या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० बृहद्योगवासिष्टसार. विद्वानास त्याचा यथाशास्त्र अनुभव येत असल्यामुळे त्याला सत्य ह्मणतात. सृष्टीच्या आरंभी तो आत्मा चैतन्यस्वभावानें जशाचा तसाच असतो. पण मोहामुळे आकाशादि क्रमाने उत्पन्न झालेला जो दुसरा लिंग-समष्टिरूप जड समूह तो त्याच्या प्रवेशामुळे व 'हाच मी आहे ' असा त्याने अभिमान धरिल्यामुळे, त्याच्यासारिखाच सचेतन भासतो व त्यांतील प्राणांस धारण करणे या उपाधीमुळे तो (आत्मा) जीव या भावी निद्य नावास पात्र होतो. ते नाव देहोत्पत्तीनतर व्यक्त होणाऱ्या वाणीच्या अधीन असल्यामुळे त्यास देहोत्पत्तीनतर प्राप्त होत असते. ह्मणून त्यास 'भावी' असें मटले आहे हा त्याचा जीवभाव अति भ्रातीमुळे संपादन झालेला असतो, वस्तुत. नव्हे. सारांश सृष्टीच्या आरभी मोहामुळे त्यास असत्य समष्टि-जीवभाव प्राप्त होतो. पण तो केवळ ज्ञानशक्तिसाध्य असतो. ह्मणजे नुसत्या ज्ञानशक्तीच्या योगानेच समष्टि-जीवाची उत्पत्ति होते. नंतर या समष्टि- जीवाच्या ठिकाणची क्रिया शक्ति व त्या सत्ची ज्ञानशाक्त या दोन शक्तींच्या योगाने मन ही वस्तु निर्माण होते. प्राण धारण करणे य शक्तीस प्राप्त झालेला तो भौतिक लिगात्माच मन होतो, असा याच भावार्थ समजावा. मन या स्वरूपास प्राप्त होताना तो भूतात्मा सकल्प विकल्पाचे मनन केल्यामुळे जरा मद होतो. तात्पर्य आपल्या परमात्म भावास विसरून जाऊन तो जीव, सकल्प व विकल्प हे आत्मधर्म आहेत असे समजतो. अति स्थिर समुद्रापासून जसे अस्थिर तरग उत्पन्न व्हा तशातलाच हा मनाच्या उत्पत्तीचा प्रकार आहे. याप्रमाणे समष्टि मने भावास प्राप्त झालेले हिरण्यगर्भसज्ञक तत्त्व दुसऱ्या कोणाच्या बोधावार नच पूर्व वासनेप्रमाणे विराङ्गाव, भुवनादिभाव, जरायुजादि चार भूर समुदाय इत्यादि सर्व निर्माण करिते. त्याचा प्रत्येक सकल्प सत्य असल्ट मळे सकल्पाबरोबर तत्काल तसेच घडते. प्रथम स्वयप्रकाश सत् असा पढे त्यासच भ्रातीने प्राण धारण करण्याची शक्ति येणे, ह्मणजे त्य भावी समष्टि जीव होणे, त्यानतर समष्टि-मन उत्पन्न होणे ह्मणजे हिरण गर्भाचा जन्म होणे व त्याने स्वतः सर्व स्थूल सृष्टि केवल संकल्पाने रच डा ब्रह्माचे ठायीं जगाचा अध्यारोप आहे. पण अशा शेकडो अध्यारो नींही अधिष्ठानभूत ब्रह्माच्या पारमार्थिक स्थितीत काही अंतर पडत ना कारण सोन्याचे कडे सोन्याहून जसे भिन्न नसते त्याप्रमाणे ब्रह्मा