प्रस्तावना. ईश्वराची दया इस्राएल लोकांवर पूर्ण आहे, हें शास्त्रावरूनच दिसून येतें असें नाहीं; परंतु त्यांबरोबरचे दुसरे लोक नाहींसे होत असतां, ते मोठमोठ्या विघ्नांतून बांचून आजपर्यंत राहिले आहेत, यावरूनहि उघडपणें दिसून येतें. फारो, हामान व दुसरे कित्येकांनी इस्राए- लांचे नाव जगांतून नाहींसें करावें असें योजिलें होतें; परंतु त्यांचाच नाश होऊन यांस कांहींच अपाय झाला नाहीं. याप्रमाणें दुसरें पवित्र मंदिर बांधलें जाईपर्यंत ईश्वरानें जे चमत्कार इस्राएलांसाठी केले, ते सर्व पवित्र शास्त्रांत लिहिलेले आहे. त्यानंतरचा त्यांचा वृत्तांत शास्त्रांत नाहीं; परंतु इस्राएलांतील व अन्य लोकांतील ग्रंथकारांनींहि लिहून ठेविला आहे. यावान म्हणजे ग्रीक लोकांचा राजा आनतिओखोस यानें इस्राएलांचें नाव व त्यांचा धर्म जगांतून नाहींसा करावा असें यो- जिलें होतें; परंतु त्यांतूनही त्यांस सोडविलें. याचा वृ नांत शास्त्रांत नाही, परंतु इतिहासांत सांपडतो. या ता- रणाची इस्राएलांस सर्वकाळ आठवण राहावी म्हणून हान्नुका हा सन नेमिला आहे. यास्तव आजच ईश्व- रानी आपणास ह्या संकटांतून सोडविलें असें समजून आणि त्याचे थोर उपकार मानून हा सन पाळावा.
पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही