या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० बृहद्योगवासिष्ठसार. एकच देह असतो. अथवा हा एक अजच सर्व भूताचे परम कारण आहे. याचे मात्र काही कारण नाही. ह्मणून याला एक देह असतो व इतरास दोन असतात. या प्रथम प्रजापतीला भौतिक देह नाही, हाही आरोपित आहे. आरोपिताचे स्वरूप अधिष्ठानाहून भिन्न नसते. यास्तव, तो चैतन्यरूप आहे. पृथ्वी, आप इत्यादि भूतरूप नाही. हा प्रजापतीच प्रजेचा विस्तार करितो. त्यामुळे सर्व प्रजाही चैतन्यरूप आहे. कारण, कार्य कारणरूप असते, असा न्याय आहे, व सुवर्णाची-कटे, सरी, गोप इत्यादि-सर्व कार्ये सुवर्णरूप असतात, हे सर्वास ठाऊक आहे. चित्तमय अशा त्याच्या ठायी " अह" हा पहिला परिस्पद झाला. तोच या सर्व स्थूल भूताचे कारण आहे. वायूपासून जसा स्पद (चलन) त्याप्रमाणे याच्यापासून तद्रूप अशी ही सृष्टि झाली. स्वतः ब्रह्मदेवच अध्यस्त असल्यामुळे ही सृष्टीही अध्यस्त आहे. अध्यस्त झणजे आरोपित. पण हा ससार जरी आरोपित आहे तरी तो सत्य असल्यासारिखा व नो जरी चिद्रूप असला तरी अचिद्रूप असल्यासारिखा भासतो, हणजे एका स्वप्नात जसे दुसरे स्वप्न दिसावे किंवा त्यात जसा स्त्रीसमागम घडावा, तसा हा सर्व प्रकार आहे. । असो. असा हा केवळ चित्तरूप ब्रह्मा या त्रिभुवनान्या स्थितीचे कारण आहे. या स्वयभूचा सकल्प प्राण्याच्या कर्माप्रमाणे जसा जसा विकास पावतो त्या त्या प्रमाणे प्रपच भासू लागतो, आणि स्वरूप व आतिवाहिक देह यास विसरल्यामुळे सर्व प्राणी यथास्थित व्यवहार करू लागतात. काल्पनिक पिशाचाप्रमाणे त्याना हा सर्व संसार सत्य भासतो. ब्रह्मदेवाला मात्र आपल्या आतिवाहिक शरीराची व स्वरू- पाची विस्मति होत नाही. कारण त्याचे रूप सर्व स्थूल प्रपचापूर्वी माया- शबल ब्रह्मापासून झालेले असते, व त्याची प्रकृति शुद्ध असते. त्यामुळेच त्याचा सकल्प सत्य असतो. त्याच्या प्रकृतीत तमोगुणाचा अश नसतो. ह्मणून त्याचे ज्ञान इतराप्रमाणे लुप्त होत नाही. त्यामुळेच त्याला जाड्य- भ्रमही होत नाही. ब्रह्मा मनोमय असल्यामुळे जगही मनोमय आहे. त्या अजाच्या उत्पत्तीला जशी सहकारी कारणाची गरज नसते तशीच सृष्टीच्या उत्पत्तीलाही सहकारी कारणाची गरज नाही. कार्य उत्पन्न करावयाचे झाल्यास काला ज्या दुसऱ्या अनेक कारणाचे सहाय घ्यावे लागते त्यास सहाकारी का-