पान:The History of Antiochus Epiphanes or the Institution of the Feast of Dedication.pdf/9

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आनतिओखोस राजाचा इतिहास, अथवा हालुक्याचे सनाची स्थापना. •यावानांचा राजा आनतिओखोस, जो मोठा बळवा- न आणि आपले राज्यांत शूर होता, आणि ज्याचे हुकु मांत सर्व राजे होते; त्याच्या दिवसांत असें झालें कीं, त्यानें पुष्कळ नगरें व बळवान राजे जिंकून त्यांचे को- ट मोडिले, नासिले, त्यांचे वाडे जाळिले आणि त्यांच्या लोकांस बंदांत ठेविलें. मग त्यानें आपणा करितां राज- धानीसाठी समुद्राच्या किनाऱ्यावर एक मोठें नगर बां- धून आपल्या नामाप्रमाणे त्यास आनतिओख असें नांव दिल्हें. त्याचा प्रधान बगरीस यानेंहि त्या नगरा- समोर दुसरें नगर बांधून आपल्या नावांप्रमाणें त्यास बगरीस असें नाव दिल्हें; आणि ही त्यांची नावें आज- पर्यंत आहेत. त्याच्या राज्याच्या तेविसावे वर्षी, म्हणजे देवाचें मंदिर बांधल्यानंतर दोनशें तेराव्या वर्षी, येरुशाले- मेवर चढून जाण्याचा बेत त्यानें केला. आणि तो आ- पल्या सरदारांस म्हणाला की, आपल्या राज्यांत येरुशा- लेमे मध्यें येहुदी लोक आहेत; हें तुम्ही जाणत नाहीं >*KO