या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० बृहद्योगवासिष्ठसार. वाटल्यास त्यातील पदार्थ जसे मिथ्या आहेत, असे वाटते त्याप्रमाणे याचे मनन केले असतां जगात असतानाच त्यातील नाना वस्तु मिथ्या वाढू लागतात. या शास्त्रात में सागितले आहे तेच इतरत्र असून येथे जे नाही ते दुसऱ्या कोणत्याही शास्त्रात मिळणार नाही. ज्ञानी यास समस्त विज्ञान-शास्त्राचा कोश ( भाडार, खजिना ) असे ह्मणतात. याचे श्रवण नित्य करावे. ह्मणजे बुद्धीमध्ये ज्ञानोदय होतो. पण पापाच्या दुष्प- रिणामामुळे पुष्कळीस हे रुचत नाही. त्यानी पाहिजे असल्यास दुसऱ्या शास्त्राचा अभ्यास करावा. किंषा पशुतुल्य विद्याहीन होऊन रहावे. त्याबद्दल आमचे काहींच ह्मणणे किवा आग्रह नाही. पण ज्यास अध्या- त्मशास्त्राची चर्चा आवडत असेल त्याने याचा आदराने अभ्यास करावा. ह्मणजे औषधपानानतर जस आरोग्य हे प्रत्यक्ष फळ मिळते त्याप्रमाणे जीवन्मुक्ति अनुभवास येते. आह्मी हे वराप्रमाणे किवा शापा- प्रमाणे सागत आहो. अर्थात् वर-शापाप्रमाणे हे आमचे सागणे असत्य कधी होणार नाही. असो, दशरथतनया, या शास्त्राचे श्रवण करून तदनुरूप मनन केल्यास संसारदुःखांचा तात्काल नाश होतो. धनदान, तप, अर्थरहित व आचाररहित वेदाध्ययन इत्यादिकाच्या योगाने त्याचा आत्यतिक नाश होत नाही ८. सर्ग९-जीवन्मुक्ताची लक्षणे, त्याची सर्वात्मता, व जगत्प्रलयानंतर अवशिष्ट रहाणाऱ्या आत्म्याचे स्वरूप याचे येथे निरूपण केले आहे. श्रीवसिष्ठ-बा उदारमते, जे आपले चित्त आत्म्यामध्येच लावितात, आत्म्याच्या ज्ञानाकरिताच जे जीवत असतात; जे परस्पर आत्म्याचाच बोध करितात; व त्याचे वर्णन करीत असतानाच ज्यांस अति सतोष होतो त्या केवल ज्ञाननिष्ठ पुरुषास विदेहमुक्तीच्या तोडीचीच (ह्मणजे दृढ) जीवन्मुक्ति मिळते. ह्मणजे त्या पुरुषाचा सबध शरीराशी जरी असला तरी त्याच्या सुखदुःखादिकानी तो सुखदुःखी होत नाही. फार काय पण त्याचे चित्त आत्म्यामध्येच निमग्न झाल्यामुळे त्यास या तुच्छ शरीराचे भानही रहात नाही. श्रीराम-सद्गुरो, मला जीवन्मुक्ताचे व विदेहमुक्ताचे लक्षण.सांगा. णजे मीही त्याप्रमाणे प्रयत्न करीन.