय स्थानिक धंदे. वाल्या कंत्राटदारांस व मेस्त्री लोकास कामाचे सर्वच प्रकार माहित असतात असें नाही. त्यामुळे अमुक कामापेक्षां भमुक प्रकाराने काम केल्यास तेवढयाच किंवा त्या- हूनहि अल्प खर्चात तेच सुलभतेने, सुबक व अधिक भक्कम होईल हे त्यांस माहित नसते. ह्या सर्व अडचणी लक्षात घेऊन अगदी अनभिज्ञ ( Layman ) माणसास सहज समजेल अशा सोप्या भाषेत या विषयावर एकादें पुस्तक लिहिले तर तें खास उपयुक्त होईल अशी कल्पना प्रस्तुत लेखकाच्या मनात बऱ्याच वर्षापासून जागृतावस्थेत होती व २-३ वर्षापूर्वी त्या दिशेने प्रयत्न करण्याचा त्याने थोडासा उपक्रमहि केला होता. परंतु सरकारी कामांत गृहरचनेच्या बाबतींत जो अनुभव मिळतो तो खासगी घरांच्या मालकांस फारसा उपयुक्त व्हावयाचा नाही असे आढळून आले. कारण तेथे पहिली गोष्ट ठराविक ठशाचे नकाशे (Type designs) तयार असतात. त्यांच्या रचनेत अल्पहि फरक करण्याचे काम आपल्या अधिकार- कातले नसते. यामुळे आहे तसेच काम करून टाकणे हा साधा व धोपट मार्ग असतो. दुसरी गोष्ट, काम कंत्राटाने दिले असल्यास बारिकसारिक गोष्टीत लक्ष घालून तें नकाशाबरहुकुम करणे याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. .