या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ बृहद्योगवासिष्ठसार. प्रमाणे जग मिथ्या आहे; आणि त्याकरितांच आम्ही त्यांविषयी इतका आग्रह धरितो ३. सर्ग-वसिष्ठ मुनि उपदेश करीत आहेत तो सायंकाळ झाला. त्यामुळे सभा विसर्जन करून उठलेल्या लोकाचा निशाक्रम व प्रातःकाळी पुनः सभेत येऊन वसणे व उपदेशारंभ याचे वर्णन येथे केले आहे. श्रीवाल्मीकि-याप्रमाणे मुनिवसिष्ठ उपदेश करीत असताना तेथील सर्व जन एकाग्र चित्त करून व मौन धारण करून बसले होते. त्यावे. ळी त्या राजसभेत सर्वत्र शातता पसरली होती. कोठे लहानसहानही ध्वनि होत नव्हता. फार काय पण पिजन्यातील पोपट, मैना इत्यादि पक्षीही कान वाकडे करून वसिष्ठाचे भाषण ऐकत होते. त्यानी आपली सर्व हालचाल बद केली. स्त्रिया आपले हावभाव विसरल्या. साराश त्याप्रसगी ती राजसभा चित्रासारखी निश्चल होती. इतक्यात सायंकाळ झाला. उन्हे लाल दिसू लागली. सूर्यकिरणाप्रमाणेच प्राण्याचे व्यवहार कमी कमी होत चालले. शीत, मद व मुगध वायु राजसभेकडे येऊ लागला. हा जणु काय श्रवणाकरिताच येत आहे, असे त्यावेळी कित्येक कल्पकास वाटले. इतक्यात वसिष्ठानी सर्व दिवसभर जे सागितले होते त्याचे चितन करण्याकरिताच जण काय भगवान सूर्य प्रपचास सोडून अस्ताचलाच्या निर्जन शिखराकटे चालला. विज्ञानश्रवणानतर चित्तात जसा हळु हळु शाततेचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणे सध्याकाळच्या शाततेस आरभ झाला. दाही दिशेत प्राण्याचा अवर्णनीय सचार होऊ लागला. श्रोते जसे आपल्या माना वर उचलून वसिष्टाच्या मुखारविदाकडे पहात होते त्याचप्रमाणेच जण काय सर्व वस्तूच्या सावल्या दूर दूर पसरल्या. इतक्यात राजाचा द्वारपाल आला व नम्र होऊन, त्याने " सध्यावदनादि कर्माचा समय झाला," असे निवेदन केले. त्याबरोबर वसिष्ठानी आपले मधुर भाषण आटोपिले “ महाराज, मी आज जे सागितले आहे त्याचा सर्वानी आपल्यापाशी अधिक विचार करावा. आता या पुढे जे काही मला सागावयाचे आं ते मी उद्यां सागेन." असे बोलून, ते मुनिवर्य स्वस्थ बसले. ते ऐकू. राजा " बरे आहे" असे ह्मणाला व त्याने आपल्या कल्याणाकरिता पुष्प पाद्य, अर्ध्य, सत्कार व दक्षिणा इत्यादि देऊन देव, ऋषि, मुनी व ब्राह्मण यांचे आदराने पूजन केले. नतर ती सर्व सभा उठली; त्या वेळ