प्रस्तावना माझे मित्र रावसाहेब रघुनाथ श्रीपाद देशपांडे हे आपल्या “ सुलभ वास्तुशास्त्र" पुस्तकास मी प्रस्तावना लिहावी म्हणून विनंति करण्यासाठी ज्या वेळी पहिल्या प्रथम मनकडे आले त्या वेळी तें काम करण्याचे मी नाकारले होते. त्याबद्द- लच्या कारणाचा थोडासा खुलासा करणे अवश्य आहे. सध्यांच्या आमच्या शहरां- तील लोकांच्या राहणीमध्ये, विशेषतः सुशिक्षित म्हणविल्या जाणाऱ्या समाजाच्या राहणीमध्ये, दिवसेंदिवस जास्त जास्त कृत्रिमपणा येत असून, यालाच आमची राहणी दिवसेंदिवस उच्च दर्जाची होत आहे (Higher standard of living) असे मोठया दिमाखाने सांगून आम्ही आपली प्रौढी मिरवितो. ही राहणी माझ्या मताने आपल्या देशाला दिवसेंदिवस जास्त कंगाल व परावलंबी करीत चालली असून त्याच्या पारतंत्र्याच्या शंखला जास्त जास्त बळकट होत चालल्या आहेत. ज्या राहणीमुळे परमेश्वराने आपल्या देशामध्ये दिलेली साधनसंपत्ति धुळीस मिळून आपल्या देशबांधवांचे उद्योगधंदे नामशेष होत आहेत अशी राहणी निर्भीडपणे झुगारून देऊन आपल्या देशाच्या व देशबांधवांच्या संरक्षणासाठी आमच्या सुशिक्षित मंडळींनी व विशेषतः तज्ज्ञ मंडळींनी पुढे येणे अत्यंत निकडीचे आहे. या विषयासंबंधाने ज्या वेळी तज्ज्ञांबरोबर बोलण्याचा प्रसंग येतो त्या वेळी आपण विसाव्या शतकांत आहोत ही सबब नेहमी पुढे येते. आपल्यापैकी शेकडा ९० लोकांना पुरेसे अन्नवस्त्र मिळत नसतांना विसाव्या शतकाचा टिळा कपाळास लावून आपण मोठे सुधारलेले आहोत असे जगास भासवीत बसण्या- पेक्षा जगाने आपणांस जुन्या काळचे, रानटी, म्हणून उपहास केला तरी आपली स्थिति चांगली ओळखून आपल्यांपैकी प्रत्येकास पुरेसे अन्नवस्त्र मिळून सर्वजण जेणेकरून सुखांत राहू शकतील अशी आपली राहाणी ठेवणे अवश्य आहे, अशी माझी समजूत आहे व ती अनुभवाने दिवसेंदिवस जास्त दृढ होत आहे. आपल्यापैकी निदान शेकडा ९० लोकांनी परमेश्वराने दिलेल्या साधनांपासून कच्चा माल अगर पका माल तयार करण्यासाठी शेतीवर अगर कारखान्यांत सारखे काबाडकष्ट करावे तरी देखील त्यांच्या पोटाची खळगी भरूं नये अगर त्यांना धड वस्त्र मिळू नये याचे कारण काय ? याचे कारण बाकीच्या १० टक्के लोकांचे डोळे परक्या देशांतील आधुनिक सुधारणांमुळे अगदी दिपून जाऊन या घटोत्कची मायेच्या बाजारामध्ये दिवसेंदिवस आपले सर्वस्व खर्च होऊन हाती नरोटी कशी येत आहे व अशा आपल्या वागणुकीमुळे व राहणीमुळे काबाड-
पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/९
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही