या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२१ ३. उत्पत्तिप्रकरणं-सर्ग ६. लता (वेल ) त्या परमात्म्यामुळेच नाचत असते. (ह्मणजे त्या प्रकृति- लतेस हालविणारा वायु हा परमात्माच आहे.) प्रत्येक शरीररूपी करंडीत हा चिन्मणि चमकत असतो. त्याच्या प्रकाशानें प्रकाशित होऊनच जगांतील वस्तु परस्पर अनेक चमत्कार करीत असतात. त्याच्या योगानेंच असत्, असत् झाले आहे व सत् , सत् झाले आहे. या निरिच्छ व असंग परमा- त्म्याच्या सानिध्यामुळेच हा देहादिजडवर्ग कार्ये करितो. पारमार्थिक सत्तेने युक्त असलेल्या या देवाच्या सत्तेनेच नियति, देश, काल, चलन, स्पंदन, क्रिया इत्यादि सर्व सत्तायुक्त झाले आहे. अथवा तोच शुद्ध सविद्रूप मायिक परमात्मा आकाशादि पदार्थाचे चिंतन केल्यामुळे आकाशादिरूप झाला आहे. पण मोठमोठ्या अनत सष्टींची घडामोड करीत असूनही हा काही करीत नाही. तर तो एकटाच सर्वदा अस्तोदयरहित, ज्ञानमय, व निर्विकार अशा आपल्या स्वरूपामध्ये स्थित असतो आणि तोच मनोभ्रमाचे मूळ आहे ५. सर्ग ६-मोक्ष देणाऱ्या ज्ञानाच्या उपायांचे अनुष्ठान कोणत्या क्रमाने करावें तें येथे सागितले आहे. श्रीवसिष्ठ-रामचंद्रा, तो परमात्मा केवळ मनाचेच नव्हे तर या सर्व सृष्टीचे निदान आहे. त्याची प्राप्ति करून घेणे हाच परम पुरुषार्थ आहे. पण या परात्पर देवाची प्राप्ति ज्ञानाच्या योगानेच होते. कर्मानुष्ठान करून देहाला व मनाला कितीही जरी शिणविलें तरी त्याच्या योगाने तो परमात्मा मिळत नाही. त्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्नसाध्य ज्ञान हेच उक्त अनुष्ठान आहे, असें जाणावे. कारण मृगजलाची भ्राति झालेली असल्यास ती घालविण्यास त्याच्या अधिष्ठानाच्या ज्ञानावाचून इतर शेकडो उपायही निरुयोगी ठरतात, हे अनुभवसिद्ध आहे. आपल्याजवळ, अगदी डोळ्या- समोर असलेली वस्तुही एकादेवेळी विस्मृतीमुळे आपणास नाहीशी वाटते व तिच्या प्राप्तीकरिता आपण कितीही जरी दुसरी लौकीक व वैदिक अनुष्ठाने केली तरी त्याचा काही उपयोग होत नाही. पण ती विस्मृत वस्तु आपल्याच हातात, किवा गळ्यांत आहे, असे प्रत्यक्ष दिसले की-ती नाही, साडली, कोणी नेली-हा भ्रम लागलाच नाहीसा होतो व ती वस्तु पुनरपि. मिळाल्यासारिखी होते. त्याप्रमाणेच या स्वानंदरूप देवाचा साक्षात्कार झाला असतां तो संसारी, दुःखी, कर्ता, भोक्ता इत्यादि आहे,