पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/16

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाही. हें जेव्हां मतातत्याचे पांच पुत्रांनीं ऐकिलें, तेव्हा ते उठून गिलआदांतील मिसपाहास आले; कारण शेमु एल भविष्यवाद्याचें दिवसांत तें आश्रमार्चे ठिकाण होतें. आणि आकाशाची देवाचीं कृपा संपादन करण्यास त्यां नीं उपास केले, आणि भूमीवर बसले; तेव्हां त्यांस एक चांगला विचार सुचला. त्यामध्यें येहुदा ज्येष्ठ, दुसरा शिमाओन, तिसरा यौहानान, चौथा योनाथान, पांचवा एलआझार. त्यांच्या बाष्पानें त्यास आशीवाद देऊन असें म्हणाला कीं, हे माझा पुत्रा येहुदा, याकोबाचा पुत्र येहुदा जो सिहासारिखा होता, त्यावरून जसी, तसी मी तुजवरून स्तुति करीन. हे माझ्या पुत्रा शिमओना, याकोबाचा पुत्र शिमओन, ज्यानें शेखमाचे राहाणारे मारिले, यावरून जसी, तसी मी तुजवरून स्तुति करीन. हे माझ्यापुत्रा योहानाना, इस्राएलाचे सैन्याचा सरदार नराचा पुत्र आबेनर यावरून जर्सी, तसी मी तुजवरून स्तुति करीन.' हे माझ्या पुत्रा, योनाथाना, शाऊलाचा पुत्र योनाथान ज्यानें पेलिस्ती लोकांस मारिलें यावरून जसी, तसी मी तुजवरून स्तुति करीन. हे माझ्या पुत्रा एलआझारा, एलआझाराचा पुत्र पिनहास ज्याने आपले । देवाचा आवेश थरून इस्राएल लोकांस सीडविलें, यावरून जंसी, तसी मी तुजवरून स्तुति करीन,

यावरून मतात.याचे पांच पुत्र त्याच दिवशीं निघून । #यांनीं, त्या लोकांबरोबर लढाई करून त्यांतील पुष्कळां | स मारिलें, परंतु यांतून येहुदाहि मारला गेला. येहुदा मारला गेला हें जेव्हां मतात.याचे पुत्रांनीं पाहिलें, तेव्हां ते परत आपल्या बाष्पाकडे आले. तेव्हां तो त्यांस म्ह